29 February 2024

दिनांक २९/०२/२०२४ शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक



प्राधान्यक्रमाबाबत : प्राधान्यक्रम भरण्यावर कोणतीच मर्यादा नव्हती २०० हून अधिक सुद्धा प्रेफरन्स भरलेले आहेत. प्राधान्यक्रम कसे भरायचे याच्या स्पष्ट सूचना प्रेफरन्स भरण्यापूर्वीच दि ५ फेब्रुवारी २०२४ म्हणजेच प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी दिलेल्या आहेत. त्यामुळे गुण व अर्हता याचा मेळ घालूनच निवड यादी तयार झाली आहे.

टीईटी बाबत : TET ही अर्हता परीक्षा आहे हे सर्वश्रुत आहे आणि मूळ जाहिरातीत नमूद आहे. अर्हता परीक्षेत सवलत घेतली की खुल्या जागेसाठी पात्र होत नाही, ही बाब सर्वोच्च न्यायालयाने तर निर्णित केली आहेच परंतु महाराष्ट्र शासनाच्या सर्व निवड प्रक्रियांमध्ये अनुसरण्याची कार्यपद्धती आहे. कोणत्याही विभागाची यादी पाहिल्यास ही बाब स्पष्ट होईल.

आरक्षित प्रवर्गाबाबत: आरक्षित प्रवर्गातील सवलतीचा लाभ न घेतलेले खुल्यातून आणि लाभ घेतलेले

आरक्षित कोट्यातून असे दोन्हीकडे आरक्षित प्रवर्गातील अभियोग्यताधारक निवडले गेले आहेत. निवड यादी पाहता एकूण भरतीत मूळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा आरक्षित प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांची संख्या दुपटीहून अधिक आहे. त्यामुळे आरक्षित प्रवर्गावर अन्याय झाला आहे, ही बाब वस्तुस्थितीला अजिबात धरून नाही.

खुल्या प्रवर्गाबाबत : या प्रवर्गात ज्या व्यक्तींचा समावेश होणे कायदेशीर अनुज्ञेय आहे त्या सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे.

कट ऑफ मार्काबाबत: कट ऑफ मार्क मधील फरकाबाबत आरक्षित प्रवर्गातील सवलतींचा लाभ घेतलेली व्यक्ती त्यांच्या त्यांच्या प्रवर्गात सामावली गेलेली आहे. सवलतीचा लाभ घेतलेले उमेदवार मुळात खुल्या पदावर जाण्यासाठी पात्रच नसतात. त्याठिकाणी आरक्षणाचा लाभ न घेतलेले अथवा मूळ खुल्या प्रवर्गातील उमेदवार गेलेले असल्याने एखाद्या प्रकरणात कमी अथवा अधिक झालेल्या कट ऑफ ची तुलना करता येणार नाही. अशी बाब अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये होत असते.

बिंदुनामावली बाबत : २०१९ पासून बिंदुनामावल्या अद्ययावत नव्हत्या. त्या सर्व पुरेसा कालावधी देऊन व त्यावेळी प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपाचे खंडन करून मागासवर्ग कक्षाकडून विधिवत प्रमाणित करून घेतलेल्या आहेत. त्यावर पुराव्यानिशी कोणताही आक्षेप प्राप्त झालेला नाही, केवळ मोघम आरोप केले जात आहेत. तरीदेखील कोणत्याही शंकेला वाव राहू नये म्हणून १० टक्के जागा राखून

ठेवण्यात आल्या आहेत.

तक्रार निवारण : सर्व बाबी कायदेशीररित्या बिनचूक केल्यानंतरही जर काही मुद्दे शिल्लक राहत असतील तर त्यांचे निराकरण करण्याकरता संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठित करण्यात आली आहे. या समितीकडे दाद मागणे शक्य आहे.

पेपर फुटी, घोटाळे इत्यादींमध्ये जर्जर झालेल्या विभागात अत्यंत पारदर्शक पद्धतीने भरतीची प्रक्रिया पूर्ण केल्याची भावना निवड न झालेल्या अनेक उमेदवारांनीसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली आहे.

लवकरच रूपांतरण राऊंड (conversion round) बाबतची प्रक्रियासुद्धा काटेकोरपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

. वरील प्रमाणे सर्व मुद्द्यांचे निरसन होत असताना काही घटक समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती प्रसारित करून, या प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहेत ही बाब सयुक्तिक नाही.

गूगल ने लॉन्च केले chat gpt पेक्षा पॉवरफुल्ल AI APPLICATION...

Thursday, February 29, 2024



काय आहे google gemini? अवघ्या दोन मिनिटांत करेल तुमचे सर्व काम; आणि Free मिळेल 2TB स्टोरेज; अजून काय आहे फायदे?

Google ne नुकतेच नवीन gemini नावाचे Al लाँच केले आहे. शिवाय गुगलने नवीन जेमिनी अॅप देखील लॉन्च केले आहे या अॅपमध्ये अनेक Al वैशिष्ट्ये आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही Content तयार करू शकता, 2TB पर्यंत स्टोरेज विनामूल्य मिळवू शकता. तसेच, तुम्ही त्याला तुमचा डीफॉल्ट सहाय्यक बनवू शकता याचा अर्थ जेव्हा तुम्ही 'Hey Google' म्हणता किंवा होम बटण दाबून ठेवता तेव्हा मिथुन तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काही मिनिटांत देईल त्याची वैशिष्ट्ये आणि ते कसे डाउनलोड करायचे ते जाऊन घ्या.

What is google gemini Al App: Google च्या जेमिनी अॅपमध्ये अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. यामध्ये तुम्हाला अनेक Al टूल्स मिळतात, ज्याच्या मदतीने तुम्ही कंटेंट लिहू शकता, फोटो-व्हिडिओ अपलोड करू शकता गुगल जेमिनी एआय अॅप किती खास आहे, जाणून घ्या


google gemini अॅपमध्ये मिळतील अनेक फायदे

गुगलने त्याच्या वर्कस्पेसची सर्व ज्युएट एआय फिचर्स जेमिनी बैंड अंतर्गत घेतली आहेत याशिवाय, कंपनीने आपले सर्वात प्रगत आणि शक्तिशाली AI मॉडेल जेमिनी अल्ट्रा 1.0 लोकांना उपलब्ध करून दिले आहे हे एक अतिशय उपयुक्त अॅप आहे, जे लोकाना कमी वेळेत मोठ्या असाइनमेंट पूर्ण करण्यास मदत करते तुम्ही google gemini अॅपचा फायदा कसा घेऊ शकता आणि ते कसे डाउनलोड करा  ते येथे जाणून घ्या

या AI टूलमध्ये मिळेल मोफत 2TB स्टोरेज


या प्रगत AI टूलमध्ये, स्टोरेज समस्यांमुळे त्रस्त असलेले वापरकर्ते 2TB पर्यंत मोफत स्टोरेज मिळवू शकतात यासाठी, वापरकर्त्यांना जेमिनी अॅडव्हान्स्डच्या वेबसाइटवर जावे लागेल, जिथे डाव्या बाजूला अपग्रेड टू जेमिनी अॅडव्हान्स्ड पर्यायावर टॅप करा. ते वापरण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तेथे Start Trial हा पर्याय दिसेल तेथे क्लिक करा आणि पेमेंट तपशील भरा या सर्व प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला Google One Al प्रीमियम मोफत मिळेल.

Google One मध्ये 2TB पर्यंतचे स्टोरेज विनामूल्प आहे, जे फक्त 2 महिने चालेल, जर तुम्हाला हा प्लॅन 2 महिन्यांनंतर थांबवायचा असेल

तर तुम्ही Google One रद्द करू शकता.
google gemini अॅप डाउनलोड करून कसे वापरालं

• सर्व प्रथम Google Store वर जा.

सर्च बारमध्ये google gemini टाइप करा आणि अॅप शोधा.

आत्ता Install बटणावर टॅप करा.

आता अॅप उघडा आणि Get Started वर टॅप करा.

• तेथे तपशील वाचा आणि टॅप करा. त्यानंतर पुढील स्क्रीनवर | Agree वर क्लिक करा.

या अॅपमध्ये, वापरकर्ते सामग्री तयार करू शकतात आणि नवीन कौशल्ये शिकू शकतात. याशिवाय तुम्ही अॅपमध्ये टेक्स्ट, व्हॉइस किंवा फोटो इनपुट वापरू शकता.

तुम्ही टाइप करा, बोला किंवा फोटो शेअर करा बॉक्समध्ये प्रश्न लिहू शकता किंवा फोटो अपलोड करू शकता.

किंवा तुम्ही ईमेल आयकॉनवर टॅप करू शकता.

विचारलेले जुने प्रश्न आणि उत्तरे अॅपच्या मध्यभागी असलेल्या 'चॅट्स' विभागात पाहता येतील.

अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला CLICK करा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


28 February 2024

सर्व जिल्ह्यांच्या अहवालानंतरच उर्वरित शिक्षकभरती...



| पुणे : जिल्हा परिषदेकडील
बिंदुनामावली तपासल्यानंतर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून शिक्षक भरण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या १० टक्के जागांबाबत संबंधित जिल्ह्यांकडून अहवाल घेण्यात येत आहेत, काही जिल्ह्यांचा अहवाल प्राप्त झाला नाही. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित रिक्त १० टक्के जागांबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया न्यायालयाच्या निर्णयानंतर केली जाईल, तसेच पुढील नव्याने शिक्षक

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी चालू चाचणीतील उमेदवार पात्र असतील, असे शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकभरतीची प्रक्रिया राबवली जात असून, सुमारे ११ हजार शिक्षकांची पदे भरली आहेत. शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पदभरती या

शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी

प्रकारातील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तसेच अभियोग्यताधारकांना त्यांच्या मागणीनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे. तरीदेखील यासंदर्भात अभियोग्यताधारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे edupavitra2022@ gmail.com या ई-मेलवर तक्रार

अर्ज सादर करता येईल. अनुसूचित जमातीच्या

पेसा क्षेत्रातील १३ जिल्ह्यांतील रिक्त जागांबाबत उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी यापूर्वीच पूर्ण झाली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका दाखल असल्याने पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची पदभरती पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना निवड झाल्यानंतर नवीन पदांवर रूजू होता येईल, तसेच पेसा क्षेत्राबाबत न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या जागांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

पोलीस भरती जाहिरात 1 मार्च पासून सुरु होतील.. महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत..

रायगड चालक 31 जागा

पुणे ग्रामीण चालक 48 जागा


पुणे ग्रामीण जिल्हा 448 जागा

सिंधुदुर्ग चालक 24 जागा


सिंधुदुर्ग जिल्हा 118 जागा

मुंबई लोहमार्ग 51 जागा


पुणे लोहमार्ग चालक 18 जागा

पुणे लोहमार्ग पोलीस 50 जागा


ठाणे शहर चालक 20 जागा

पालघर जिल्हा पोलीस 59 जागा


रत्नागिरी जिल्हा पोलीस 149 जागा

रत्नागिरी चालक पोलीस 21 जागा


मुंबई लोहमार्ग चालक 4 जागा

नवी मुंबई पोलीस भरती 185 जागा


ठाणे शहर पोलीस 666 जागा

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 126 जागा आणि चालक 21 जागा


छत्रपती संभाजी नगर कारागृह 315 जागा पोलीस भरती 212 जागा

जालना जिल्हा पोलीस 102 जागा


जालना चालक 23 जागा

बीड चालक 5 जागा


बीड जिल्हा पोलीस 165 जागा

लातूर जिल्हा पोलीस 44 जागा


परभणी जिल्हा पोलीस 111 जागा

परभणी जिल्हा चालक 30 जागा


नांदेड पोलीस 134 आणि बँड्समन 6 जागा

अमरावती पोलीस 74 जागा


वर्धा पोलीस 20 जागा

भंडारा पोलीस 60 जागा


गोंदिया पोलीस 110 जागा

चंद्रपूर जिल्हा 137 आणि बँड्समन 9 जागा


गडचिरोली जिल्हा 742 जागा

गडचिरोली चालक 10 जागा


नाशिक शहर पोलीस 118 जागा

नागपूर ग्रामीण पोलीस 124 जागा


अहमदनगर जिल्हा पोलीस 25 जागा

अहमदनगर चालक 39 जागा


SRPF दौंड 224 जागा

जळगाव पोलीस 137 जागा


सोलापूर पोलीस 85 चालक 9 जागा

भंडारा शहर पोलीस साठ जागा






सविस्तर PDF साठी CLICK HERE.....
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

27 February 2024

गोंदिया जिल्हा परिषद कागदपत्र पडताळणी वेळापत्रक.....


जिल्हा परिषद नागपूर शिक्षण विभाग (प्राथमिक), जुने सचिवालयाचे मागे, रवीभवन समोर, सिव्हील लाईन, नागपूर- शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये "पवित्र प्रणाली" अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणीवावत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. जाहीर सुचना


जिल्हा परिषद, नागपूर व्दारा शिक्षक पदभरती करीता पवित्र पोर्टलवर दिलेल्या 501 पदांचे जाहीरातीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी 2022 यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर एकुण 345 उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद, नागपूर करीता विकल्प दिलेल्या पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी सदर यादीतील अनुक्रमांकानुसार खालील प्रमाणे नमुद दिनांक व वेळेस पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्रामध्ये नमुद केलेली माहीती व त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रानुसार मुळ कागदपत्राचे तपासणी करीता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सी.पी. ॲन्ड बेरार हायस्कुल जवळ, रवीनगर, नागपूर येथे न चुकता उपस्थित राहावे.


सविस्तर परिपत्रक DOWNLOAD करण्यासाठी खालील IMAGE ला CLICK करा.....
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


*पवित्र प्रणाली शिक्षक पदभरती बाबत अभियोग्यता धारकांना मार्गदर्शन*


 व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला click करा..

https://youtu.be/t9L7E2xDRPQ?si=zNHqa3TO-5H9KwZ6


रयत शिक्षण संस्था मध्ये प्रायार्य , संगणक / संगित / के.जी विभाग शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी मोठी पदभरती !

जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला CLICK करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻




रयत शिक्षण संस्था OFFICIAL WEBSITE साठी



   

पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती रायगड जि. प अलिबाग शिक्षण विभाग.यांचे प्रसिद्धी पत्रक निर्गमित .. दिनांक 03/03/2024 ते दिनांक 06/03/2024 पर्यंत शैक्षणिक कागदपत्रे तपासणी बाबत कार्यवाही पूर्ण करणे...

प्रसिद्धीपत्रक Download करण्यासाठी CLICK HERE.... 👇🏻👇🏻

26 February 2024

अद्यापही शिक्षकांच्या १० हजारांवर जागा रिक्त...




पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात असून, पात्र उमेदवारांची शिफारस केल्यानंतरही शिक्षकांच्या तब्बल १० हजारांवर जागा रिक्त राहिल्या आहेत. यातील मुलाखतीशिवाय पदभरतीच्या तब्बल ५ हजार ७१४ जागा रिक्त राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवाडीनुसार एकूण २१ हजार ६७८ पैकी मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ पदे होती. त्यातील ११०८५ उमेदवारांची शिफारस झाली, तर ५ हजार ७१७ पदांसाठी शिफारस झालेली नाही. आरक्षणाचा विचार करता माजी सैनिक (१५ टक्के) उमेदवार नसल्यामुळे २ हजार ३५७ जागा व अंशकालीन (१० टक्के) उमेदवार नसल्यामुळे १ हजार ५३६ जागा तसेच खेळाडू (५ टक्के) उमेदवार नसल्यामुळे ५६८ जागा रिक्त राहिल्या आहेत.

झाल्यास भरतीच्या शेवटी दुसरी फेरी

घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार

मुलाखतीशिवाय जाहिरातीतील रिक्त

जागा भरल्या जातील. मुलाखतीसह

या प्रकारातील एकूण ४ हजार ८७९

मुलाखती- शिवाय भरतीच्या हजार ७१४ रिक्तच ५ जागा

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवाडीनुसार, भाषा विषयाचा विचार करता पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यम १५८५, मराठी माध्यम ८७०, उर्दू माध्यम ६४० जागा व सहावी ते आठवी गटातील गणित-विज्ञान २२३८ जागा रिक्त राहिल्या आहेत. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानुसार मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी १:१ या प्रमाणात उमदेवार देण्यासाठी व्यवस्थापननिहाय त्यांच्या

जाहिरातीतील पदे विचारात घेऊन गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवार उपलब्ध न झाल्याने पहिल्या फेरीमध्ये समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न

जागांची मुलाखतीसाठी शिफारस करण्याची कार्यवाही सुरू आहे. १:३ ऐवजी १:१० या प्रमाणात उमेदवार देण्याबाबत शासन आदेश व न्यायालयीन प्रक्रिया विचारात घेऊन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार शासनपत्र २१ फेब्रुवारी २०२४ नुसार नियमावलीमध्ये सुधारणा होईपर्यंत १:१० या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या ११८९ संस्थांना ४८७९ रिक्त पदांसाठी योग्य ती प्रक्रिया करून १:१० या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जातील. मुलाखती शिवाय पदभरतीसाठी १:१ या प्रकारात निवडलेले उमेदवार वगळून अन्य उमेदवारांमधून मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या संस्थांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या आधारे निवड केली जाईल. यासाठी ३० गुणांची तरतूद

पडताळणीनंतर नियुक्ती

गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी राज्यस्तरावरून वेळापत्रक ठरवून दिले जाईल. त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर योग्य ते वेळापत्रक तयार करून पदस्थापनेपर्यंतची कार्यवाही केली जाईल. त्यामध्ये दिव्यांग व महिलांना प्राधान्य दिले जाईल. मूळ कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्ती देण्याची कार्यवाही केली जाईल, असेही शिक्षण

विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

केली असून, उमेदवारांची निवड

संस्था करणार आहे.

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular