10 February 2024

D.L.ED परीक्षेचा ६३.९४ टक्के निकाल.


खाजगी संस्था पुढील टप्पा ( phase 2 ) ची जाहिराती ची कार्यवाही शासन स्थरावरून सुरु.

 खाजगी संस्था पुढील टप्पा ( phase 2 ) ची जाहिराती ची कार्यवाही शासन स्थरावरून सुरु.... ✅️

 जे उमेदवार या राउंड ला एकही पसंतिक्रम देणार नाहीत ते पुढील राउंड (Phase-2) साठी पात्र असतील (आपल्या जिल्हात खाजगी संस्था आल्या नसतील तर  )...

 आपल्या जिल्हातील खाजगी संस्था आल्या नसतील तर प्रधान्यक्रम देऊ नका phase 2 मध्ये तुम्ही तुमच्या जिल्हासाठी संस्था साठी पात्र असाल ( ✅️ जर तुम्ही दुसऱ्या जिल्हातील खाजगी संस्थेत निवड झाली तेव्हाच तुम्ही phase 1 मधून बाद ह्याल )...✅


09 February 2024

मराठी माध्यमाचे विद्यार्थी देऊ शकतात 'सेमी इंग्रजी 'साठी प्राधान्यक्रम

📌मराठी माध्यमाच्या उमेदवार यांना सेमीचे प्राधान्य क्रम देता येणार औरंगाबाद उच्च न्यायालय

निकाल नंतर लागेल परंतु सद्या सेमी इंग्रजीच्या जागेवर मराठी माध्यमाच्या उमेदवार प्राधान्य क्रम देऊ शकतात, औरंगाबाद उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले










👇🏻👇🏻👇🏻👇🏻Join To my Group👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻






शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा उच्च न्यायालयाने उठवली स्थगिती : राज्यात शाळांमध्ये १५ हजार जागा रिक्त

 राज्यात शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेवर असलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, राज्यात येत्या काळात 15 हजारांवर कर्मचा-यांची भरती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात 23 हजार 533 लिपिकांची पदे मंजूर झाली आहेत. तर 2 हजार 118 ग्रंथपालाची पदे मंजूर आहेत. 6 हजार 732 प्रयोगशाळा सहायकांची पदे अशी एकूण 32 हजार 383 पदे मंजूर आहेत. यातील लिपिकाची 11 हजार 700 च्या आसपास पदे रिक्त आहेत. ग्रंथपालाची 1 हजारच्या आसपास पदे रिक्त आहेत.

परंतु, अर्धवेळ ग्रंथपालांना आता पूर्णवेळ पदभार देण्यात येणार असल्यामुळे ग्रंथपालांची नव्याने पदभरती होण्याची शक्यता कमी आहे. परंतु, प्रयोगशाळा सहायकाच्या 6 हजार 732 पदांपैकी 3 हजार 300 आणि लिपिकाची 11 हजार 700 अशी एकूण 15 हजार पदांची भरती होऊ शकते. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचान्यांची भरती होत नव्हती. शिक्षकेतर कर्मचा-यांच्या आकृतिबंधाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका जिल्हा संघटनेने आध्यान दिल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचा-यांच्या भरतीवर तात्पुरती स्थगिती दिली होती. त्या नुसार माध्यमिक शाळांच्या दरवर्षीच्या संच मान्यतेमध्ये शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मंजूर पदांचा उल्लेख केला जात नव्हता.
त्यामुळे संपूर्ण राज्यभर शिक्षकेतर कर्मचारी पदभरती व पोचतीची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. याविरोधात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाने अनेक वेळा
आंदोलने केली. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी संबंधित पदभरतीवर घातलेली बंदी उठवली व सदर केस निकाली काढली, राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या विनंतीनुसार शासनाने
मोलाचे सहकार्य करून याविषयी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून शिक्षकेतर कर्मचा-यांना न्याय देण्यासाठी पाऊल उचलले आहे. राज्यभरात अनेक वर्षांपासून पदभरतीच्या व
पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकेतर कर्मचारी भरती लवकरच सुरू होईल, अशी
अपेक्षा पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे कार्याध्यक्ष प्रसत्र कोतूळकर यांनी व्यक्त केली.


08 February 2024

पसंतीक्रम देण्याची सुविधा १२ तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे, लवकरच प्रसिद्धपत्र जाहीर होईल.सुरज मांढरे सर.. शिक्षण आयुक्त

*🛑 पसंतीक्रम :* 

◼️पसंतीक्रम देण्याची सुविधा १२ तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे, लवकरच प्रसिद्धपत्र जाहीर होईल.
◼️ज्यांचे पसंती क्रम देण्याचे काम पूर्ण झालेले आहे अशा अभियोग्यताधारकांना त्यांचे पसंती क्रम लॉक करण्याची सुविधा उद्यापासून उपलब्ध करून देण्यात येईल.

*सूरज मांढरे साहेब (आयुक्त शिक्षण)*






राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याबाबत.



महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकिर्ण-२०२४/प्र.क्र.२७/एस.डी.-४ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

शासन परिपत्रक:-

दिनांक :- ०८ फेब्रुवारी, २०२४.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक ५ डिसेंबर, २०२३ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान मा. राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती.

२. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिक वरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केली असता, प्राधान्याने खालील महत्वाच्या बाबी समोर आल्याआहेत:-

१. राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळापैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी ७ नंतर असल्याचे दिसून येते.

२. आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा, वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने चाजविले जाणारे कर्कश संगीत इ. अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे.

३. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात.

४. सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात, त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो.

५. मोसमी हवामान, विशेषता हिवाळा व पावसाळा या ऋतू मध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे,

पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. ते बहुदा आजारी पडतात. ६. सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत

सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते.

७. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅन द्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.

शासन परिपत्रक क्रमांकः संकिर्ण-२०२४/प्र.क्र.२७/एस.बी.-४

८. यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

९. यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुस-या सत्राचा विचार करावा.

३. उपरोक्त परिस्थितीचा विचार करता सकाळी ९ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते. यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी ९ किंवा ९ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहेत:-

अ) राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्त पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी ९ वा. च्या अगोदरची आहे, त्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते। थी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी ९ किंवा ९ नंतर ठेवावी.

ब) शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार का. २००९ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी.
 क) ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी/शिक्षण निरिक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी, यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी/शिक्षण निरिक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी.

४. वरील परी. ३ मधील सुचनांचे पालन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करतील याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी घ्यावी,

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४०२०८१७२०३६२८२५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

TUSHAR VASANT

MAHAJAN

(तुषार महाजन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन 



प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,

२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,

३. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,

४. मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,

. मा. अध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र, मुंबई, ५

पृष्ठ ३ पैकी २

शासन परिपत्रक क्रमांका संकिर्ण-२०२४/प्र.क्र.२७/एस.डी.-४

६. मा. सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र, मुंबई,

७. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांचे खाजगी, मंत्रालय, मुंबई-३२.

८. प्रधान सचिव (शालेय शिक्षण) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

९. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र, पुणे

१०. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

११. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

१२. शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

१४. निवड नस्ती.

१३. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे





07 February 2024

दिनांक ०७/०२/२०२४ शिक्षक पदभरतीबाबत प्रसिध्दीपत्र


आजची कार्यवाही -

पवित्र पोर्टलवर दिनांक ०५/०२/२०२४ जाहिरातीनुसार उमेदवारांच्या पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम उपलब्ध झाले आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जाहिराती व प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

त्यानुसार ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाहीत त्यांची निवेदने ईमेलवर प्राप्त झाली आहेत.

सदर निवेदनांची पडताळणी केली असता त्यामध्ये उमेदवारांकडून आवश्यक माहितीची अचूक नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये न केल्याने त्यांना योग्य ते प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे,

याशिवाय खालील प्रकारच्या पात्र उमेदवारांना तांत्रिक कारणास्तव त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले नसल्याचे दिसून आले आहे. याचाबतच्या अडचणीचे निराकरण करण्यात आले आहे. आता या पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत.

अशा पात्र उमेदवारांनी त्यांचे पूर्वीचे जनरेट झालेले प्राधान्यक्रम डिलीट करुन नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करणे आवश्यक आहे. तदनंतरच त्यांना पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम जरनेट होतील याची नोंद घ्यावी.

1. काही बी. एस्सी पदवीप्राप्त उमेदवारांनी त्यांचे पदवीचे विषय केमेस्ट्री अशी नोंद न करता त्यांनी

ऑरगॅनिक केमेस्ट्री, इनऑरगॅनिक केमेस्ट्री, फिजीकल केमेस्ट्री इत्यादी अशा नोंदी केल्या आहेत. ii. काही एम.एस्सी पदव्युत्तरपदवी प्राप्त उमेदवारांनी त्यांचे सदरचे विषय केमेस्ट्री, बायोलॉजी असे नमूद केले आहेत. प्रत्यक्षात त्यांनी केमेस्ट्रीच्या बाबतीत ऑरगॅनिक केमेस्ट्री, इनऑरगॅनिक केमेस्ट्री, फिजीकल केमेस्ट्री अशी नोंद केली नाही. तसेच बायोलॉजी विषयाच्याबाबतीत झुलॉजी, बॉटनी अशो नोंद केली नाही,

iii. काही एम.कॉम. पदव्युत्तरपदवीप्राप्त उमेदवारांनी त्यांचे पदव्युत्तरपदवीचे विषय बैंकिग, इकोनॉमीक्स, विझीनेस मैनेजमेंट अशी नोंद केली असल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नव्हते,

उपरोक्त । ते iii विषयांच्या उमेदवारांना आता आवश्यक प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत.

काही उमेदवारांना इ. ९ वी ते १२ वी करिता खाजगी व्यवस्थापनांचे प्राधान्यक्रम वयोमर्यादेच्या कारणास्तव जनरेट झाले नसल्याचे दिसून येत आहे. या अडचणीचे निराकरण लवकरच करण्यात येत आहे.

प्राप्त ईमेलवरील संदेशांना योग्य उत्तरे दिली जात आहेत. प्रत्यक्षात वरील बाबांशी संबंधित असलेल्या ईमेलमधील अडचणीचे निराकरण झालेले आहे. ईमेलची संख्या पाहता उत्तर प्राप्त होण्यासाठी उमेदवारांनी प्रतिक्षा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

कार्यालयामध्ये अभियोग्यताधारकांनी गर्दी करु नये केवळ ई-मेलचा वापर करावा, ईमेलद्वारे जास्तीत जास्त शंकांचे निरसन केले जाईल.



04 February 2024

शिक्षकांच्या २२ हजार जागांची भरती अखेर मुहूर्त सापडला : पवित्र पोर्टलवर आज प्रसिद्ध होणार जाहिराती


शिक्षकांच्या २२ हजार जागांची भरती

अखेर मुहूर्त सापडला : पवित्र पोर्टलवर आज प्रसिद्ध होणार जाहिराती

प्रभात वृत्तसेवा

पुणे, दि. ४ राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात येणार आहे. याअंतर्गत २२ हजार जागांसाठी सोमवारी (दि.५) पवित्र पोर्टलका जाहिराती • प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यातून शिक्षक - भरतीला प्रत्यक्ष मुहूर्त सापडणार आहे.

शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी २०२२ चे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या चाचणीसाठी . एकूण २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी

नोंदणी केली. त्यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवार प्रविष्ट झाले. जून ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदुनामावलीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर चिंदुनामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यामुळे जिल्हा परिषदेच्या १०

टके रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदांमध्ये सध्या ७० टक्के रिक्त जागांवर पदभरती करण्यात पेत आहे. प्रचलित शासन निर्णयाचे पालन करूनच ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे

गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांची आंतरजिल्हा बदली, मराठी इंग्रजी माध्यम बाद, केंद्र शाळेवर साधनव्यकी नियुक्ती आदी कारणांमुळे भरती प्रक्रिया लांबली होती. त्यानंतरही उमेदवारांमध्ये शिक्षक भरतीबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. अखेर राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या १६ हजार जागा मुलाखती न

घेता भरण्यात येणार आहेत. खासगी शिक्षण संस्थांमधील ६ हजार जागा मुलाखती घेऊन भरण्यात येणार आहेत, या जागांच्या जाहिराती आता प्रसिद्ध होणार आहेत, भरती प्रक्रियेबाबत सविस्तर वेळापत्रकही जाहीर होणार आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे ८०० जागा या भरती प्रक्रियेत बावल्या आहेत. कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या जागा पुढील टप्प्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे केवळ जिल्हा परिषदेच्याच नाही, तर खासगी शिक्षण संस्थेच्या जागांवर सुद्धा उमेदवारांना शिक्षकांची नोकरी मिळणार आहे.




 शिक्षक भरतीचा कालबध्द कार्यक्रम

✓ पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करणे: 05 फेब्रुवारी 2024 पर्यंत

✓ उमेदवारांकडून पसंतीक्रम घेणे : 05 ते 15 फेब्रुवारी

✓ निवड यादी प्रसिध्द करणे: 22 ते 26 फेब्रुवारी

✓ निवड झालेले उमेदवारांची कागदपत्र पडताळणी

27 फेब्रुवारी ते 04 मार्च

✓ समुपदेशन व नियुक्तीपत्रः 06 ते 10 मार्च


Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular