21 February 2024

दिनांक २१/०२/२०२४ शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक



• पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे. या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक १४/०२/२०२४ अखेर प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आले आहेत.

• उमेदवारांच्या अध्यापनाच्या विषयाचे गट, माध्यम, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये 2022 प्राप्त केलेले गुण, उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण, विषय इत्यादी बाबींची संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे.

• संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणतत्ता यादी जाहीर करण्यात येईल.

• सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सूरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे.

20 February 2024

एम.फील. अर्हता धारण केलेल्या अध्यापकांना नेट परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यासंदर्भातील माहिती.

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय, (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य, शिवाजी नगर, पुणे- ४११ ०१६

Web: www.dhepune.gov.in E-Mail: vishi dhepune@gov.in

फोन नं.०२०/२६१२२११९/२६०५१५१२.२६१३०६२७.२६१२४६३९

फॅक्स नं.०२०/२६११११५३

क्र.संकीर्ण २०२४/ संकीर्ण/वि/विशि/ १943

दि. १६-०२-२०२४ 11 6 FEB 2024

कालमर्यादा

प्रति.

कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे, उच्च शिक्षण.

विषय :- एम.फील. अर्हता धारण केलेल्या अध्यापकांना नेट परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यासंदर्भातील माहिती.

संदर्भ :- शासन पत्र क्र.संकीर्ण-२२०४/प्र.क्र.११/विशि-१ दिनांक ३१ जानेवारी २०२४.

उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भीय शासनपत्र पहावे. (प्रत सोबत जोडली आहे.)

प्रस्तुत शासनपत्रान्वये खालील मुद्यांची माहिती सादर करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.

१. दिनांक १ जानेवारी १९९४ ते ११ जुलै २००९ या कालावधतील एम.फिल. ही पदवी प्राप्त केली होती, त्यांचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगास सादर करण्यात आला होता, तथापि आयोगाने नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून नावानिशी सूट दिली नाही अश्या अध्यापकांची माहिती.

२. दिनांक १ जानेवारी १९९४ ते ११ जुलै २००९ या कालावधीत एम.फिल. ही पदवी प्राप्त केली होती, परंतू त्यांचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगास सादर करण्यात आला नव्हता अश्या अध्यापकांची माहिती.

वरील मुद्यांच्या अनुषंगाने आपल्या विद्यापीठातील व अधिनस्त अनुदानित महाविद्यालयातील

अध्यापकांची माहिती सोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्रामध्ये संबंधीत कागदपत्रांसह सादर करण्यात यावी.

सदरचीमाहिती प्रथम प्राध्यान्याने संकलीत करण्यात येऊन दिनांक २७.०२.२०२४ पर्यंत दोन प्रतीमध्ये सादर करण्यात यावी.

(डॉ. शैलेंद्र देवळाणकर) शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.

प्रतः- मा.प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय विस्तार भवन मुंबई यांचेकडे माहितीस्नन सविनय सादर.




परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
👆👆👆👆👆👆👆

19 February 2024

जुन्या बी.एड.ला लागणार पुर्णविराम एनसीटीईची नोटीस; पुढील सत्र अखेरचे....



पुणे : पुढारी वृत्तसेवा

(एनसीटीई) दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र (बी.एड.) अभ्यासक्रम बंद केल्यानंतर आता चार वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रमही (बीए.बी.एड., बी.एस्सी.बी.एड.) बंद केला जाणार आहे. त्यानुसार २०२४-२५ हे चार वर्षांच्या जुन्या अभ्यासक्रमाचे शेवटचे सत्र असून २०२५-२६ पासून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही. चार वर्षांच्या एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रमाच्या मान्यताप्राप्त संस्थांची मान्यता कायम राहणार आहे. एनसीटीईने यासंदर्भात नोटीस 
प्रसिद्ध केली आहे. शिक्षक गुणवत्ता, शिक्षक शिक्षणासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेली एनसीटीई ही स्वायत्त संस्था आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला अनुसरून एनसीटीईन बहुविद्याशाखीय शिक्षण व्यवस्था असलेल्या ५७ संस्थेमध्ये NCTE एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (आयटीईपी) हा चार वर्षांचा एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यानुसार आता इतर शिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक संस्थांना ५ मार्चपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

भावी शिक्षकांनो, भूलथापांना बळी पडू नका! शिक्षण आयुक्तांकडून सतर्कतेच्या सूचना; भरती प्रक्रिया पारदर्शक..



पुणे : शिक्षक भरती प्रक्रियेत

संगणकाद्वारे जिल्हा परिषद शाळा आणि संस्थांमधील नियुक्तीसंदर्भात पात्र अभियोग्यताधारकांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया संगणकावर आधारित असून त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.

'भरतीप्रक्रियेत दलाल तसेच खाजगी व्यक्तींकडून अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी भूलथापांना बळी न पडता सावध राहावे, अशी सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयाने केली आहे.

संगणकाद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशा प्रकारे अभियोग्यताधारकांची फसवणूक करू शकतात. त्या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर तातडीने ती बाब प्रशासनाचे अथवा नजीकचे पोलिस ठाण्याच्या निदर्शनास आणून द्यावी.

- सूरज मांढरे आयुक्त (शिक्षण)

जिल्हा परिषद शाळेमध्ये नोकरी लावून देतो, विशिष्ट संस्थेच्या शाळेत भरती करून देतो, जवळच्या संस्थेत नोकरी देतो, अशी खोटी आश्वासने देऊन मागील भरतीच्या वेळी काही दलालांनी उमेदवारांची फसवणूक केली होती. त्याप्रमाणे यावेळी फसवणूक होण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर

जवळच्या पोलिस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी. प्रशासनाकडून फिर्यादीची दखल घेत तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल. दरम्यान, असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींवर पोलिस विभागामार्फत स्वतंत्रपणे नजर ठेवली जात असल्याचे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




18 February 2024

दिनांक १८/०२/२०२४ शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक शंका समाधान -



• शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेकडील काम प्रगतीपथावर सुरू आहे. अनेक उमेदवारांना समान गुण असल्यामुळे समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरविण्याच्या तरतुदी विचारात घेवून उमेदवारांचे योग्यक्रम तपासण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

• शिक्षक पदभरती प्रकरणी मा. न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाहीत, याबाबत उचित दक्षता घेणेबाबतची विनंती मा. उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियोक्ता यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे.

• शिक्षक भरती आता महत्वाच्या टप्यावर पोहोचली असून पात्र अभियोग्यताधारकांना संस्था/जिल्हा परिषदेमधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे.

• असे असतानाही अभियोग्यताधारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेत भरती करुन देतो जवळच्या संस्थेत नोकरी देतो इत्यादी प्रकारे खोटी आश्वासने देवून फसवणूक होण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. याबाबींकडे सर्व अभियोग्यताधारकांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

• संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेवून काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करु शकतात. या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर त्याचे टेलीफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावेत व अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी. अशी फिर्याद दाखल केल्यास

प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल.

• दरम्यान असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांचेवर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगरणी ठेवणेत येत आहे.

• सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे.

17 February 2024

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीएच.डी. पोर्टल सुरु पीएच. डी. संबंधी सर्व माहिती एका क्लिकवर..



लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीएच.डी. करू इच्छिणारे तसेच सध्या पीएच. डी.ला प्रवेश घेत संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना एका क्लिकवर पीएच.डी. संदर्भात सर्व माहिती मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सुलभतेसाठी 'पीएचडी अॅडमिशन अॅण्ड ट्रॅकिंग पोर्टल' सुरू केले आहे.

पीएच.डी. प्रवेश तसेच त्यासंदर्भात इतर माहिती घेणे, कागदपत्रे सादर करणे यासाठी विद्यापीठात तसेच संलग्न पीएच.डी, संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना अनेकदा जावे लागते.

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणे, शंकाचे निरसन करण्यासाठी विद्यापीठाने सुरू केलेल्या पीएच.डी. पोर्टलमुळे मदत होणार आहे. पोर्टलवर पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा, प्रवेश, अभ्यासक्रम, पात्रता आणि शुल्क यासंदर्भात सर्व माहिती उपलब्ध आहे.

विद्यार्थी करीत असलेल्या पीएच.डी.ची सद्य:स्थिती तपासता येणार आहे. त्यामध्ये पूर्वपरीक्षा, प्रवेश, अपलोड केलेली कागदपत्रे, थिसीस, शिष्यवृत्ती ही सर्व माहितीही ट्रॅक करता येणार आहे. सर्व प्रक्रिया एकाच पोर्टलवर करता येईल.

गाईड, रिसर्च सेंटर्सची माहिती एकाच ठिकाणी

■ पीएच.डी. पोर्टलवर तुम्हाला तुमच्या विषयासाठी उपलब्ध असलेल्या गाईड, रिसर्च सेंटरची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

■ या पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्टल वापरण्यासाठी कुठलेही रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन करण्याची गरज नाही. या पोर्टलमुळे विद्यार्थ्यांचा पीएच.डी.चा प्रवास अधिक सोपा होणार आहे.

विद्यार्थ्यांना

Link... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


Ph.D Addmission/index.html या लिंकवरून अथवा विद्यापीठाच्या संकेतस्थळा- वरील Ph.D. Admission and Tracking Portal या टॅबवरून अधिक माहिती घेता येणार आहे.




माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत घोषवाक्य व सेल्फी उपक्रम.....

विदयार्थी मित्रांनो 

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बालकास शिक्षण गुणवत्तापूर्ण देण्यास राज्य शासन महत्वकांशी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे.  आजचे व उद्याचे सक्षम नागरिक म्हणून जीवन जगण्यास आपणास विविध प्रकारच्या ज्ञानाची गरज असते.  वाचन संस्कृतीचा विकास व्हावा. याकरीता आपणाकरीता शिक्षणविषयक घोषवाक्य व सेल्फी चा उपक्रम हाती घेतला आहे. आणि वाचन प्रतिज्ञाचा जागतिक विक्रम करण्याच्या पायरीवर आपण आहोत. 
आपण सर्वांनी सोबत च्या लिंकवर जाऊन आपला सहभाग नोंदविण्यास राज्य शासनाच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येत आहे.
 Click here
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


सोबत युझर मॅन्युअल व कार्यालयीन आदेश साठी येथे click करा...👇🏻👇🏻👇🏻👇🏻





फ्लो चार्ट साठी येथे click करा... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

15 February 2024

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक दिनांक १५/०२/२०२४


शंका समाधान -

• पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे. याबाबत मा. न्यायालयामध्ये दाखल विविध याचिकांमध्ये देखील पदभरती शासनाच्या प्रचलित धोरणानुसार असल्यामुळे ती सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

• पात्र अभियोग्यताधारकाने पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा दोन प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकाराचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील, तर उमेदवार पदभरतीसाठी त्या त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमासाठी विचारात घेतला जाईल.

• काही अभियोग्यताधारक शिक्षक पदभरतीबाबत समाजमाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहेत, पात्र अभियोग्यताधारकांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे. पवित्र पोर्टलवरील न्युज बुलेटिनच्या माध्यमातून पदभरतीबाबत योग्य ती माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

• समाजमाध्यमावर (उदा., टेलीग्राम, व्हॉटसअॅप, युटयुब, इन्स्टाग्राम इत्यादी) चुकीची माहिती, स्वतःचे चुकीचे मत प्रदर्शित करुन पात्र अभियोग्यताधारकांमध्ये प्रक्षोभक/संभ्रम निर्माण/चिथावणी देणारे / उमेदवारांमध्ये नैराश्याची भावना निर्माण करणाऱ्या व त्यांचे समर्थन करणान्याविरुद्ध पोलीस विभागास निगराणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

• पवित्र पोर्टलमार्फत होत असलेली शिक्षक पदभरती पारदर्शी पद्धतीने करण्यात येत आहे. सदरची पदभरती भविष्यात होऊ घातलेल्या सन २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी करण्याचा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे.

• काही अपरिहार्य कारणास्तव सदरची पदभरती लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास प्रचलित कार्यपद्धतीनुसार ती पुढे पूर्ण करण्यात येईल, यास्तव पात्र अभियोग्यताधारकांनी याबाबत अनावश्यक चिंता करू नये.

• तथापि, शासन निर्णय दिनांक १०/११/२०२२ मध्ये नमूद केल्यानुसार शिक्षक पदभरती विविध टण्यांमध्ये होत आहे. सध्या दिनांक १६ ऑक्टोबर, २०२३ ते २२ जानेवारी, २०२४ या कालावधीमध्ये पोर्टलवर आलेल्या जाहिरातीची कार्यवाही करण्यात येत आहे.

• दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या जाहिरातींवरील कार्यवाही भविष्यात करण्यात येईल. यास्तव पहिल्या टण्यामध्ये ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे / स्वप्रमाणपत्र अपूर्ण ठेवल्यामुळे/विहित मुदतीत स्वप्रमाणपत्र प्रमाणित न केल्यामुळे अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे या सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही, अशा अभियोग्यताधारकांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या दुसऱ्या टण्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण/दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

• अभियोग्यताधारकांनी edupavitra2022@gmail.com या मदतकक्षाच्या ईमेलवर एकाच प्रकारचा मेल वारंवार अथवा एकाच विषयाचा ईमेल अनेक अभियोग्यताधारक करतात. यामुळे अभियोग्यताधारकांना योग्यवेळी मदत करता येत नाही. अभियोग्यताधारकांचे सर्वसाधारण मुद्दे असल्यास तसे कळवावे, जेणेकरून त्याचा न्युज बुलेटिनच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करता येईल.

• स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या कालावधीमध्ये तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या कालावधीमध्ये मदतीची आवश्यकता असल्याने परिस्थितीनुरूप विविध समाजमाध्यमांवर आलेल्या संदेशास योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे. तथापि, आता अधियोग्यताधारकांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण झाल्यामुळे वैयक्तिक स्वरूपाचे संदेश पाठवू नयेत, अशा संदेशांची दखल घेतली जाणार नाही.

*केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) 2024 निकाल जाहीर | CTET JANUARY – 2024 Result



CTET JANUARY – 2024 Result link*


Click here👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


https://cbseresults.nic.in/ctet_24_jan_xyz/CtetJan24x.htm

🔴शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :- TAIT 2023🔴

01) मो.न.
02) ईमेल आयडी
03) सही,पत्ता,जन्मतारीख
04) ओळख पत्र (आधार कार्ड/पॅनकार्ड/मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स)
05) निवड यादीतील- अनु क्रमांक
06) उमेदवाराच्या अर्जाची स्वप्रमाणित प्रत
07) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला
08) SSC गुणपत्रक व प्रमाणपत्र
09) HSC गुणपत्रक व प्रमाणपत्र
10) पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र
11) पदव्युत्तर पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र
12) D.Ed/D.T.Ed गुणपत्रक व प्रमाणपत्र
13) B.Ed गुणपत्रक व प्रमाणपत्र
14) TET / CTET गुण व प्रमाणपत्र
15) TAIT 2022 परीक्षा गुणपत्रक किंवा TAIT 2022 merit list मधील आपले नाव असलेले page ची प्रिंट.
16) जात प्रमाणपत्र (Cast certificate)
17) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity)
18) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
19) लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र/प्रमाणपत्र (Small Family Declaration)
20) MS-CIT प्रमाणपत्र
21) नावात बदल असल्यास (Marriage certificate/Affidavit/Gazette.)
22) महिला आरक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास.
23) नॉन क्रिमीलिअर लागू असल्यास.
24) पेसा क्षेत्रातील असल्यास (ST फक्त) मुळ अधिवास ठिकाण प्रमाणपत्र
25) उमेदवार - खेळाडू,अनाथ,दिव्यांग, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन लागू असल्यास प्रमाणपत्र.

➡️तसेच निवड यादी लागल्यावर नाव असलेले page ची प्रिंट व लॉगिन ला संबंधित ZP/NP/MNP/संस्था यांचे recommendation letter असेल तर त्याची ही प्रिंट लागेल.

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular