आरटीई प्रवेशः आजपासून भरा ऑनलाइन अर्ज
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. १५ - आरटीईअंतर्गत राबविल्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी बालकांचे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी पालकांना मंगळवारपासून (दि.१६) सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
अनेकदा शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याने आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली. यंदा राज्यातील एकूण ७५ हजार ९७४ शाळांनी नोंदणी केली
असून, प्रवेशासाठी ९ लाख ७२ हजार ८२३ जागा उपलब्ध झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी ५ हजार १५३ शाळांनी नोंदणी केली असून त्यात ७७ हजार ९२७ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. यंदा आरटीई कायद्यातील
बदलानुसार विद्यार्थ्यांना प्रथमतः
पुणे जिल्ह्यात ७७ हजार ९२७ प्रवेशाच्या जागा
अनुदानित, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्याय शेवटी ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना आता अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा व त्यानंतर स्वयंअर्थसहाय्यीत शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश मिळेल.
CLICK HERE FOR OFFICIAL WEBSITE
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
No comments:
Post a Comment