Whats app समुह क्रमांक 1
- शिक्षक मित्र WHAT'S APP GROUP
- TAIT WHAT'S APP GROUP
- EDUCATIONAL BLOG GROUP
- YOUTUBE CHANNEL
- TELEGRAM
- CONTACT ME 1
- CONTACT ME 2
- इ.१ली ते १२ वी पाठ्यपुस्तके
- Udise Plus
- Student Database
- आधार कार्ड Official website
- समाज कल्याण विभाग शिष्यवृत्ती जि. प.जळगांव.
- परीक्षा परिषद, पुणे.
- परीक्षा परिषद निकाल.
- महाराष्ट्र शासन निर्णय..
- स्कॉलरशिप परीक्षा लिंक.
- SSC, NASIK BOARD LINK
- IFSC CODE SEARCH LINK.
- स्कॉलरशिप परीक्षा हॉलतिकीट सन 2023
- नवोदय परीक्षा form Link
- मध्यान्ह भोजन योजना ONLINE LINK.
- राष्ट्रगीत
- इतनी शक्ती हमे देना दाता प्रार्थना..
- संपूर्ण शालेय परिपाठ mp3
30 December 2024
कोणतेही कारण नसताना देखील करता येणार जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज.
28 December 2024
सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग पुणे सरळसेवा भरती..
09 December 2024
17 October 2024
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे..
07 October 2024
Pre Primary School Council Bharti 2024 | 10वी पास ते पदव्युत्तर उमेदवारांना संधी; महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुका अंतर्गत रिक्त पदांच्या 1509 जागांसाठी पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत मध्ये नवीन भरती जाहीर!!
06 October 2024
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत...
राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्याधर्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.
१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)
२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)
३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)
४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट
५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)
प्रस्तुत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पहिल्या टप्प्यात उपरोक्त गट क्र. १ ते ३ साठी जिल्हा स्तरावर व गट क्र. ४ व ५ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (विभाग) स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी whats app, वर्तमानपत्र यासारख्या प्रसार माध्यमांच्याद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी. यासाठी प्राचार्य, डाएट व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद यांनी एकमेकांशी समन्वय साधावा. आपल्या स्तरावरून स्पर्धेबाबत आणि सोबत दिलेले माहितीपत्रक अवलोकन करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी अधिनस्त कार्यालयातील सर्व गटातील स्पर्धकांना याबाबत अवगत करावे.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
14 September 2024
शिक्षण सेवकांची ३ वर्ष सेवा झाल्यावर सेवेत नियमित होण्यासाठी पुन्हा परिषदेकडून परीक्षा घेणार असल्याच्या वर्तमान पत्रातील बातमीवरून शालेय शिक्षणमंत्री, मा.दिपकजी केसरकर यांची प्रेसनोट जारी....
12 September 2024
आता जन्म दाखला, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्रामपंचायतीत जाण्याची गरज नाही, 'या' एप्लीकेशनमधून सर्व कागदपत्रे मिळणार
09 September 2024
TET Notification २०२४__२०२५ संपूर्ण वेळापत्रक..
05 September 2024
२० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत कंत्राटी पद्धतीवर शिक्षक नेमणे शासन आदेश दिनांक -५/९/२०२४
02 September 2024
UDISE PORTAL ला नाव, जन्म तारीख,बदल, लिंग,आधार क्रमांक,आधार कार्ड नुसार नाव, वर्ग आणि section इत्यादी मध्ये बदल करायचा असल्यास BEO LOG IN वरून अर्ज देऊन बदल करू शकता.
25 August 2024
INSPIRE AWARD 2024 --2025 ची माहिती भरण्यासाठी अंतिम मुदत 15/09/2024...
16 July 2024
नवोदय प्रवेश परीक्षा २०२५ : नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी ऑनलाइन फॉर्म भरणे बाबत JNVST 2025 साठी ऑनलाइन नोंदणी पोर्टल सुरू...
नवोदय प्रवेश परीक्षा सन 2024 ( इ ६वी ) शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वा.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.
For Official website
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
25 May 2024
दहावी परीक्षा मार्च 2024दिनांक 27/5/2024ला ऑनलाईन होणार जाहीर.. ऑनलाईन निकाल बघण्यासाठी खाली दिलेल्या LINK ला CLICK करावे.
20 May 2024
दिनांक 21/05/2024 ला दुपारी 1:00 वाजता जाहीर होणार वर्ग 12वी चा निकाल.
१.👉🏻👉🏻👉🏻 maharesult.nic.in
२.👉🏻👉🏻👉🏻 http://hscresult.mkcl.org
३.👉🏻👉🏻👉🏻 www.mahahsscboard.in
30 April 2024
वर्ग 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अंतरिम निकाल जाहीर MSCE Pune
21 April 2024
मतदानानंतर १,०६७ शिक्षण सेवकांच्या हाती नियुक्तीपत्र निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिक्षणसेवक नियुक्तीचा प्रश्न सुटला; आचारसंहितेमुळे भरतीला स्थगिती
मतदानानंतर १,०६७ शिक्षण सेवकांच्या हाती नियुक्तीपत्र निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिक्षणसेवक नियुक्तीचा प्रश्न सुटला; आचारसंहितेमुळे भरतीला स्थगिती
20 April 2024
19 April 2024
दिनांक 19/04/2024 चे पवित्र पोर्टल शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक. 👇🏻👇🏻
15 April 2024
आरटीई प्रवेशः आजपासून भरा ऑनलाइन अर्ज...
10 April 2024
मराठा SEBC जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे? 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
08 April 2024
दहावी, बारावी (2024)बोर्ड परीक्षेची फी परत भेटणार ; तुमचे नाव यादीत आहे का असे चेक करा.
07 April 2024
बीएड, बीपीएड, एमपीएड सीईटीचा निकाल जाहीर..
06 April 2024
रयत'ची भरती प्रक्रिया रखडली रिक्त पदावर काम करणाऱ्यांना नेमणुकीची अपेक्षा..
03 April 2024
आरटीई २५ टक्के २०२४ -२५ ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील सुधारित अधिसूचना दिनांक ९.०२.२०२४ नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई २५ टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. वंचित, दुर्बल व सामाजिक व शेक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे. तथापि एखादया पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची/शासकीय शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा / शासकीय शाळा निवडता येईल.
विद्याध्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा नसतील व १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वंय अर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाव्यीत शाळेत मुलांना २५ टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल.
अपवादात्मक परिस्थितीत विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा नसेल तर विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमाने होतील.
वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश अंतर्गत प्रवेशासाठी खालील व्यवस्थापनाच्या शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
शाळा व्यवस्थापन
- महानगरपालिका शाळा (Municipal Corporation)
- नगरपालिका/नगरपरिषद/नगर पंचायत शाळा (Nagar Palika/Nagar
- Parishad/Nagar Panchayat)
- कॅन्टोमेंट बोर्ड शाळा (Contonment Board)
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (Zilla Parishad (Primary))
- महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यीत) (Municipal Corporation (self funded))
- जिल्हा परिषद (माजी शासकीय) (Ex.Govt)
- खाजगी अनुदानित (Private Aided) (अंशतः अनुदानित शाळा वगळून)
- स्वंयअर्थसहाव्यात शाळा (Self Financed)
टिप: आरटीई कायदयानुसार २५ टक्के प्रवेशाकरिता अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आलेले आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता पात्र शाळा नोंदणी केल्यानंतर व आरटीई २५ टक्के अंतर्गत विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर कालांतराने जर सदर शाळेस सक्षम प्राधिकारी यांचेकडुन अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झाल्यास आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून इयत्ता ८ वी पर्यंत किंवा त्या शाळेतील शेवटच्या आरटीई अंतर्गत पात्र वर्गापर्यंत आरटीई २५ टक्के मधून शिक्षण देणे अनिवार्य राहील. तसेच अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्यापुढील वर्षाकरीता सदर शाळा आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी पात्र ठरणार नाही.
• गटशिक्षणाधिकारी स्तरावर प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे तपासणीकरीता पडताळणी समिती गठीत करावी. तसेच महानगरपालिका स्तरावर देखील अशाच प्रक्रारच्या समिती गठीत करावी. समितीमध्ये आवश्यक बदल करण्याची मुभा संबंधित अधिकाऱ्यांना राहील. पडताळणी समितीने खालील बाबींची तपासणी करावी.
१. आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबीः-
• सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक/घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक इ. यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरावा.
• भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरीता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा. भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येवून सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच आरटीईमधून प्रवेश झाला तरीही संपूर्ण फी संबंधित पालकाने भरावी लागेल.
१.२ जन्मतारखेचा पुरावा.
१.३ जात प्रमाणपत्र पुरावा. (सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करुन दिलेले जात प्रमाणपत्र असावे.)
१.४ उत्पन्नाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला रु. १लाखापेक्षा कमी उत्पन्न.) प्रवेश प्रक्रीया सुरु होणाऱ्या एक वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा, उदा. सन २०२४- २५ मध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन २०२२-२३ किंवा २०२३-२४ या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरीता ग्राहय समजण्यात यावा
१.५ दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रूग्णालय यांचे ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
१.६ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकर अधिनियम २००९ मधील तरतूदींनुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय ६+ गृहित धरताना मानीव दिनांक ३१ डिसेंबर निश्चित करणेत आलेली आहे.
१.७ पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना single Parent (विधवा, घटस्फोटित, आई अथवा वडील या पैकी कोणताही एक) पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावेत.
१.८ आरटीई नियमानुसार एखादया शिक्षण संस्थेच्या एकाच आवारात अथवा परिसरात इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत मान्यता असलेली एक शाळा असेल व तेथेच इयत्ता ५ ते १० वी पर्यंत मान्यता असलेली दुसरी शाळा असल्यास इलेमेंटरी सायकल नुसार इयत्ता १ ली ला २५ टक्के प्रवेशप्रक्रीयेअंतर्गत दिलेले प्रवेश पुढे त्याच संस्थेच्या त्याच परिसरातील (एकाच आवारातील) असलेल्या शाळेत इयत्ता ५ वी ते ८ वी करिता ते प्रवेश नियमित राहतील.
१.९ शाळा खालील कारणांमुळे आरटीई २५ टक्के प्रवेश नाकारु शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी व याबाबतची माहिती पोर्टलवर उपलब्ध असावी.-
- अवैध निवासाचा पत्ता
- अवैध जन्मतारखेचा दाखला
- अवैध जातीचे प्रमाणपत्र
- अवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- अवैध फोटो आयडी
- अवैध दिव्यांग प्रमाणपत्र
१.ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्केअंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांला पुन्हा अर्ज करता येणार नाही.
२.प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरु नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रह करण्यात येतील याची नोंद घ्यावी.
३.पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी, गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला ३ वेळा प्रवेशाकरीता संधी देवून पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टल वर Not Approch करावे.
४.पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या बालकाचा शाळेत प्रवेश निश्चित झाला आहे त्या बालकाच्या पालकांशी सबंधित शाळेनेही संपर्क साधावा.
५.पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरावी व त्याची खात्री करावी.
६. पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी विचारात घेवून, सुधारित अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ मधील बदल लक्षात घेऊन पडताळणी विषयक कामकाज वेळेत होईल या दृष्टीने नियोजन करावे.
७. पडताळणी समितीने रहिवासी पत्ता, गुगल वरील पत्ता व वय याबाबत पात्र विद्यार्थ्यांची अचूक खात्री करावी. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करावी. या दृष्टीने आवश्यक सुविधा गटशिक्षणाधिकारी स्तरावर करण्यात यावेत.
८. समितीने संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यांनतर सदर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आर.टी.ई. पोर्टलवर करण्यात येते. पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीचे पत्र घेवून शाळेत जातील. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही. जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रद्द करण्यात यावी व अशा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांचेकडे तक्रारीची दाद मागता येईल. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांचा निर्णय मान्य नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय कार्यालय यांचेकडे दाद मागता येईल व त्यांचा निर्णय अंतिम राहील. शासन निर्णय दिनांक २१.०४.२०१४ नुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्हा, तालुका व न.पा./म.न.पा. स्तरावर तक्रार निवारण केंद्र व मदत केंद्राची स्थापना करावी.प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही.
९. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा.
१०. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.
११. सदरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी करावी व स्थानिक स्तरावर सदर सूचनांबाबत मोफत प्रसिद्धी देण्यात यावी.
Featured post
*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी* लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.* https://mahaelection.gov.in Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...
Most Popular
-
संपूर्ण निकालाची एकत्रित PDF साठी खाली दिलेल्या click here येथे स्पर्श करावा.... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 👉🏻...
-
🏫 *बीएड धारक आणि शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची आणखी एक सुवर्णसंधी* चालून आली आहे. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर ...
-
📌 पवित्र पोर्टल टप्पा 2 याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत सर्व याद्या डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या LINK ला CLICK करा... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇...



