सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०२२ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी पदावर नियतवाटप.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग,
क्रमांक : एएससी १४२४/प्र.क्र. ३७/प्रशा-३ (१४-अ), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दूरध्वनी क्रमांक: ०२२-२२७९४१७२. दिनांक: २३ फेब्रुवारी, २०२४.
ज्ञापन
महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ या परीक्षेतील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या ४९ पदांसाठी (मंत्रालय ४२ महाराष्ट्र लोकसेवा आयोग ७ = ४९) दिनांक २२-१०-२०२३ रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल दि. १८-०१-२०२४ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०२२ च्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने क्रमांक: १४४२(२) (१)/२०२२/तेवीस, दिनांक ३०-०१-२०२४ च्या पत्रान्वये शिफारस केलेल्या सोबतच्या विवरणपत्र "अ" मधील उमेदवारांचे त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या मंत्रालयीन विभागात/महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात सहायक कक्ष अधिकारी पदावर नियतवाटप करण्यात येत आहे.
२. सोबतच्या विवरणपत्र "अ" मध्ये नमूद केलेल्या उमेदवारांची नेमणूक पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात करण्यात यावी :-
(৭)
सदर विवरणपत्रातील सर्व उमेदवारांनी दिनांक २६-०३-२०२४ पर्यंत संबंधित्त विभाग/कार्यालयात व्यक्तिशः उपस्थित राहून अस्थायी नियुक्तीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. सदरहू कालावधीत उमेदवारांनी अस्थायी नियुक्ती स्विकारली नाही तर त्यांचे नाव कोणतीही पूर्वसूचना न देता, या विभागाच्या/महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवडसूचीतून कमी करण्यात येईल.
(२) लोकसेवा आयोगाकडे केलेल्या अर्जातील दाव्यांची तपासणी / पडताळणी आयोगाने केलेली नसल्याने, नियुक्ती स्विकारण्यासाठी उपस्थित रहाताना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा २०२२ साठी देण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक: ०३३/२०२३ ते ०३६/२०२३, दिनांक १४-०८-२०२३ मध्ये नमूद केल्यानुसार वयोमर्यादेची दिनांक ०१-१०-२०२२ रोजीच्या अर्हतेनुसार तसेच शैक्षणिक आणि अन्य अटींची दिनांक ०१-०९-२०२३ किंवा तत्पुर्वीच्या अर्हतेनुसार खाली नमूद केलेली मूळ प्रमाणपत्रे उमेदवारांनी सोबत घेऊन जावीत. नियुक्ती स्विकारण्यासाठी उपस्थित रहाताना सदर प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत
उमेदवाराजवळ असणे अत्यावश्यक आहे :-
वयोमर्यादा (दिनांक ०१-१०-२०२२ रोजी तसेच प्रस्तुत मुख्य परीक्षेच्या जाहिरातीमध्ये नमुद केल्यानुसार)
No comments:
Post a Comment