महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, स.न.८३२ ए. का.पी.नं.१७८, १७९, बालचित्रवाणी शेजारी, आधारकर रिसर्च इन्टिट्यूटच्या मागे, भांबुर्ड, शिवाजीनगर, पुणे-४११००४
Tel: Chairman (P): STD. (020)-25651751 Secretary (P): 25651750 & EPABX -25705000 & Email: secretary.stateboard@gmail.com
परीक्षा प्राधान्य/महत्वाचे
प्रति,
क्र.रा.मं./परीक्षा-२/ 572 पुणे-४११००४
विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व विभागीय मंडळे,
दिनांक-०९/०२/२०२४
विषय- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा मार्च २०२४ चे प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरणेबाबत.....
संदर्भ - १. या कार्यालयाचे पत्र क्र. रा.मं./परीक्षा-२/५५०८ दि.२६/१२/२०२३ २. या कार्यालयाचे पत्र क्र. रा.मं./गणकयंत्र/१/१७८ दि.१५/०१/२०२४
उपरोक्त विषयी संदर्भिय पत्रे पहावीत, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च २०२४ चे प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरणेबाबतच्या सूचना संदर्भिय पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.
१) मार्च २०२४ मधील इयत्ता १० वी प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी इ. परीक्षेचे गुण भरण्यासाठी "Internal/Practical Marks & Grades" (SSC) ही लिंक मंडळाचे संकेतस्थळ www.mahahsscboard.in चर प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन करण्यासाठी सोमवार, दिनांक १२/०२/२०२४ पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्म माध्यमिक शाळांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आवेदनपत्राच्या शाळा Login मध्ये विषयनिहाय Blank Marksheet या प्रात्यक्षिक परीक्षा नियोजनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सदर बाब आपल्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्यावी.
२) इ.१२वी परीक्षेतील ऑनलाईन गुण नोंदविण्याकरीता Login id (Jxxxxxx_1) हा प्राचार्य/उपप्राचार्य यांचेसाठी असून इ.१०वी करीता Login id (Sxxxxxx_1) हा शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी असून त्यांनीच Checker म्हणून काम करावयाचे आहे व गुण मंडळाकडे तपासून अग्रेषित करावयाचे आहेत.
३) गुण नोंदविताना त्याची पूर्णतः गोपनीयता राहील याची सर्व संबंधित प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी दक्षता घ्यावी. ४) अतिविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये भरलेल्या व या Online System मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध झाले नाहीत अथवा विद्याथ्याने विषय बदल केला आहे. अशा सर्व विद्याथ्यांचे गुण प्रचलित पध्दतीने निर्धारित तारखेस विभागीय मंडळामध्ये जमा करावयाचे आहेत.
उपरोक्त प्रमाणे इ.१०वी व ३.१२वीच्या ONLINE गुणांसंदर्भातील सर्व बाबी आपल्या कार्यकक्षेतील सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात.
quey
( अनुराधा ओक) सचिव
राज्य मंडळ, पुणे ०४.
प्रत माहितीस्तव-
No comments:
Post a Comment