13 February 2024

शिक्षक पदभरतीबाबत तातडीची सूचना,प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया दि. 14/02/2024 पर्यंत

दिनांक 13/02/2024

• शिक्षक पदभरतीबाबत तातडीची सूचना *

पवित्र पोर्टलवर दिनांक 05/02/2024 पासून प्रचलित शासन धोरण व निर्देशानुसार प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून आजपर्यंत 1,41,806 अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले असून त्यापैकी 1,37,063 लॉक देखील केले आहेत.

दरम्यान मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्र. 1606/2024 मध्ये आज सुनावणी झाली. त्यानंतर मा न्यायालयाने प्रचलित शासन धोरण व तरतुदीनुसारच कार्यवाही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत तसेच

प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया दि. 14/02/2024 पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी

भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये, याकरता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत...





No comments:

Post a Comment

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular