14 February 2024

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी महत्त्वाची सूचना..

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी महत्त्वाची सूचना आज दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत पसंतीक्रम जनरेट व लॉक करण्याची प्रक्रिया सुरू राहील व रात्री बारा वाजता पसंतीक्रम लॉक होण्याची प्रक्रिया पवित्र पोर्टल वरून बंद केली जाणार आहे.या सर्व प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस आहे.यापुढे कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना मुदतवाढ मिळणार नाही.त्यामुळे राहिलेल्या सर्व अभियोग्यता धारकांनी आपले पसंतीक्रम आज वेळेच्या आत लॉक करून घ्यावे व शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पुढील होणारा विलंब टाळावा. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी एंडिंग पर्यंत पवित्र पोर्टलवर सर्व व्यवस्थापनांच्या शिफारस पात्र याद्या जाहीर करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. शिक्षक भरतीच्या शिफारस पात्र यादीतील सर्व उमेदवारांनी अभियोग्यता धारकांनी शिक्षक भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी आपले सर्व कागदपत्र पडताळणीसाठी व्हेरिफिकेशन साठी आपली सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार करून ठेवावेत त्यात मूळ कागदपत्रांचा एक संच व त्याबरोबर झेरॉक्स प्रतीचे दोन संच स्वतःजवळ स्व साक्षांकित करून ठेवावे व कागदपत्र पडताळणीसाठी सज्ज राहावे.

No comments:

Post a Comment

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular