10 April 2024

मराठा SEBC जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे? 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

 जर तुम्ही पोलीस भरती किंवा इतर कोणत्या भरती साठी तयारी करत असाल, तर तुमच्या साठी हे SEBC जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्र द्वारे, मराठा समाजाला या SEBC प्रवर्गाद्वारे 10 टक्के आरक्षण दिले गेले आहे, त्याचा मोठा फायदा हा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये होणार आहे. 

🖨️ *कसे काढालं प्रमाणपत्र?* 
* सर्वप्रथम आपले सरकार या पोर्टलवर जाऊन तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
* नोंदणी करताना सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यांनतर विचारलेली सर्व महत्वाची माहिती टाकून, आपली नोंदणी करून घ्यायची आहे.
* नंतर Aaple सरकार पोर्टल वर लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस मध्ये Revenue Department शोधायचे आहे. आणि त्यावर क्लिक करायचे आहे.
* मग Revenue Department मध्ये असलेल्या सर्व्हिसेस मध्ये Cast Certificate ही Service निवडायची आहे. मग त्यावर क्लिक करायचे आहे, तेथे तुम्हाला SEBC प्रवर्गासाठी Cast Certificate चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
* तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, त्यात SEBC Cast Certificate साठी फॉर्म दिलेला असेल, तो अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे. 
* त्यात आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे.

📑 *आवश्यक कागदपत्रे..*
* अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
* अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
* अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
* अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईक यांचे टी.सी किंवा प्रवेश निर्गम उतारा किंवा (निरक्षर असल्यास) निरक्षर असल्याचे शपथपत्र व त्यांचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
* दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी)
* वंशावळ (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)
 
📑 *SEBC साठी नॉनक्रेमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे* 
* अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
* अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
* अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
* जातीची प्रमाणपत्र
* तहसीलचे ३ वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे)
* अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो



🙏🏻 कृपया ही माहिती इतरांना देखील share करावी.. 🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular