26 February 2024

'रयत'ने तूर्त शिक्षकांची कायम पदे भरू नयेत खंडपीठाचे आदेश; ११ मार्च रोजी सुनावणी





लोकमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : रयत शिक्षण संस्थेने प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार पुढील सुनावणीपर्यंत (११ मार्च २०२४ पर्यंत) शिक्षकांची कायम पदे भरू नयेत, असे अंतरिम आदेश खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. शैलेश चपळगावकर यांनी दिले.

संस्थेच्या वकिलांनी केलेल्या विनंतीनुसार शेवटची संधी देऊन, संस्थेने दोन आठवड्यांत शपथपत्र दाखल करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले. याचिकेवर ११ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

१० ते १५ वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांनी त्यांना सेवेमध्ये कायम करावे, यासाठी अॅड. राहुल टेमक यांच्यामार्फत याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांवर यापूर्वी १२ फेब्रुवारी रोजी न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. सदर शिक्षण संस्थेने १६ फेब्रुवारीपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश देत याचिकेवर २१

फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली होती.

संस्थेने तोपर्यंत (२१ फेब्रुवारीपर्यंत) शिक्षकांना नियुक्त्या देऊ नयेत, असे अंतरिम आदेश दिले होते.

काय आहे प्रकरण?

संस्थेमध्ये कायम शिक्षकांची पदे रिक्त असताना तासिका तत्त्वावर काम करीत असलेल्या याचिकाकर्त्यांना त्या पदांवर नियुक्ती केली नाही. म्हणून त्यांना सेवेमध्ये कायम करण्यासाठी २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. रयत शिक्षण संस्थेने सदरील याचिकाकर्त्यांना कायम सेवेत घेण्याची लेखी संमती उच्च न्यायालयात दिली होती. त्यानुसार त्यांना कायम सेवेत सामावून घेतले होते. ज्या तासिका तत्त्वावरील शिक्षकांनी याचिका दाखल केलेल्या नाहीत, अशा शिक्षकांनासुद्धा जागा उपलब्धतेनुसार सेवेमध्ये कायम करण्यात येईल असे संस्थेने लेखी दिले होते. परंतु ज्या शिक्षकांनी याचिका दाखल केल्या नव्हत्या, अशांनी वेळोवेळी संस्थेकडे पाठपुरावा करूनही त्यांना सेवेमध्ये कायम केले नाही. ज्यांनी याअगोदर याचिका दाखल केल्या नाही, अशा शिक्षकांनी खंडपीठात धाव घेतली आहे.

Kolhapur Main

Page No. 8 Feb 27, 2024 Powered by: erelego.com

राज्यात ११ हजार नवीन शिक्षकांची भरती शालेय शिक्षण विभागाकडून भरतीचा पहिला टप्पा पूर्ण

पुणे, ता. २६ : गेल्या २० वर्षांतील सर्वांत मोठ्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा राज्यात रविवारी (ता. २५) रात्री उशिरा पूर्ण झाला. शालेय शिक्षण विभागाने मुलाखतीशिवाय सुमारे ११ हजार नवीन शिक्षकांची भरती केली. त्यामुळे १० ते १२ वर्षांपासून भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या काही उमेदवारांना दिलासा मिळाला.

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार 'मुलाखतीशिवाय' आणि 'मुलाखतीसह' या दोन प्रकारांतील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून पाच ते १४ फेब्रुवारी कालावधीत प्राधान्यक्रम घेतले होते. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील आणि मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील रिक्त जागांसाठी उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली आहे. शिक्षक भरतीसाठी एकूण २१ हजार ६७८ जागापैकी मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ पदे होती. त्यातील ११ हजार ८५ उमेदवारांची शिक्षक म्हणून निवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. 'मुलाखतीसह' प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार ■ करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून,

ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, "पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही प्रभावाखाली न येता ही प्रक्रिया पूर्ण झाली. संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना समाज माध्यमांवर उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले. तसेच अभियोग्यताधारकांच्या व्यक्तिगत संदेशांनासुद्धा उत्तरे देण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करण्यास कोणासही संधी मिळू नये, यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांचे फोन रेकॉर्ड करावेत, फोटो ठेवावेत आणि अशांविरुद्ध थेट पोलिस तक्रार करावी, असे खुले आवाहन केले होते. अभियोग्यताधारकांना संभ्रमित करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अनेकविध उपाययोजना केल्या गेल्या."

या प्रक्रियेदरम्यान काही प्रश्न अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्याचे मंत्रालय स्तरावरून शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी तातडीने आणि प्रगल्भतेने निराकरण केल्यामुळे प्रक्रिया पुढे नेणे सुकर झाले, असे मांढरे यांनी सांगितले. भरती प्रक्रियेतून निवड झालेले नवीन शिक्षक विद्यार्थी घडविण्याच्या कामात त्यांचे पूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा मांढरे यांनी व्यक्त केली.



११ हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी शिफारस

 दि. १६ ऑक्टोबर २०२३ ते २२ जानेवारी २०२४ दरम्यान नोंद केलेल्या जिल्हा परिषद - १२ हजार ५२२, मनपा २ हजार ९५१, नगरपालिका- ४७७, खासगी शैक्षणिक संस्था- ५ हजार ७२८ अशा एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांसाठी जाहिराती आल्या. मुलाखतीशिवाय - १६ हजार ७९९ व मुलाखतीसह ४ हजार ८७९ अशी एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही होणार आहे.

एकूण १ हजार १२३ खासगी शैक्षणिक संस्थांनी ५ हजार ७२८ रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टलवर मागणी नोंदविली आहे. जाहिरातीच्या अनुषंगाने दि. ५ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले. त्यापैकी

मुलाखतीशिवाय या प्रकारासाठी संस्थांसाठी १ लाख ३७ हजार ७७३ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. तर मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील संस्थांसाठी १ लाख ३३ हजार २७७ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. मुलाखतीसह पदभरतीसाठी ४ हजार ८७९

उमेदवार :

मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या १ हजार १८९ संस्थांना ४ हजार ८७९ रिक्त पदासाठी योग्य ती प्रक्रिया करून १:१० या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जातील. मुलाखत व अध्यापन कौशल्य याच्या आधारे निवड केली जाईल. यासाठी ३० गुणांची तरतूद केली असून उमेदवाराची निवड संस्था करणार आहे.


कागदपत्रे पडताळणीनंतर मिळणार नियुक्ती

उमेदवाराच्या मूळ कागदपत्राची पडताळणी केली जाईल, आणि पात्र उमेदवारांना शासन निर्णय दिनांक २१ जून २०२३ मधील तरतुदीनुसार समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश दिले जातील, त्यामध्ये दिव्यांग व महिलांना प्राधान्य दिले जाईल. काही उमेदवारांच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचेकडून कागदपत्राची आवश्यक ती पडताळणी करणे गरजेचे आहे, अशा उमेदवारांना योग्य त्या पडताळणीनंतर नियुक्ती देण्याची कार्यवाही होणार आहे.







25 February 2024

शिक्षक भरती निवड यादी जाहीर....याद्या डाउनलोड करण्यासाठी Click करा..

ALL ZP मराठी यादी बघण्यासाठी CLICK करा
..👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻




ALL PRIVATE MANAGENENT यादी बघण्यासाठी CLICK करा...
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻



ALL IN ONE मराठी यादी बघण्यासाठी CLICK करा...

ALL महानगर पालिका यादी बघण्यासाठी CLICK करा... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻



ENGLISH माध्यमाची यादी बघण्यासाठी CLICK करा... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻

नगर पालिका निवड यादी बघण्यासाठी click करा..
 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻



शिक्षक भरती --सर्वसाधारण गुणवत्ता यादी /निवड यादी जाहीर...

दिनांक : २५ /०२/२०२४

उमेदवारांसाठी सूचना

शिक्षक अभियोग्यता व बु‌द्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत.

१. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बु‌द्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्राप्त प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून दिनांक ०५/०२/२०२४ ते १४/०२/२०२४ या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत.

२. त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारांतर्गत त्यांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे.

३. मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

४. उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय तसेच विविध न्यायनिवाडे, शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे.

५. ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत, त्यांना लॉगीन केल्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म (Application Form) मेनू अंतर्गत अॅप्लिकेन्ट रिकमंडेड स्टेटस (Applicant Recommended status) यावर क्लिक केल्यावर सलेक्ट राऊंड (Select Round) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून फेज-१ (Phase-1) यानंतर सलेक्ट इंटरव्हिव टाईप (Select Inteview Type) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून विदाआऊट इंटरव्हिव (without Interview) मेनू निवडावा. त्यानंतर सबमिट (submit) वर क्लिक करावे
त्यानंतर व्हिव रिकमंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट (View Recommended Institute list) या मध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास, सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल. व्हिव प्रेफरेन्स वाईस स्टेटस (View Preferencewise status) यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल.

६. नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापन यांनादेखील स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीबाबत सूचना देण्यात येत आहेत.

७. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच उमेदवारांच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल तसेच अशा उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

८. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

९. उमेदवारांच्या निवडीबाबत उमेदवारांच्या काही अडचणी असल्यास राज्यस्तरावर "तक्रार निवारण व दुरुस्ती समिती" स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी आपणास edupavitra२०२२@gmail.com या ईमेल वर सबळ पुराव्यांसहित अर्ज सादर करता येईल.

१०. उमेदवारांना अन्य काही अडचणी आल्यास

edupavitra2022@gmail.com या email वर संपर्क साधता येईल.

११. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जात असताना अनेक असंतुष्ट घटक काहीतरी वावड्या उडवून प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ते सर्व प्रयत्न सनदशीर मार्गाने व ठामपणे प्रशासनाने हाणून पाडले आहेत.
१२. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. शिक्षक होणे ही आयुष्यातील सर्वोत्तम घटना आहे, याची जाण ठेवावी व सेवा निवृत्तीपर्यंत जतन करून ठेवावी.

(सूरज मांढरे भाप्रसे) आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र


PDF DOWNLOAD करण्यासाठी

24 February 2024

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा मार्च २०२४ चे प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरणेबाबत मुदतवाढ ......

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education S.R.No.832-A, Final Plot No. 175,179, Near Balchitrawani, Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar, Pune-411004.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उप metre to૮, ૨૦૧, ૫જી शेजारी, पारकर रिसर्च

Tel: Chairman (P): STD.(020)-25651751 Secretary (P): 25651750 EPABX-25705000 Email: secretary stateboard@gmail.com

परीक्षा प्राधान्य/महत्वाचे

प्रति,

क्र.स.मं./परीक्षा-२/८०९

पुणे-४११००४-

दिनांक-२३/०२/२०२४

विभागीय सचिव,

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व विभागीय मंडळे.

विषय - माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा मार्च २०२४ चे प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरणेबाबत......

संदर्भ - १. या कार्यालयाचे पत्र क्र. रा.मं. / परीक्षा-२/५५०८ दि.२६/१२/२०२३

२. या कार्यालयाचे पत्र क्र. रा.मं./गणकयंत्र/१/१७८ दि.१५/०१/२०२४

३. या कार्यालयाचे पत्र क्र. रा.मं./परीक्षा-२/५७२ दि.०९/०२/२०२४

उपरोक्त विषयी संदर्भिय पत्रे पहावीत. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (३.१० वी) परीक्षा मार्च २०२४ चे प्रात्यक्षिक, तोडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरणेबाबतच्या सूचना संदर्भिय पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत.

या संदर्भात सूचित करण्यात येते की, इयत्ता १० वी परीक्षेतील प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरण्यासाठी शनिवार दिनांक ०९/०३/२०२४ पर्यंत कालावधी देण्यात येत आहे. या कालावधीत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पध्दतीने गुण नोंदवून मंडळाकडे ऑनलाईन पाठवावयाचे आहेत.

तसेच संदर्भीय पत्र क्र. २ सोबत जोडलेल्या कार्यपध्दतीमधील सूचना क्र. ८ नुसार माध्यमिक शाळांनी खालील प्रमाणे कार्यवाही करावयाची आहे.

आपल्या माध्यमिक शाळांमधील विद्याध्यांचे बैठक क्रमांकानिहाय ऑनलाईन पध्दतीने नोंदविलेल्या गुणांची Final Printout घेऊन त्यावर अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी (आवश्यक त्या विषयाच्या बाचत) व तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी इत्यादी गुणतक्त्यानुसार संबंधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेऊन सदर गुणतक्त्यावर मुख्याध्यापक यांनी माध्यमिक शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे व सदरचे गुणतक्ते प्रचलित पध्दतीप्रमाणे सिलबंद पाकिटामध्ये, पाकिटावर माध्यमिक शाळेचे नाव, Index No. घालून बुधबार दिनांक १३/०३/२०२४ पर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करावयाचे आहेत. तसेच गुणतक्त्याची एक प्रत शाळेने माहितीस्तव जतन करणे आवश्यक आहे.

सदर बाब आपल्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी.

प्रत माहितीस्तव-व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्य मंडळ, पुणे.

(अनुराधा ओक)

राज्य मंडळ, पुणे ०४.

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक दिनांक 24/02/2024




• पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षक पदभरती व याद्या संदर्भात अनिकृत माहिती देणारे पवित्र पोर्टलवरील "One and only" न्यूज बुलेटीन हाच एकमेव विश्वासार्ह मार्ग आहे.

• सतत संभ्रम निर्माण करणे व त्यातून स्वतःचे महत्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे हाच ज्यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तींना दूर करावे. याबाबत योग्य ठिकाणी नोंदही घेतली जात आहे.

• पूढील २-३ दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल. तोपर्यंत प्रमाणपत्रे पडताळणीसाठी तयार ठेवणे व तत्सम कामे करावीत किंवा शिक्षक झाल्यावर काय करायचे त्याचे नियोजन करावे.

23 February 2024

दिनांक २३/०२/२०२४ शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


• पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे काम प्रगतिपथावर आहे. सद्यःस्थितीत या परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी/अडचणी समोर येताना दिसून येत नाहीत.

• दिनांक २१/०२/२०२४ रोजीच्या बुलेटिनमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावीत. त्याची पडताळणी नियुक्ती प्राधिकारी घोषित करतील त्या वेळापत्रकाप्रमाणे नजीकच्या काळात होणार आहे.

• याद्यांची पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आहे. त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही गा-हाणे असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी 'तक्रार निवारण व दुरूस्ती समिती गठीत करण्यात आली आहे. त्याद्वारे सर्व बाबींची यथोचित दखल घेतली जाईल व निराकरण केले जाईल.

• सन २०१९ च्या भरतीच्या भरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉक करण्यास दि.३० जून, २०१९ मुदत होती व दिनांक ०९/०८/२०१९ रोजी प्रत्यक्ष शिफारस याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. म्हणजेच ४० दिवसांचा कालावधी लागला होता. यावेळी त्या तुलनेत तिपटीहून अधिक पदांची भरती असूनही शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकरच या याद्या प्रसिध्द होतील. त्यामुळे या संदर्भात अवाजवी उत्कंठा दर्शवू नये.

• अभियोग्यताधारकांनी शिक्षक पदभरती-२०२२ साठी वापरात असलेल्या edupavitra2022@gmail.com या ईमेलवरच त्यांची विहित प्रपत्रातील निवेदने आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावीत. निवेदनासंबंधीचे नमुना प्रपत्र लवकरच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल. सदर ईमेल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून पाठविल्या गेलेल्या तसेच विहित नमुन्यात नसलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी. याबाबत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात येईल.





सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा २०२२ मधून मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात करावयाचे उमेदवारांचे नियतवाटप सामान्य प्रशासन विभाग, शासन ज्ञापन क्र. एएससी १४२४/प्र.क्र.३७/प्रशा-३ (१४-अ), दिनांक : २३ फेब्रुवारी, २०२४ सोबतचे (विवरणपत्र "अ")

सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०२२ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी पदावर नियतवाटप.

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग,

क्रमांक : एएससी १४२४/प्र.क्र. ३७/प्रशा-३ (१४-अ), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दूरध्वनी क्रमांक: ०२२-२२७९४१७२. दिनांक: २३ फेब्रुवारी, २०२४.

ज्ञापन

महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ या परीक्षेतील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या ४९ पदांसाठी (मंत्रालय ४२ महाराष्ट्र लोकसेवा आयोग ७ = ४९) दिनांक २२-१०-२०२३ रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल दि. १८-०१-२०२४ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०२२ च्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने क्रमांक: १४४२(२) (१)/२०२२/तेवीस, दिनांक ३०-०१-२०२४ च्या पत्रान्वये शिफारस केलेल्या सोबतच्या विवरणपत्र "अ" मधील उमेदवारांचे त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या मंत्रालयीन विभागात/महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात सहायक कक्ष अधिकारी पदावर नियतवाटप करण्यात येत आहे.

२. सोबतच्या विवरणपत्र "अ" मध्ये नमूद केलेल्या उमेदवारांची नेमणूक पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात करण्यात यावी :-

(৭)

सदर विवरणपत्रातील सर्व उमेदवारांनी दिनांक २६-०३-२०२४ पर्यंत संबंधित्त विभाग/कार्यालयात व्यक्तिशः उपस्थित राहून अस्थायी नियुक्तीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. सदरहू कालावधीत उमेदवारांनी अस्थायी नियुक्ती स्विकारली नाही तर त्यांचे नाव कोणतीही पूर्वसूचना न देता, या विभागाच्या/महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवडसूचीतून कमी करण्यात येईल.

(२) लोकसेवा आयोगाकडे केलेल्या अर्जातील दाव्यांची तपासणी / पडताळणी आयोगाने केलेली नसल्याने, नियुक्ती स्विकारण्यासाठी उपस्थित रहाताना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा २०२२ साठी देण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक: ०३३/२०२३ ते ०३६/२०२३, दिनांक १४-०८-२०२३ मध्ये नमूद केल्यानुसार वयोमर्यादेची दिनांक ०१-१०-२०२२ रोजीच्या अर्हतेनुसार तसेच शैक्षणिक आणि अन्य अटींची दिनांक ०१-०९-२०२३ किंवा तत्पुर्वीच्या अर्हतेनुसार खाली नमूद केलेली मूळ प्रमाणपत्रे उमेदवारांनी सोबत घेऊन जावीत. नियुक्ती स्विकारण्यासाठी उपस्थित रहाताना सदर प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत

उमेदवाराजवळ असणे अत्यावश्यक आहे :-

वयोमर्यादा (दिनांक ०१-१०-२०२२ रोजी तसेच प्रस्तुत मुख्य परीक्षेच्या जाहिरातीमध्ये नमुद केल्यानुसार)

♦️जलसंपदा सुधारित रिस्पॉन्स शीट..👉काही प्रश्नांचे उत्तरे बदलून सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध... प्रसिद्धी पत्रक...

महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग समन्वय समिती गट (ब) अराजपत्रित व गट-क सरळसेवा भरती

जा.क्र.दप/पमं/सरळसेवा/समन्वय समिती/मेज-२/९२ / सन २०२४

दि.: २३.०२.२०२४

प्रसिध्दीपत्रक
१. जलसंपदा विभागांतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील परीक्षा- २०२३ याकरीता एकूण प्राप्त ६८२७ आक्षेपांबाबत मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ञ समितीमार्फत कार्यवाही करण्यात येवून त्यातील ८२ आक्षेप / हरकती वैध ठरविण्यात आलेल्या होत्या. तथापि त्याव्यतिरीक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक Question ID ६३०६८०५३२८०५ व दप्तर कारकुन / मोजणीदार/ कालवा निरीक्षक Question ID ६३०६८०५३७२८७ बाबत घेण्यात आलेले हे दोन आक्षेप / हरकती देखिल मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ञ समितीमार्फत स्विकृत करण्यात आलेले आहेत, त्यामुळे सुधारीत Objection Summary आणि Valid Objection Details या सोबत प्रसिध्द करण्यात येत आहेत.

२. मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत दि. २३.०२.२०२४ रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक परीक्षा दि. २९.१२.२०२३, सत्र- २ व दप्तर कारकुन/ मोजणीदार / कालवा निरीक्षक परीक्षा दि.०२.०१.२०२४, सत्र- ३ मधील उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडी वर सुधारित HTML Link Post Objection (सुधारित उत्तरतालिका) उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

३. सबब, यापुढे कोणतेही लेखी / ई-मेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

स्थळ प्रत मा. अध्यक्ष समन्वय समिती यांचे मान्यतेने

(सविता चं. बोधेकर)

सदस्य सचिव

समन्वय समिती तथा

अधीक्षक अभियंता व परीमंडळीय अधिकारी

दक्षता पथक, मुंबई परीमंडळ

पाटबंधारे विभाग, ठाणे



Dircect Link साठी



22 February 2024

दिनांक २२/०२/२०२४ शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक...


• पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीबाबत समाजातील विविध घटकांतून आलेल्या सर्व निवेदनांचा, सूचनांचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. योग्य व प्रचलित शासन नियमांशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

• नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. शिफारसपात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत.

• स्वप्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभियोग्यताधारकांनी, नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यावयाची आहेत. ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावीत.

• पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक १/०९/२०२३ व इतर मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करावे.



मार्गदर्शक सुचनां साठी

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular