21 February 2024

दिनांक २१/०२/२०२४ शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक



• पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे. या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक १४/०२/२०२४ अखेर प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आले आहेत.

• उमेदवारांच्या अध्यापनाच्या विषयाचे गट, माध्यम, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये 2022 प्राप्त केलेले गुण, उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण, विषय इत्यादी बाबींची संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे.

• संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणतत्ता यादी जाहीर करण्यात येईल.

• सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सूरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे.

No comments:

Post a Comment

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular