लोकमत न्यूज नेटवर्क
सुपा : रयत शिक्षण संस्थेत उत्तरेतील माध्यमिक शिक्षण विभागात ३२१ शिक्षकांच्या जागांची भरती प्रक्रिया रखडली आहे. यापूर्वी ज्या शिक्षकांनी अल्प व अत्यल्प मानधनावर रिक्त पदावर अध्यापनाचे काम केले, अशा सेवकांना नेमणूक मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सर्व जागा 'पवित्र पोर्टल'मधून भरण्याच्या निर्णयाने त्या सेवकांच्या वाट्याला उपेक्षा आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याने न्यायालयाने नवीन भरती प्रक्रियेस स्थगिती दिली असल्याची माहिती संस्थेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी
दिली. शिक्षण विभागात २ मे २०१२ पासून शिक्षकांची नव्याने होणारी भरती थांबली होती. त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागेवर तुकडी वाढल्याने अशा ठिकाणी संस्थेने पात्र शिक्षकांना मोबदला देऊन सेवा करण्यासाठी संधी दिली. पुढे २३ जून २०१७ रोजी शिक्षकभरती प्रक्रिया राबविण्यासाठी 'पवित्र पोर्टल' आले. त्याद्वारे २०१९ ला काही जागांची भरती झाली. पुन्हा ही
संस्थेतील सेवकांच्या नेमणुका हा शासन व संस्थापातळीवरचा विषय आहे. रिक्त जागांवर नियुक्त कर्मचाऱ्यास ठरावीक रक्कम त्या-त्या शाखेतून दिली जाते. शाखेची आर्थिक ऐपत नसेल तर संस्था मदत करते. संस्थेच्या उत्तर विभागात माध्यमिक शिक्षकांच्या ३२१ जागा रिक्त आहेत. न्यायालयीन कारवाईमुळे भरती प्रक्रियेस स्थगिती मिळाली आहे.
- नवनाथ बोडखे, विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग, अ.नगर
प्रक्रिया थांबल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. नंतर २०२३ ला भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यात आरक्षणाच्या मुद्द्यासह अन्य कारणाने शिक्षकांची भरती प्रक्रिया रखडत असल्याने पात्र शिक्षक वेटिंगवरच आहेत.
दरम्यानच्या काळात 'रयत' सारख्या मोठ्या शिक्षण संस्थेत रिक्त पदावर अल्प, अत्यल्प वेतन मिळत असले तरी भविष्यात संधी
अपेक्षेची झाली उपेक्षा • रयत शिक्षण संस्थेसारख्या
नामांकित संस्थेत काम करण्याची भविष्यात संधी मिळेल, या अपेक्षेने अनेक शिक्षकांनी कमी मोबदला मिळत असला तरी चालेल, या दृष्टीने अनेक वर्षे ठरावीक पगारावर अध्यापनाचे काम केले. आता जर यातून वगळले तर दुसरीकडे नोकरी मिळविण्याचे वय राहिलेले नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढलेल्या, मुलांचे शिक्षण, लग्न, अशात नोकरीची संधीही गेली तर भविष्यकाळ अंधकारमय होईल, अशी भीती सेवकांमधून व्यक्त केली जात आहे.
मिळेल, या आशेने अनेक बेरोजगार तरुणांनी उमेदीची वर्षे यात घालविली. यातील काही मंडळी पन्नाशी ओलांडून सेवानिवृत्तीपर्यंत पोहोचली; परंतु, त्यांना सामावून न घेतल्याने असे कर्मचारी हताश झाले.
आता सर्व जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जाण्याच्या निर्णयाने हवालदिल झालेले सेवक न्यायालयीन लढा देण्यास सज्ज झाले आहेत.
No comments:
Post a Comment