14 February 2024

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी महत्त्वाची सूचना..

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी महत्त्वाची सूचना आज दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत पसंतीक्रम जनरेट व लॉक करण्याची प्रक्रिया सुरू राहील व रात्री बारा वाजता पसंतीक्रम लॉक होण्याची प्रक्रिया पवित्र पोर्टल वरून बंद केली जाणार आहे.या सर्व प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस आहे.यापुढे कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना मुदतवाढ मिळणार नाही.त्यामुळे राहिलेल्या सर्व अभियोग्यता धारकांनी आपले पसंतीक्रम आज वेळेच्या आत लॉक करून घ्यावे व शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पुढील होणारा विलंब टाळावा. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी एंडिंग पर्यंत पवित्र पोर्टलवर सर्व व्यवस्थापनांच्या शिफारस पात्र याद्या जाहीर करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. शिक्षक भरतीच्या शिफारस पात्र यादीतील सर्व उमेदवारांनी अभियोग्यता धारकांनी शिक्षक भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी आपले सर्व कागदपत्र पडताळणीसाठी व्हेरिफिकेशन साठी आपली सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार करून ठेवावेत त्यात मूळ कागदपत्रांचा एक संच व त्याबरोबर झेरॉक्स प्रतीचे दोन संच स्वतःजवळ स्व साक्षांकित करून ठेवावे व कागदपत्र पडताळणीसाठी सज्ज राहावे.

SSC EXAM Checker login बाबत सुचना


१) Maker ने नोंदविलेले अनिलाईन गुण तपासण्याकरीता इ १२ वी करीता प्राचार्य / उपप्राचार्य यांनी Jxxxxxxx1mLogin ID तर १० वी करीता मुख्याध्यापक यांनी Sxxxxxxx 1 Login ID बापरणे आवश्यक आहे, Checker ने तपासणी करूनय गुण मंडळाकडे अग्रेषीत करावयाचे आहेत. त्याचप्रमाणे गुण नोंदविण्याच्या सर्व कार्याकरीता पूर्णतः गोपनीयता राहील याची दक्षता घ्यावयाची आहे.

अतिरिक्त बैठक क्रमांक / विषयबदल गुण नोंदविणेबाबत सुचना

१) इ १० वी / इ १२ वी फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेचे प्रात्यक्षिक / अंतर्गात मुल्यमापन परिक्षेचे अनिलाईन पध्दतीने गुण नोंदविताना जर विद्याथ्यांचे आवेदनपत्रे उशीरा अतिविलंब शुल्क भरून जमा केली असतील व त्यांचे बैठक क्रमांक ऑनलाईन पध्दतीमध्ये उपलब्ध नसतील तर त्यांचे गुण प्रचलीत पद्धतीप्रमाणे विहीत नमुन्यात संबंधीत विभागीय मंडळाकडे निर्धारीत तारखेस जमा करावयाचे आहेत.

२) ऑनलाईन पध्दतीने गुण नोंदविताना जर एखा‌द्या विद्यार्थ्यांच्या विषयात बदल असेल तर असा विद्याथ्यांना ऑनलाईन पध्दतीने मुळ विषयास "AA" दर्शवून बदललेल्या विषयाचे गुण प्रचलीत पदधतीप्रमाणे विहीत नमुन्यात सबंधीत विभागीय मंडळाकडे निर्धारीत तारखेस जमा करावयाचे आहेत.

माध्यम बदलाबाबत सुचना

१) ३.११ वी १२ वी फेब्रुवारी-मार्च २०१४ परीक्षेचे प्रात्यक्षिक/अंतर्गत मुल्यमापनाचे गुण नोंदविताना जर विद्याथ्यांचे माध्यम चुकीचे आढळल्यास त्या विषयासमोर गुण नोंदविण्यात येवून माध्यमबद‌लाबाबत स्वतंत्रपणो विभागीय मंडळास कळविण्यात यावे.



13 February 2024

जलसंपदा विभाग फायनल रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली आहे.

जलसंपदा विभाग फायनल रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली आहे.

लॉगिन लिंक👇👇👇👇

शिक्षक पदभरतीबाबत तातडीची सूचना,प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया दि. 14/02/2024 पर्यंत

दिनांक 13/02/2024

• शिक्षक पदभरतीबाबत तातडीची सूचना *

पवित्र पोर्टलवर दिनांक 05/02/2024 पासून प्रचलित शासन धोरण व निर्देशानुसार प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून आजपर्यंत 1,41,806 अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले असून त्यापैकी 1,37,063 लॉक देखील केले आहेत.

दरम्यान मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्र. 1606/2024 मध्ये आज सुनावणी झाली. त्यानंतर मा न्यायालयाने प्रचलित शासन धोरण व तरतुदीनुसारच कार्यवाही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत तसेच

प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया दि. 14/02/2024 पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी

भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये, याकरता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत...





शासन निर्णय, दि. ०६.०२.२०२३ मधील मुद्या क्र. ५ संदर्भात मार्गदर्शन.दिनांक:-०९ फेब्रुवारी, २०२४

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ४ था मजला, मंत्रालय विस्तार हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई-४०००३२.

Email ID: sm4.sesd-mh@gov.in

क्रमांक- माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/भाग-१/एसएम-४ प्रति,

दिनांक:-०९ फेब्रुवारी, २०२४

आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय :-

शासन निर्णय, दि. ०६.०२.२०२३ मधील मुद्या क्र. ५ संदर्भात मार्गदर्शन.

संदर्भ :-

१. शासन निर्णय क्रमांक माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/एसएम-४, दि.०६.०२.२०२३.

२. शासन परिपत्रक क्र. माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/एसएम-४, दि.२४.०४.२०२३.

३. आपले अ.शा.प.क्र. शिआका-२०२३/मुल्यांकन/मुदतवाढ/ आस्था क-माध्य/२६०८, दि.२५.०४.२०२३.

४. शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) यांचे पत्र क्र. प्राशिसं/खा.प्रा. शा.मु./टे-५०४/५८७६, दि.१८.०८.२०२३.

५. आपले अ.शा.प.क्र.शिसं/माध्य/विवक्षित-स्वयंअर्थ/२०२३- २४/एस-४/५२७५, दि.२८.०८.२०२३.

६. शासन पत्र क्र. बैठक-२०२२/प्र.क्र.१८७/एसएम-४, दि.१३.०९.२०२३.

७. शासन पत्र, क्र. माशाअ-२०२२/प्र.क्र.२४०/एसएम-४, दि.२६.०९.२०२३.

८. शासन पुरक पत्र, क्र. माशाअ-२०२२/प्र.क्र.२४०/एसएम-४, दि.२६.०९.२०२३.

९. शासन पत्र, क्र. बैठक-२०२३/प्र.क्र.३०९/एसएम-४,

दि.०३.०१.२०२४. १०. समक्रमांकाचे शासन परिपत्रक, दि.१२.०१.२० २४.

उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र. (२) येथील दिनांक २५ एप्रिल, २०२३ चे व संदर्भ

क्र. (४) येथील दिनांक २८ ऑगस्ट, २०२३ चे अर्ध शासकीय पत्र तसेच, संदर्भ क्र. (३) येथील

दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ चे पत्र कृपया पहावे.

२. आपल्या संदर्भाधीन पत्रांच्या अनुषंगाने तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन परिपत्रक, पत्र व पुरकपत्रास अनुसरुन आपणांस पुढील प्रमाणे कळविण्यात येत

आहे:-

१) शिक्षण संचालनालय (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर तसेच (विभागीय शिक्षण उपसंचालक / शिक्षणाधिकारी) यांच्या स्तरावर त्रुटींची पूर्तता झालेले प्रस्ताव शासन निर्णय, दिनांक ०६.०२.२०२३ मधील तरतूदीनुसार अनुदानासाठीची पात्रता तपासून पात्र शाळा/तुकड्या/वर्ग/अति. शाखांवरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अनुज्ञेय टप्पानुसार वेतन अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही आपलेस्तरावरुन करण्यात यावी.

तसेच, दि.११.११.२०२२ नंतर प्राप्त झालेल्या सर्व परिपूर्ण प्रस्तावांची शासन निर्णय, दि.०६.०२.२०२३ मधील तरतुदींनुसार अनुदानासाठीची पात्रता तपासून पात्र शाळा/ तुकड्या/वर्ग/अति. शाखा यावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अनुज्ञेय टप्पानुसार वेतन अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही आपलेस्तरावरुन करण्यात यावी. अशा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या घोषित/अघोषित शाळांची (२०%, ४०%, ६०%) यादी स्वतंत्रपणे शासनास सादर करण्यात यावी.

२) तसेच, शासन निर्णय, दिनांक ०६.०२.२०२३ मधील अटींची पुर्तता न केलेल्या व अद्यापही त्रुटीमध्ये असलेल्या शाळा (प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक) अथवा अनुदान मागणी सादर न केलेल्या शाळांना/तुकड्यांना महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ च्या नियम, ९ मधील तरतूदीच्या अधीन राहून, विशेषतः नियम ९ मधील परंतूकानुसार "विवक्षित स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ तुकडी" म्हणून मान्यता देण्याबाबत शासन परिपत्रक दि.१२.०१.२०२४ च्या परिच्छेद क्र. ४ नुसार प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा.

Bombe Ramz (समीर सावंत )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत आवश्यक त्या कार्यवाहीसाठी:-

* शिक्षण संचालक (प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.




















12 February 2024

शिक्षक भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी.


लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक भरती प्रकरणी दिलेल्या अंतरिम आदेशावर औरंगाबाद खंडपीठात मंगळवारी सुनावणी होत आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी मुदतवाढ मिळू शकते. तसेच यामुळे भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

सेमी इंग्रजी शाळांमध्ये मराठी उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा मिळावी यासाठी मराठी माध्यमाच्या उमेदवारांनी ७ फेब्रुवारीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर दि. ९ रोजी सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने मराठी

माध्यमाच्या उमेदवारांना सेमी इंग्रजी शाळेसाठी प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा अंतरिम आदेश दिला आहे. मात्र, त्यावर शिक्षण आयुक्त कार्यालयातर्फे शासनाची बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती केली असून यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

बी.सी.ए. उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नाहीत. ई- मेलवरून तक्रार करूनही त्यांना अनेक दिवस उत्तर, स्पष्टीकरण मिळाले नाही त्यामुळे या उमेदवारांचीही कोंडी झाली असून त्यांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, रविवार ११ फेब्रुवारीअखेर सव्वा लाख उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले होते.


शिक्षक पदभरतीबाबत तातडीची सूचना दिनांक 12/02/2024



पवित्र पोर्टलवर दिनांक ०५/०२/२०२४ पासून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून व आजपर्यंत १,४१,४४७ अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत. तर १,३५,८५५ अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम लॉक देखील केले आहेत.

दरम्यान मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक (स्टॅम्प) ४५३८/२०२४ रिट याचिका क्रमांक १७५८/२०२४, १७५९१/२०२४, १६०६/२०२४ दाखल याचिकांमध्ये निर्देश झाले आहेत. रिट याचिका क्रमांक १६०६/२०२४ या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. रिट याचिका क्रमांक १६०६/२०२४ मधील याचिकाकर्त्याची मागणी विचारात घेता त्या संदर्भात न्यायालयाचे स्पष्ट निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील टप्यावरील कार्यवाही करता येत नसल्याने प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक १३/०२/२०२४ पर्यंत पुढे सुरू ठेवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवार व संबंधितांनी नोंद घ्यावी.


11 February 2024

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक दिनांक ११/०२/२०२४..

शंका समाधान -

• इ. ६ वी ते ८ वी व इ ९ वी ते १० वी या गटातील केवळ बी. कॉम. अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवीस्तरावर प्रचलित तरतुदीतील मुख्य विषय घेवून उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाहीत. बी.कॉम. सह अन्य अर्हता धारण करीत असतील तर त्या त्या अर्हतेनुसार पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. उदा. १. बी. कॉम. अर्हतेनंतर एम. कॉम अर्हता धारण करीत असल्यास त्यांना पात्रतेनुसार इ ११ वी ते १२ वी चे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. २. असा उमेदवार बी.कॉम. अर्हतेसह डी.एड. असेल व टिईटी-१/सिटीईटी- १ असेल तर इ१ ली ते ५ वी चे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील.

• इ. ६ वी ते ८ वी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास, भूगोल व सामाजिकशास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवीस्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र व लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे उमेदवार पात्र राहतील.

• काही उमेदवारांना शासन निर्णय दिनांक २८/०३/२००६ नंतर जन्मलेल्या हयात अपत्यांची संख्या २ पेक्षा अधिक (अपवाद दुसऱ्या अपत्याचे वेळी जुळे अथवा तिळे जन्म असल्यास) असल्याने असे उमेदवार नोकरीसाठी पात्र नाहीत, यास्तव या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत.

• स्थानिक स्वराज्य संस्था (इ.१ ली ते १२ वी) व खाजगी संस्थातील (इ.१ ली ते ८ वी) पदभरतीसाठी शासन निर्णय दि.०१/०१/२०१९, ०७/०२/२०१९, २५/०२/२०१९, १६/५/२०१९, १२/०६/२०१९, १०/११/२०२२ मधील तरतुदीनुसार गट व गटातील विषयासाठी व वयासाठी विचारात घेण्यात आलेले आहे.

इ.१ ली ते इ ५ वी -इ.१२ मध्ये खुला प्रवर्ग-किमान ४५ टक्के / आरक्षित ४० टक्के

इ.६ वी

ते इ ८ वी पदवीमध्ये खुला प्रवर्ग-किमान ४५ टक्के / आरक्षित ४० टक्के वी ते १० वी पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग- किमान ५० टक्के

इ. ९

इ.११ वी ते १२ वी -पदव्युतर पदवीमध्ये खुला व आरक्षीत प्रवर्ग किमान ५० टक्के

वयोमर्यादा-शासन निर्णय दिनांक १०/११/२०२२ मधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजेच जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर दिनांक १६/१०/२०२३ रोजी दिली आहे. यास्तव उमेदवाराचे वय दिनांक २३/१०/२०२३ रोजीचे विचारात घेण्यात आले आहे.

• खाजगी संस्थातील रिक्त पदासाठी इ.९ वी ते १० वी साठी पदवीस्तरावर उत्तीर्ण श्रेणी व इ ११ वी ते १२ बी साठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे, तसेच कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही.

उमेदवारास त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. उमेदवार त्यांच्या सोईनुसार पसंतीक्रम नमूद करुन प्राधान्यक्रम लॉक करणार आहे. तथापि, उमेदवारास बंधनकारक सर्व प्राधान्यक्रम लॉक करणे बंधनकारक नाही. तसेच उमेदवार त्यांच्या सोईनुसार प्राधान्यक्रम लॉक करु शकतात.

• उमेदवारास सध्या आलेल्या जाहिरातीनुसार त्याच्या सोईचे पदे नसल्यास उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नव्याने जाहिराती आल्यास त्यास तो पात्र राहणार आहे.

• उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केले त्या क्रमाने गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतरच्या प्राधान्यक्रम विचारात घेतले जात नाही.

उमेदवाराची मुलाखतीशिवाय या प्रकारातील ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक केल्यास ते उमेदवाराच्या सोईचे होणार आहे.

• उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्यांच्या स्वप्रमाणात नोंद केलेले माहितीनुसार होत आहेत, यास्तव उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी/अधिक होत असल्यास उमेदवारांनी सर्वप्रथम नोंद केलेली माहिती तपासावी.




ऑनलाईन पद्धतीने गुण भरणेबाबत महत्त्वपूर्ण पत्र.

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education S.R.No.832-A, Final Plot No. 178,179, Near Balchitrawani, Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar Pune-411004,

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, स.न.८३२ ए. का.पी.नं.१७८, १७९, बालचित्रवाणी शेजारी, आधारकर रिसर्च इन्टिट्यूटच्या मागे, भांबुर्ड, शिवाजीनगर, पुणे-४११००४

Tel: Chairman (P): STD. (020)-25651751 Secretary (P): 25651750 & EPABX -25705000 & Email: secretary.stateboard@gmail.com

परीक्षा प्राधान्य/महत्वाचे

प्रति,

क्र.रा.मं./परीक्षा-२/ 572 पुणे-४११००४

विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व विभागीय मंडळे,

दिनांक-०९/०२/२०२४

विषय- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा मार्च २०२४ चे प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरणेबाबत.....

संदर्भ - १. या कार्यालयाचे पत्र क्र. रा.मं./परीक्षा-२/५५०८ दि.२६/१२/२०२३ २. या कार्यालयाचे पत्र क्र. रा.मं./गणकयंत्र/१/१७८ दि.१५/०१/२०२४

उपरोक्त विषयी संदर्भिय पत्रे पहावीत, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च २०२४ चे प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरणेबाबतच्या सूचना संदर्भिय पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

१) मार्च २०२४ मधील इयत्ता १० वी प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी इ. परीक्षेचे गुण भरण्यासाठी "Internal/Practical Marks & Grades" (SSC) ही लिंक मंडळाचे संकेतस्थळ www.mahahsscboard.in चर प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन करण्यासाठी सोमवार, दिनांक १२/०२/२०२४ पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्म माध्यमिक शाळांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आवेदनपत्राच्या शाळा Login मध्ये विषयनिहाय Blank Marksheet या प्रात्यक्षिक परीक्षा नियोजनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सदर बाब आपल्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्यावी.

२) इ.१२वी परीक्षेतील ऑनलाईन गुण नोंदविण्याकरीता Login id (Jxxxxxx_1) हा प्राचार्य/उपप्राचार्य यांचेसाठी असून इ.१०वी करीता Login id (Sxxxxxx_1) हा शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी असून त्यांनीच Checker म्हणून काम करावयाचे आहे व गुण मंडळाकडे तपासून अग्रेषित करावयाचे आहेत.

