29 February 2024

इयत्ता पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत शासन निर्णय दि. ०७ डिसेंबर २०२३ नुसार अंमलबजावणी करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

संपर्कक्रमांक (०२०) २४४७ ६९३८

७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०

E-mail: evaluationdept@maa.ac.in

जा.क्र. रारीसंप्रपम/इयत्ता ५ वी व ८ वी वार्षिक परीक्षा/मूल्यमापन/२०२३-२४/१०५४ दि.२८/०२/२०२४

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)..

) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).

२ ३) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई.

४) शिक्षणाधिकारी, प्राथमिक/माध्यमिक जि.प. (सर्व),

५) शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई.

६) प्रशासनाधिकारी, मनपा/नपा, (सर्व).

विषय : इयत्ता पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत शासन निर्णय दि. ०७ डिसेंबर २०२३ नुसार अंमलबजावणी करणेबाबत...

संदर्भ :-१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९

२. शासन निर्णय क्र. पीआरई/२०१०/११३६) १०/प्राशि-५, दि. २० ऑगस्ट २०१० ३. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ दि २०११ ऑक्टोबर ११.

४. शासन निर्णय क्र.६. डी.एस/१७/११८/२०१७/ संकीर्ण दि १६ ऑक्टोबर २०१८

५. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम) सुधारणा, २०१९

दि. ११ जानेवारी २०१९

६. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०२३ (सुधारणा) दि २०२३मे २९.

७. शासन निर्णय क्र/२७६ प्रक्क्र/ २०२२-आरटी ई. एस दि १. डी.०७ डिसेंबर २०२३

८. या कार्यालयाचे पत्र क्र. जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन पाचवी आठवी / परीक्षासचूना-२०२३/ २४/०६२९७ दि. २८ डिसेंबर २०२३

९. या कार्यालयाचे पत्र क्र.जा.क्र.रा.शै.सं.प्र.प.म./वि. वाटप/आस्था- १/२/२०२३/०८९७

दि.२०.०२.२०२४

उपरोक्त संदर्भीय विषयांन्दये, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम २०२३ (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता ५ वी व ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन पद्धती २०२३-२४ पासून लागू करणेबाबत संदर्भ क्र. ७ नुसार निक्षित करणेत आलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार अंमलबजावणी संदर्भात नियोजन करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क्र. ७ मध्ये नमूद केल्यानुसार राज्य नियंत्रण समिती गठीत करणेत आलेली आहे. संदर्भ क्रमांक ८ अन्वये आपणास सनियंत्रण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त मधील सूचना व संदर्भ क७ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाहीची अंमलबजावणी

करणेबाबत कळविण्यात आले होते. संदर्भ क्रमांक ८ अन्वये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांना इयत्ता ५ वी व ८ बीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून पुरविण्यात येतील असेही कळविण्यात आले होते. तथापि संदर्भ क्र. ७ व ९ अन्वये शासन निर्णयानुसार सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळास्तरावर तयार करणेत याव्यात असे नमूद केलेले असल्याने इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करणेबाबत आपल्या अधिनिस्त सर्व शाळांना अवगत करावे, इयत्ता ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव होणेकरिता परिषदेच्या वेबसाईटवर नमुना सराव प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते अपलोड केलेले आहेत. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी त्यांचे स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करणे तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये शासन निर्णयानुसार इयत्ता ५ वी व ८ वी च्या वार्षिक परीक्षेबाबत कार्यवाही करणेबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना अवगत करावे.

सोबत :- शासन निर्णय दिनांक ०७ डिसेंबर २०२४

14 29/02/25 (राहूल रेखावार, भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व

प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व कला क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२. २. मा(शिक्षण) आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे.

३. मा.राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण मुंबई.
सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी CLICK HERE 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻




No comments:

Post a Comment

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular