21 April 2024

मतदानानंतर १,०६७ शिक्षण सेवकांच्या हाती नियुक्तीपत्र निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिक्षणसेवक नियुक्तीचा प्रश्न सुटला; आचारसंहितेमुळे भरतीला स्थगिती


मतदानानंतर १,०६७ शिक्षण सेवकांच्या हाती नियुक्तीपत्र निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिक्षणसेवक नियुक्तीचा प्रश्न सुटला; आचारसंहितेमुळे भरतीला स्थगिती

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी: लोकसभा निवडणूक

आचारसंहिता लागल्याने शिक्षण

सेवक नियुक्ती प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान, शिक्षण विभागाला शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. मात्र, ही नियुक्ती ७ में नंतर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या रिक्त असलेल्या पर्यावर १ हजार ६७ शिक्षण सेवकांना ७ में नंतर नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

आचारसंहितेमुळे शिक्षण सेवक

आंतरजिल्हा बदलीचा मार्गही मोकळा

शिक्षक भरतीनंतर आंतरजिल्हा २ बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार असल्याची भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली होती. जिल्ह्यात सुमारे २००० शिक्षकांची पदे रिक्त असताना ३५० शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास विद्याथ्यांचे नुकसान होईल,

भरतीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. या स्थगितीमुळे शिक्षण सेवक भरती तसेच आंतरजिल्हा बदल्याही रखडल्या होत्या. त्यामुळे नवीन शिक्षण सेवकांना नवीन

त्यामुळे त्या शिक्षकांना

सोडण्यात आले नव्हते. आता ७ मे रोजी मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर १ हजार ६७ शिक्षण सेवकांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या झालेल्या ३५० शिक्षकांनाही स्वगृही जाता येणार आहे.

शैक्षणिक वर्षांची प्रतीक्षा करावी लागली होती, तसेच स्वगृही जाणाऱ्या शिक्षकांनाही आचारसंहितेचा फटका बसला होता. जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी आधी शिक्षकांच्या


तालुकाअंतर्गत तसेच जिल्हांतर्गत

बदल्या कराव्यात, त्यानंतरच नवीन शिक्षण सेवकांना नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतरच नवीन नियुक्त्या देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. या निर्णयामुळे शिक्षण सेवकांचे नुकसान झाल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यापूर्वी शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यानंतर

निवडणुका होईपर्यंत आचारसंहिता असल्याने या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली होती. दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने ज्या मतदारसंघाचे मतदान होईल, त्यानंतर तेथे शिक्षक भरती प्रक्रिया करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदार होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ही भरती प्रक्रिया ७ में नंतर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या शिक्षण सेवकांना मतदानानंतर शाळांवर नियुक्त्या देण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular