16 July 2024

नवोदय प्रवेश परीक्षा २०२५ : नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी ऑनलाइन फॉर्म भरणे बाबत JNVST 2025 साठी ऑनलाइन नोंदणी पोर्टल सुरू...

 

नवोदय प्रवेश परीक्षा सन 2024 ( इ ६वी ) शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वा.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

For Official website 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

👉🏻👉🏻CLICK HERE 👈🏻👈🏻

25 May 2024

दहावी परीक्षा मार्च 2024दिनांक 27/5/2024ला ऑनलाईन होणार जाहीर.. ऑनलाईन निकाल बघण्यासाठी खाली दिलेल्या LINK ला CLICK करावे.


*SSC Examination 2024 Result Update - दहावी परीक्षा मार्च 2024 निकालाबाबत महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अधिकृत सूचना! निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक..*👇🏻





30 April 2024

वर्ग 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अंतरिम निकाल जाहीर MSCE Pune

महाराष्ट्र राज्य परीक्षा प्रिषदेमार्फत् दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. (इ. ८ ८ वी) व चा अतरिम (तात्पुरता)  निकाल मंगळवार, दि. 30 एप्रिल २०२४ रोजी www.mscepune.in आणि https://www. mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल व विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास सैबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ३०/०४/२०२४ ते १०/०५/२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी २०२४ अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी link 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Click here...


शाळा login 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

21 April 2024

मतदानानंतर १,०६७ शिक्षण सेवकांच्या हाती नियुक्तीपत्र निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिक्षणसेवक नियुक्तीचा प्रश्न सुटला; आचारसंहितेमुळे भरतीला स्थगिती


मतदानानंतर १,०६७ शिक्षण सेवकांच्या हाती नियुक्तीपत्र निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिक्षणसेवक नियुक्तीचा प्रश्न सुटला; आचारसंहितेमुळे भरतीला स्थगिती

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी: लोकसभा निवडणूक

आचारसंहिता लागल्याने शिक्षण

सेवक नियुक्ती प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान, शिक्षण विभागाला शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. मात्र, ही नियुक्ती ७ में नंतर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या रिक्त असलेल्या पर्यावर १ हजार ६७ शिक्षण सेवकांना ७ में नंतर नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

आचारसंहितेमुळे शिक्षण सेवक

आंतरजिल्हा बदलीचा मार्गही मोकळा

शिक्षक भरतीनंतर आंतरजिल्हा २ बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार असल्याची भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली होती. जिल्ह्यात सुमारे २००० शिक्षकांची पदे रिक्त असताना ३५० शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास विद्याथ्यांचे नुकसान होईल,

भरतीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. या स्थगितीमुळे शिक्षण सेवक भरती तसेच आंतरजिल्हा बदल्याही रखडल्या होत्या. त्यामुळे नवीन शिक्षण सेवकांना नवीन

त्यामुळे त्या शिक्षकांना

सोडण्यात आले नव्हते. आता ७ मे रोजी मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर १ हजार ६७ शिक्षण सेवकांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या झालेल्या ३५० शिक्षकांनाही स्वगृही जाता येणार आहे.

शैक्षणिक वर्षांची प्रतीक्षा करावी लागली होती, तसेच स्वगृही जाणाऱ्या शिक्षकांनाही आचारसंहितेचा फटका बसला होता. जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी आधी शिक्षकांच्या


तालुकाअंतर्गत तसेच जिल्हांतर्गत

बदल्या कराव्यात, त्यानंतरच नवीन शिक्षण सेवकांना नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतरच नवीन नियुक्त्या देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. या निर्णयामुळे शिक्षण सेवकांचे नुकसान झाल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यापूर्वी शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यानंतर

निवडणुका होईपर्यंत आचारसंहिता असल्याने या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली होती. दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने ज्या मतदारसंघाचे मतदान होईल, त्यानंतर तेथे शिक्षक भरती प्रक्रिया करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदार होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ही भरती प्रक्रिया ७ में नंतर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या शिक्षण सेवकांना मतदानानंतर शाळांवर नियुक्त्या देण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

20 April 2024

कृषी सेवक भरती निकाल प्रसिद्ध.....

कृषी सेवक भरती निकाल click here 
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻




19 April 2024

दिनांक 19/04/2024 चे पवित्र पोर्टल शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक. 👇🏻👇🏻






♦️पवित्र पोर्टल शिक्षकभरती पुढील राऊंड ४ जून नंतरच होतील. असं स्पष्ट झालं आहे.

♦️ज्यांची नियुक्ती झाली त्यांना त्या जिल्ह्यातील निवडणुका संपल्यावर नियुक्त्या मिळतील. यांचा तरी प्रश्न लवकरच सुटेल याचा आनंद आहे. 

♦️शिक्षकभरतीतील पुढील राऊंड आचारसंहितेनंतर लगेचचं पार पडावे म्हणून आचारसंहिता संपायच्या आतमध्ये पुन्हा एकदा जोमाने कामाला लागूया

♦️ आजपर्यंत काहींनी नियमावर बोटं ठेवली आणि आता आपल्याला यांनी परफेक्ट नियमात बसवलं असं दिसतंय.


♦️जास्तीत जास्त शिक्षक TAIT2 मध्ये भरले जातील यासाठी प्रयत्न करू.

बाकी WAIT & WATCH‼️

15 April 2024

आरटीई प्रवेशः आजपासून भरा ऑनलाइन अर्ज...

आरटीई प्रवेशः आजपासून भरा ऑनलाइन अर्ज

प्रभात वृत्तसेवा

पुणे, दि. १५ - आरटीईअंतर्गत राबविल्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी बालकांचे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी पालकांना मंगळवारपासून (दि.१६) सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अनेकदा शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याने आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली. यंदा राज्यातील एकूण ७५ हजार ९७४ शाळांनी नोंदणी केली



असून, प्रवेशासाठी ९ लाख ७२ हजार ८२३ जागा उपलब्ध झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी ५ हजार १५३ शाळांनी नोंदणी केली असून त्यात ७७ हजार ९२७ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. यंदा आरटीई कायद्यातील

बदलानुसार विद्यार्थ्यांना प्रथमतः

पुणे जिल्ह्यात ७७ हजार ९२७ प्रवेशाच्या जागा

अनुदानित, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्याय शेवटी ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना आता अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा व त्यानंतर स्वयंअर्थसहाय्यीत शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश मिळेल.


CLICK HERE FOR OFFICIAL WEBSITE 
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻






10 April 2024

मराठा SEBC जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे? 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

 जर तुम्ही पोलीस भरती किंवा इतर कोणत्या भरती साठी तयारी करत असाल, तर तुमच्या साठी हे SEBC जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्र द्वारे, मराठा समाजाला या SEBC प्रवर्गाद्वारे 10 टक्के आरक्षण दिले गेले आहे, त्याचा मोठा फायदा हा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये होणार आहे. 

🖨️ *कसे काढालं प्रमाणपत्र?* 
* सर्वप्रथम आपले सरकार या पोर्टलवर जाऊन तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
* नोंदणी करताना सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यांनतर विचारलेली सर्व महत्वाची माहिती टाकून, आपली नोंदणी करून घ्यायची आहे.
* नंतर Aaple सरकार पोर्टल वर लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस मध्ये Revenue Department शोधायचे आहे. आणि त्यावर क्लिक करायचे आहे.
* मग Revenue Department मध्ये असलेल्या सर्व्हिसेस मध्ये Cast Certificate ही Service निवडायची आहे. मग त्यावर क्लिक करायचे आहे, तेथे तुम्हाला SEBC प्रवर्गासाठी Cast Certificate चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
* तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, त्यात SEBC Cast Certificate साठी फॉर्म दिलेला असेल, तो अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे. 
* त्यात आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे.

📑 *आवश्यक कागदपत्रे..*
* अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
* अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
* अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
* अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईक यांचे टी.सी किंवा प्रवेश निर्गम उतारा किंवा (निरक्षर असल्यास) निरक्षर असल्याचे शपथपत्र व त्यांचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
* दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी)
* वंशावळ (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)
 
📑 *SEBC साठी नॉनक्रेमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे* 
* अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
* अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
* अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
* जातीची प्रमाणपत्र
* तहसीलचे ३ वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे)
* अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो



🙏🏻 कृपया ही माहिती इतरांना देखील share करावी.. 🙏🏻🙏🏻

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular