महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय, (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य, शिवाजी नगर, पुणे- ४११ ०१६
Web: www.dhepune.gov.in E-Mail: vishi dhepune@gov.in
फोन नं.०२०/२६१२२११९/२६०५१५१२.२६१३०६२७.२६१२४६३९
फॅक्स नं.०२०/२६११११५३
क्र.संकीर्ण २०२४/ संकीर्ण/वि/विशि/ १943
दि. १६-०२-२०२४ 11 6 FEB 2024
कालमर्यादा
प्रति.
कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे, उच्च शिक्षण.
विषय :- एम.फील. अर्हता धारण केलेल्या अध्यापकांना नेट परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यासंदर्भातील माहिती.
संदर्भ :- शासन पत्र क्र.संकीर्ण-२२०४/प्र.क्र.११/विशि-१ दिनांक ३१ जानेवारी २०२४.
उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भीय शासनपत्र पहावे. (प्रत सोबत जोडली आहे.)
प्रस्तुत शासनपत्रान्वये खालील मुद्यांची माहिती सादर करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.
१. दिनांक १ जानेवारी १९९४ ते ११ जुलै २००९ या कालावधतील एम.फिल. ही पदवी प्राप्त केली होती, त्यांचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगास सादर करण्यात आला होता, तथापि आयोगाने नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून नावानिशी सूट दिली नाही अश्या अध्यापकांची माहिती.
२. दिनांक १ जानेवारी १९९४ ते ११ जुलै २००९ या कालावधीत एम.फिल. ही पदवी प्राप्त केली होती, परंतू त्यांचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगास सादर करण्यात आला नव्हता अश्या अध्यापकांची माहिती.
वरील मुद्यांच्या अनुषंगाने आपल्या विद्यापीठातील व अधिनस्त अनुदानित महाविद्यालयातील
अध्यापकांची माहिती सोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्रामध्ये संबंधीत कागदपत्रांसह सादर करण्यात यावी.
सदरचीमाहिती प्रथम प्राध्यान्याने संकलीत करण्यात येऊन दिनांक २७.०२.२०२४ पर्यंत दोन प्रतीमध्ये सादर करण्यात यावी.
(डॉ. शैलेंद्र देवळाणकर) शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
प्रतः- मा.प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय विस्तार भवन मुंबई यांचेकडे माहितीस्नन सविनय सादर.
परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
CLICK HERE ..
👆👆👆👆👆👆👆
No comments:
Post a Comment