पवित्र पोर्टलवर दिनांक ०५/०२/२०२४ पासून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून व आजपर्यंत १,४१,४४७ अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत. तर १,३५,८५५ अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम लॉक देखील केले आहेत.
दरम्यान मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक (स्टॅम्प) ४५३८/२०२४ रिट याचिका क्रमांक १७५८/२०२४, १७५९१/२०२४, १६०६/२०२४ दाखल याचिकांमध्ये निर्देश झाले आहेत. रिट याचिका क्रमांक १६०६/२०२४ या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. रिट याचिका क्रमांक १६०६/२०२४ मधील याचिकाकर्त्याची मागणी विचारात घेता त्या संदर्भात न्यायालयाचे स्पष्ट निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील टप्यावरील कार्यवाही करता येत नसल्याने प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक १३/०२/२०२४ पर्यंत पुढे सुरू ठेवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवार व संबंधितांनी नोंद घ्यावी.

No comments:
Post a Comment