13 February 2024

शासन निर्णय, दि. ०६.०२.२०२३ मधील मुद्या क्र. ५ संदर्भात मार्गदर्शन.दिनांक:-०९ फेब्रुवारी, २०२४

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ४ था मजला, मंत्रालय विस्तार हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई-४०००३२.

Email ID: sm4.sesd-mh@gov.in

क्रमांक- माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/भाग-१/एसएम-४ प्रति,

दिनांक:-०९ फेब्रुवारी, २०२४

आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय :-

शासन निर्णय, दि. ०६.०२.२०२३ मधील मुद्या क्र. ५ संदर्भात मार्गदर्शन.

संदर्भ :-

१. शासन निर्णय क्रमांक माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/एसएम-४, दि.०६.०२.२०२३.

२. शासन परिपत्रक क्र. माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/एसएम-४, दि.२४.०४.२०२३.

३. आपले अ.शा.प.क्र. शिआका-२०२३/मुल्यांकन/मुदतवाढ/ आस्था क-माध्य/२६०८, दि.२५.०४.२०२३.

४. शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) यांचे पत्र क्र. प्राशिसं/खा.प्रा. शा.मु./टे-५०४/५८७६, दि.१८.०८.२०२३.

५. आपले अ.शा.प.क्र.शिसं/माध्य/विवक्षित-स्वयंअर्थ/२०२३- २४/एस-४/५२७५, दि.२८.०८.२०२३.

६. शासन पत्र क्र. बैठक-२०२२/प्र.क्र.१८७/एसएम-४, दि.१३.०९.२०२३.

७. शासन पत्र, क्र. माशाअ-२०२२/प्र.क्र.२४०/एसएम-४, दि.२६.०९.२०२३.

८. शासन पुरक पत्र, क्र. माशाअ-२०२२/प्र.क्र.२४०/एसएम-४, दि.२६.०९.२०२३.

९. शासन पत्र, क्र. बैठक-२०२३/प्र.क्र.३०९/एसएम-४,

दि.०३.०१.२०२४. १०. समक्रमांकाचे शासन परिपत्रक, दि.१२.०१.२० २४.

उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र. (२) येथील दिनांक २५ एप्रिल, २०२३ चे व संदर्भ

क्र. (४) येथील दिनांक २८ ऑगस्ट, २०२३ चे अर्ध शासकीय पत्र तसेच, संदर्भ क्र. (३) येथील

दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ चे पत्र कृपया पहावे.

२. आपल्या संदर्भाधीन पत्रांच्या अनुषंगाने तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन परिपत्रक, पत्र व पुरकपत्रास अनुसरुन आपणांस पुढील प्रमाणे कळविण्यात येत

आहे:-

१) शिक्षण संचालनालय (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर तसेच (विभागीय शिक्षण उपसंचालक / शिक्षणाधिकारी) यांच्या स्तरावर त्रुटींची पूर्तता झालेले प्रस्ताव शासन निर्णय, दिनांक ०६.०२.२०२३ मधील तरतूदीनुसार अनुदानासाठीची पात्रता तपासून पात्र शाळा/तुकड्या/वर्ग/अति. शाखांवरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अनुज्ञेय टप्पानुसार वेतन अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही आपलेस्तरावरुन करण्यात यावी.

तसेच, दि.११.११.२०२२ नंतर प्राप्त झालेल्या सर्व परिपूर्ण प्रस्तावांची शासन निर्णय, दि.०६.०२.२०२३ मधील तरतुदींनुसार अनुदानासाठीची पात्रता तपासून पात्र शाळा/ तुकड्या/वर्ग/अति. शाखा यावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अनुज्ञेय टप्पानुसार वेतन अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही आपलेस्तरावरुन करण्यात यावी. अशा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या घोषित/अघोषित शाळांची (२०%, ४०%, ६०%) यादी स्वतंत्रपणे शासनास सादर करण्यात यावी.

२) तसेच, शासन निर्णय, दिनांक ०६.०२.२०२३ मधील अटींची पुर्तता न केलेल्या व अद्यापही त्रुटीमध्ये असलेल्या शाळा (प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक) अथवा अनुदान मागणी सादर न केलेल्या शाळांना/तुकड्यांना महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ च्या नियम, ९ मधील तरतूदीच्या अधीन राहून, विशेषतः नियम ९ मधील परंतूकानुसार "विवक्षित स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ तुकडी" म्हणून मान्यता देण्याबाबत शासन परिपत्रक दि.१२.०१.२०२४ च्या परिच्छेद क्र. ४ नुसार प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा.

Bombe Ramz (समीर सावंत )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत आवश्यक त्या कार्यवाहीसाठी:-

* शिक्षण संचालक (प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.




















No comments:

Post a Comment

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular