राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्णयाचा मुलांना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य माध्यमिक व उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेला १० मिनिटांचा वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा दहावी, बारावीचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना चांगलाच फायदा होणार आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांसोबतच पालकांवरही मानसिक तणाव येतो. हा तणाव दूर करण्यासाठी शाळांमध्ये वेळोवेळी सराव परीक्षा घेतल्या जातात. असे असले तरी अनेक विद्यार्थी पेपर सोडविण्यास वेळ कमी पडला, अशी ओरड करीत असतात. कमी गुण मिळाल्यानंतरही पुरेसा वेळ नव्हता, एक प्रश्न सोडवायचा राहिला अशीही कारणे दिली जातात.
ही बाब पाहता प्रश्नपत्रिकेचे आकलन करण्यासाठी दहावी, बारावीतील परीक्षार्थीना आता दहा मिनिटे वेळ वाढवून मिळाला आहे. या दहा मिनिटात प्रश्नपत्रिकेचे आकलन करून पेपर सोडविण्यास परीक्षार्थीना वेळ मिळणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेत आता १० मिनिटे जास्त
दहावी-बारावीच्या परीक्षेत १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय यापूर्वी रद्द करण्यात आला होता; परंतु आता दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय झाला आहे.
दहावी, बारावीत एकसारखे विद्यार्थी नसतात. त्यामुळे हा निर्णय चांगला आहे. मुलांच्या परीक्षांचे ओझे असते. अनेकांना वेळ पुरत नाही. आता दहा मिनिटे अधिक मिळणार असल्याने मुलांना लाभ होईल. एकनाथ जाधव, पालक
इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी अधिक वेळ देण्याचा राज्य शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. यामुळे मुलांच्या मनावरील दडपण कमी होण्यास मदत होईल. - सर्जेराव कोल्हे, पालक
परीक्षेच्या ३० मिनिटे आधी हजर राहा !
१
दहावी, बारावीच्या परीक्षेत आपला क्रमांक कोणत्या हॉलमध्ये आला हे शोधताना परीक्षार्थीची धावपळ होते.
अनेकवेळा चेकिंगमध्येही 3 परीक्षार्थीचा मोठा वेळ जातो. त्यात परीक्षा हॉलमध्ये जाण्यास उशीर होतो.
यामुळे परीक्षार्थीनी पेपर सुरू • होण्याच्या ३० मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे गरजेचे आहे.
कोणाला काय वाटते?
विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी वर्षभर केली जाते; परंतु प्रसंगी पेपर लिहिताना वेळ कमी पडतो. आता दहा मिनिटे अधिक मिळणार असल्याने लाभ होईल आणि एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. - शिवांजली कोल्हे, विद्यार्थी
मुलं दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी करतात. त्यात आता वेळ मिळणार असल्याने प्रश्नपत्रिकेचे आकलन करता येईल. - प्रल्हाद वाघ, शिक्षणतज्ज्ञ
प्रश्नपत्रिकेचे आकलन होणार असल्याने मुलांचा लाभ होईल. मुलं प्रश्न समजून घेऊन त्याची उत्तरे
व्यवस्थित लिहितील. -भगवान परिहार, शिक्षणतज्ज्ञ
सध्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेची विद्यार्थ्यांकडून तयारी सुरू आहे. त्यात आता परीक्षेमध्ये दहा मिनिटे अधिक वेळ मिळत असल्याने आम्हाला पेपर सोडविण्यास चांगली मदत होईल, जय जाधव, विद्यार्थी

No comments:
Post a Comment