━━━━━━━━━━━━━
शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी वेगवेगळे शासकीय डॉक्युमेंट ऑनलाइन उपलब्ध करून दिले असल्यामुळे आता जन्मदाखला, मृत्यू दाखला, विवाह दाखला यांसारखे डॉक्युमेंट देखील ऑनलाइन उपलब्ध करून दिले असून यासाठी सरकारने एक नवीन ॲप्लिकेशन तयार केले आहे. या एप्लीकेशनच्या मदतीने कोणतीही व्यक्ती सहजतेने त्याला आवश्यक असणारे अन ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे डॉक्युमेंट घरबसल्या मिळवू शकणार आहे.
*कोणते आहे हे अँप्लिकेशन?*
महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट असं या एप्लीकेशन चे नाव आहे. शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि पंचायतराज विभागामार्फत हे एप्लीकेशन सुरू करण्यात आले आहे. या एप्लीकेशन मुळे सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीत मिळणारे सर्व कागदपत्रे घर बसल्या आपल्या मोबाईलवर मिळवता येणार आहेत.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
📑 *कोणते दाखले मिळणार?*
महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या या एप्लीकेशनच्या मदतीने सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीत मिळणारे सर्व प्रकारचे दाखले डाऊनलोड करता येणार आहेत.
* या एप्लीकेशन मधून ग्रामपंचायत उपलब्ध होणारे जन्म, मृत्यू, विवाह, नमुना ८ (मूल्यांकन), बीपीएल असे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जात आहे.
* यात नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय आणि क्यूआर स्कॅनिंगचा वापर करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक आपला मालमत्ता कर ऑनलाइन सुद्धा भरू शकणार आहेत.
No comments:
Post a Comment