जा.क्र.दप/पमं/सरळसेवा/समन्वय समिती/मेज-२/९२ / सन २०२४
दि.: २३.०२.२०२४
प्रसिध्दीपत्रक
१. जलसंपदा विभागांतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील परीक्षा- २०२३ याकरीता एकूण प्राप्त ६८२७ आक्षेपांबाबत मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ञ समितीमार्फत कार्यवाही करण्यात येवून त्यातील ८२ आक्षेप / हरकती वैध ठरविण्यात आलेल्या होत्या. तथापि त्याव्यतिरीक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक Question ID ६३०६८०५३२८०५ व दप्तर कारकुन / मोजणीदार/ कालवा निरीक्षक Question ID ६३०६८०५३७२८७ बाबत घेण्यात आलेले हे दोन आक्षेप / हरकती देखिल मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ञ समितीमार्फत स्विकृत करण्यात आलेले आहेत, त्यामुळे सुधारीत Objection Summary आणि Valid Objection Details या सोबत प्रसिध्द करण्यात येत आहेत.
२. मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत दि. २३.०२.२०२४ रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक परीक्षा दि. २९.१२.२०२३, सत्र- २ व दप्तर कारकुन/ मोजणीदार / कालवा निरीक्षक परीक्षा दि.०२.०१.२०२४, सत्र- ३ मधील उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडी वर सुधारित HTML Link Post Objection (सुधारित उत्तरतालिका) उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
३. सबब, यापुढे कोणतेही लेखी / ई-मेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
स्थळ प्रत मा. अध्यक्ष समन्वय समिती यांचे मान्यतेने
(सविता चं. बोधेकर)
सदस्य सचिव
समन्वय समिती तथा
अधीक्षक अभियंता व परीमंडळीय अधिकारी
दक्षता पथक, मुंबई परीमंडळ
पाटबंधारे विभाग, ठाणे
Dircect Link साठी

No comments:
Post a Comment