३) गुण नोंदविताना त्याची पूर्णतः गोपनीयता राहील याची सर्व संबंधित प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी दक्षता घ्यावी. ४) अतिविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये भरलेल्या व या Online System मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध झाले नाहीत अथवा विद्याथ्याने विषय बदल केला आहे. अशा सर्व विद्याथ्यांचे गुण प्रचलित पध्दतीने निर्धारित तारखेस विभागीय मंडळामध्ये जमा करावयाचे आहेत.

उपरोक्त प्रमाणे इ.१०वी व ३.१२वीच्या ONLINE गुणांसंदर्भातील सर्व बाबी आपल्या कार्यकक्षेतील सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात.

quey

( अनुराधा ओक) सचिव

राज्य मंडळ, पुणे ०४.

प्रत माहितीस्तव-

व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्य मंडळ, पुणे

10 February 2024

यंदा पेपर चांगला जाणार; दहावी, बारावीला १० मिनिटे जास्त !


राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्णयाचा मुलांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : राज्य माध्यमिक व उच्च

माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेला १० मिनिटांचा वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा दहावी, बारावीचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना चांगलाच फायदा होणार आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांसोबतच पालकांवरही मानसिक तणाव येतो. हा तणाव दूर करण्यासाठी शाळांमध्ये वेळोवेळी सराव परीक्षा घेतल्या जातात. असे असले तरी अनेक विद्यार्थी पेपर सोडविण्यास वेळ कमी पडला, अशी ओरड करीत असतात. कमी गुण मिळाल्यानंतरही पुरेसा वेळ नव्हता, एक प्रश्न सोडवायचा राहिला अशीही कारणे दिली जातात.

ही बाब पाहता प्रश्नपत्रिकेचे आकलन करण्यासाठी दहावी, बारावीतील परीक्षार्थीना आता दहा मिनिटे वेळ वाढवून मिळाला आहे. या दहा मिनिटात प्रश्नपत्रिकेचे आकलन करून पेपर सोडविण्यास परीक्षार्थीना वेळ मिळणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेत आता १० मिनिटे जास्त

दहावी-बारावीच्या परीक्षेत १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय यापूर्वी रद्द करण्यात आला होता; परंतु आता दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय झाला आहे.

दहावी, बारावीत एकसारखे विद्यार्थी नसतात. त्यामुळे हा निर्णय चांगला आहे. मुलांच्या परीक्षांचे ओझे असते. अनेकांना वेळ पुरत नाही. आता दहा मिनिटे अधिक मिळणार असल्याने मुलांना लाभ होईल. एकनाथ जाधव, पालक

इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी अधिक वेळ देण्याचा राज्य शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. यामुळे मुलांच्या मनावरील दडपण कमी होण्यास मदत होईल. - सर्जेराव कोल्हे, पालक

परीक्षेच्या ३० मिनिटे आधी हजर राहा !


दहावी, बारावीच्या परीक्षेत आपला क्रमांक कोणत्या हॉलमध्ये आला हे शोधताना परीक्षार्थीची धावपळ होते.

अनेकवेळा चेकिंगमध्येही 3 परीक्षार्थीचा मोठा वेळ जातो. त्यात परीक्षा हॉलमध्ये जाण्यास उशीर होतो.

यामुळे परीक्षार्थीनी पेपर सुरू • होण्याच्या ३० मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे गरजेचे आहे.

कोणाला काय वाटते?

विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी वर्षभर केली जाते; परंतु प्रसंगी पेपर लिहिताना वेळ कमी पडतो. आता दहा मिनिटे अधिक मिळणार असल्याने लाभ होईल आणि एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. - शिवांजली कोल्हे, विद्यार्थी

मुलं दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी करतात. त्यात आता वेळ मिळणार असल्याने प्रश्नपत्रिकेचे आकलन करता येईल. - प्रल्हाद वाघ, शिक्षणतज्ज्ञ

प्रश्नपत्रिकेचे आकलन होणार असल्याने मुलांचा लाभ होईल. मुलं प्रश्न समजून घेऊन त्याची उत्तरे

व्यवस्थित लिहितील. -भगवान परिहार, शिक्षणतज्ज्ञ

सध्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेची विद्यार्थ्यांकडून तयारी सुरू आहे. त्यात आता परीक्षेमध्ये दहा मिनिटे अधिक वेळ मिळत असल्याने आम्हाला पेपर सोडविण्यास चांगली मदत होईल, जय जाधव, विद्यार्थी































Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular