पुणे : पुढारी वृत्तसेवा
(एनसीटीई) दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र (बी.एड.) अभ्यासक्रम बंद केल्यानंतर आता चार वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रमही (बीए.बी.एड., बी.एस्सी.बी.एड.) बंद केला जाणार आहे. त्यानुसार २०२४-२५ हे चार वर्षांच्या जुन्या अभ्यासक्रमाचे शेवटचे सत्र असून २०२५-२६ पासून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही. चार वर्षांच्या एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रमाच्या मान्यताप्राप्त संस्थांची मान्यता कायम राहणार आहे. एनसीटीईने यासंदर्भात नोटीस
प्रसिद्ध केली आहे. शिक्षक गुणवत्ता, शिक्षक शिक्षणासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेली एनसीटीई ही स्वायत्त संस्था आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला अनुसरून एनसीटीईन बहुविद्याशाखीय शिक्षण व्यवस्था असलेल्या ५७ संस्थेमध्ये NCTE एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (आयटीईपी) हा चार वर्षांचा एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यानुसार आता इतर शिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक संस्थांना ५ मार्चपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment