• पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे काम प्रगतिपथावर आहे. सद्यःस्थितीत या परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी/अडचणी समोर येताना दिसून येत नाहीत.
• दिनांक २१/०२/२०२४ रोजीच्या बुलेटिनमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावीत. त्याची पडताळणी नियुक्ती प्राधिकारी घोषित करतील त्या वेळापत्रकाप्रमाणे नजीकच्या काळात होणार आहे.
• याद्यांची पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आहे. त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही गा-हाणे असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी 'तक्रार निवारण व दुरूस्ती समिती गठीत करण्यात आली आहे. त्याद्वारे सर्व बाबींची यथोचित दखल घेतली जाईल व निराकरण केले जाईल.
• सन २०१९ च्या भरतीच्या भरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉक करण्यास दि.३० जून, २०१९ मुदत होती व दिनांक ०९/०८/२०१९ रोजी प्रत्यक्ष शिफारस याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. म्हणजेच ४० दिवसांचा कालावधी लागला होता. यावेळी त्या तुलनेत तिपटीहून अधिक पदांची भरती असूनही शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकरच या याद्या प्रसिध्द होतील. त्यामुळे या संदर्भात अवाजवी उत्कंठा दर्शवू नये.
• अभियोग्यताधारकांनी शिक्षक पदभरती-२०२२ साठी वापरात असलेल्या edupavitra2022@gmail.com या ईमेलवरच त्यांची विहित प्रपत्रातील निवेदने आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावीत. निवेदनासंबंधीचे नमुना प्रपत्र लवकरच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल. सदर ईमेल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून पाठविल्या गेलेल्या तसेच विहित नमुन्यात नसलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी. याबाबत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात येईल.

No comments:
Post a Comment