01 February 2024

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत.

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, ३ चर्च पथ, पुणे-४११००१

दूरध्वनी क्र. ०२०-२६१३७१८६.२६१२७५६९

ईमेल - sjdprematricdbt@gmail.com

जा.क्र.सकआ/शिक्षण/मॅट्रिकपूर्व शिष्य/का ४-अ/२०२३-२४/३४४

दि. ०१/०२/२०२४

अत्यंत महत्वाचे/ तात्काळ

प्रति,

१. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण (सर्व)

२. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, (सर्व)

३. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

विषय- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत.

उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खालील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत.

१. सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता

२.इ.९ वी १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

३. साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

४.इ.५ वी ते ७ वी आणि इ.८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या

५. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क

६. महर्षि विठ्ठल

चर नमुद केलेल्या सर्व योजनांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करणेकरीता खालीलप्रमाणे कार्यप्रणाली अवलंबण्यात यावी. १. महाडीबीटी प्रणाली वेब लिंक- https://prematric.mahait.org/Login/Login

२. मुख्याध्यापक लॉगीन तयार करणे महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्जाच्या नोंदणीसाठी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी यूजर आयडीमध्ये Pre_SE२७XXXXXXXXXXXX_Principal आणि पासवर्डमध्ये Pass१२३ टाइप करून लॉग इन करावे.

३. शाळेचे प्रोफाईल अद्ययावत करणे- यामध्ये शाळेची मुख्याध्यापकांची व लिपिकाची माहिती अद्ययावत करावी. ४. विद्यार्थी प्रोफाईल अद्ययावत करणे यामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी.

५. योजनेची निवड करणे यामध्ये संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेकरीता अर्ज नोंदणी करणे.

तरी वर नमुद केलेल्या योजनांचे पात्र सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करणेकरीता आपले स्तरावरुन संबंधित सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांना तात्काळ आदेशित करावे. याबाबत मा. आयुक्त महोदय साप्ताहिक बैठकीमध्ये आढावा घेणार आहेत. त्यामुळे सर्व शाळांची १०० टक्के अर्ज नोंदणी होईल याकरीता आपले स्तरावरुन कार्यवाही करावी. याबाबतीत दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी.

(प्रमोद जाधव) सहआयुक्त (शिक्षण), समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत- मा. आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे स्वीय सहाय्यक

Online clink
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://prematric.mahait.org/Login/Login


No comments:

Post a Comment

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular