04 February 2024

संच मान्यता सन 2023-24 बाबत महत्वाची सूचना

संच मान्यता सन 2023-24 बाबत महत्वाची सूचना

  सर्व मुख्याध्यापकांना सूचना आहे की, आपल्या शाळेची सन 2023-24 ची संच मान्यता  (दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी कार्यरत असलेले शिक्षक व शिक्षकेतर) Online School Portal मधील संच मान्यता प्रणाली मध्ये Working Teaching Staff व Non Teaching staff सन 2023 - 24 ची माहिती प्राधान्याने व काळजीपूर्वक भरावी.

आपल्या शाळेतील माहिती संच मान्यता प्रणाली मध्ये भरताना संच मान्यता पोर्टल लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूला Home, School Information आणि Working Post असे 3 पर्याय दिसतील. यापैकी प्रथम Working Post मध्ये Working Staff Teaching वर Click करावे. त्यानंतर प्रथम Medium Select करून काळजीपूर्वक माहिती भरून प्रथम Update करावी. Update केल्यानंतर तपासून भरलेले सर्व कार्यरत शिक्षक माहिती अचूक असल्याची खात्री करून Finalize करावी. त्यानंतर Working Staff Non-Teaching वर Click करून कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरावी. Update करावी. माहिती अचूक असल्याची खात्री करून नंतरच Finalize करावी.
काही शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत नसल्याने अशा शाळा शिक्षकेतर माहिती भरत नाहीत. परंतु अशा शाळांनी Non Teaching staff मध्ये शून्य टाकून Update व Finalize करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. दोन्ही माहिती म्हणजेच Teaching आणि Non Teaching कार्यरत कर्मचारी माहिती भरल्याशिवाय संच मान्यता Generate होत नाही याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी.
संच मान्यता link 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Sanch manyata
2023-24
 
माहितीसाठी

02 February 2024

महावाचन उत्सव' या उपक्रमाबाबत Google link भरुन पाठविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

समग्र शिक्षा अभियान 

निपुण भारत

आजादी अमृत महोत्सव

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र. मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०१३-१४/३८२

प्रति,

शिक्षणाधिकारी (प्राथ)/ (माध्यमिक),

जिल्हा परिषद,

दि. - 2 FEB 2024

सर्व जिल्हे.

विषय :- महावाचन उत्सव' या उपक्रमाबाबत Google link भरुन पाठविण्याबाबत.

संदर्भ :-

१. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण- २०२३/प्र.क्र.३६०/एसडी-४ दि. २२/११/२०२३.

२. या कार्यालयाचे मार्गदर्शक सुचना जा.क्र. मग्राशिप/सशि/वाच/काअ/ २०२३-२४/३२३६ दि. ०४/१२/२०२३. ३

. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/१७३ दि.१६/०१/२०२३.

महावाचन उत्सवाच्या कार्यवाहीबाबत संदर्भीय पत्र क्र. १ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये महावाचन उत्सव या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेला आहेत.

राज्यातील सर्व शाळांमध्ये "महावाचन उत्सव" हा उपक्रमांतर्गत विषय थिम राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करण्याबाबतची थिम सर्व जिल्हा व महानगरपालिकांमध्ये राबविण्याबाबत संदर्भीय पत्र क्र. ३ अन्वये अवगत करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने सदर थिम आपल्या जिल्ह्यात राबविताना आपल्या जिल्ह्यातील एकूण शाळा संख्या, एकूण विद्यार्थी संख्या आणि सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या याचा तपशिल या कार्यालयास उलट टपाली कळविण्यात यावा, तसेच या सोबत https://forms.gle/Na7J4UFsYqhmSh9b6 Google link देण्यात येत आहे. यात अचूक माहिती भरुन दि. ०८/०२/२०२४ पर्यंत पाठविण्यात यावी,

Cry (संजय डोर्लीकर)

उप संचालक (प्रकल्प /प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई.

प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तव रवाना:-

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,

२. आयुक्त (शिक्षण), महानगरपालिका, सर्व,

३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व,

४. प्रशासन अधिकारी (शिक्षण)/ शिक्षणाधिकारी महानगरपालिका सर्व,

५. शिक्षण निरिक्षक, (उत्तर/ दक्षिण/पश्चिम), मुंबई.

जवाहर बाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई ४०० ००४. टेलिफोन नं. ०२२-२३६३६३९४२३६७९२६७ २३६७ १८०८ २३६७ १८०९, २३६७ १२७४

संकेस्थळ https://samagrashiksha.maharashtra.gov.in


https://mpsp.maharashtra.gov.in



Form Link
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://forms.gle/Na7J4UFsYqhmSh9b6






पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे विद्यार्थी परिक्षा प्रवेशपत्र शाळा लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत_*

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) हो दि. १८/०२/२०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
प्रवेशपत्र Download करण्यासाठी खाली दिलेल्या link ला click करा... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻https://2024.mscepuppss.in/LoginPage.aspx

01 February 2024

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत.

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, ३ चर्च पथ, पुणे-४११००१

दूरध्वनी क्र. ०२०-२६१३७१८६.२६१२७५६९

ईमेल - sjdprematricdbt@gmail.com

जा.क्र.सकआ/शिक्षण/मॅट्रिकपूर्व शिष्य/का ४-अ/२०२३-२४/३४४

दि. ०१/०२/२०२४

अत्यंत महत्वाचे/ तात्काळ

प्रति,

१. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण (सर्व)

२. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, (सर्व)

३. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

विषय- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत.

उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खालील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत.

१. सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता

२.इ.९ वी १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

३. साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

४.इ.५ वी ते ७ वी आणि इ.८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या

५. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क

६. महर्षि विठ्ठल

चर नमुद केलेल्या सर्व योजनांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करणेकरीता खालीलप्रमाणे कार्यप्रणाली अवलंबण्यात यावी. १. महाडीबीटी प्रणाली वेब लिंक- https://prematric.mahait.org/Login/Login

२. मुख्याध्यापक लॉगीन तयार करणे महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्जाच्या नोंदणीसाठी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी यूजर आयडीमध्ये Pre_SE२७XXXXXXXXXXXX_Principal आणि पासवर्डमध्ये Pass१२३ टाइप करून लॉग इन करावे.

३. शाळेचे प्रोफाईल अद्ययावत करणे- यामध्ये शाळेची मुख्याध्यापकांची व लिपिकाची माहिती अद्ययावत करावी. ४. विद्यार्थी प्रोफाईल अद्ययावत करणे यामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी.

५. योजनेची निवड करणे यामध्ये संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेकरीता अर्ज नोंदणी करणे.

तरी वर नमुद केलेल्या योजनांचे पात्र सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करणेकरीता आपले स्तरावरुन संबंधित सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांना तात्काळ आदेशित करावे. याबाबत मा. आयुक्त महोदय साप्ताहिक बैठकीमध्ये आढावा घेणार आहेत. त्यामुळे सर्व शाळांची १०० टक्के अर्ज नोंदणी होईल याकरीता आपले स्तरावरुन कार्यवाही करावी. याबाबतीत दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी.

(प्रमोद जाधव) सहआयुक्त (शिक्षण), समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत- मा. आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे स्वीय सहाय्यक

Online clink
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://prematric.mahait.org/Login/Login


31 January 2024

अतितात्काळ बैठक लावणे बाबत

अतितात्काळ

मुख्यमंत्री सचिवालय / मुलाखत कक्ष

दिनांक :- ३१.०१.२०२४

प्रति, मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

विषय :-

१) सन २०२३-२४ या वर्षाची शेवटच्या वर्गाची पटसंस्खा गृहीत धरुन शाळांना अनुदान देणेबाबत बैठक.

२) २०२१ मध्ये ३० दिवसाची मदत देऊन त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा देणेबाबत.

३) पुणे स्तरावरील त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदान घोषित करणेबाबत.

४) दिनांक ०१.०१.२०२४ पासून टप्पा अनुदान प्राप्त शाळांना पुढील टप्पा देणेबाबत.

५) क्षेत्रीय स्तरावरील विना अनुदानीत शाळांना अनुदानावर आणण्यासाठी २०२३-२४ हे वर्ष सर्व निकषांसाठी गृहीत धरुन त्यांचे मुल्यांकन करुन त्यांना अनुदान देणेबाबत.

महोदय,

मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली श्री. अब्दुल सत्तार, मंत्री, पणन, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, श्री. श्रीकांत गोविंदराव देशपांडे, मा. विधान परिषद सदस्य व अॅड. तुकाराम शिंदे, सं. अध्यक्ष, महाराष्ट्र कुणबी मराठा संघटना यांच्या पत्रात नमुद केलेल्या वरील विषयाबाबत बैठक आयोजित करण्याची विनंती मा. मुख्यमंत्री सचिवालयाकडे प्राप्त झाली आहे.

त्याअनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदयांकडे तात्काळ आयोजित करावयाच्या बैठकांच्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार बैठकीबाबतची संक्षिप्त माहिती सोमवार, दि. ०५ फेब्रुवारी, २०२४ रोजी दुपारी ०२.०० वा. पर्यंत मुलाखत कक्षाकडे पाठविण्याची तसेच cmengsection@maharashtra.gov.in या ई-मेलवर कृपया पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी, ही विनंती.

प्रत माहितीस्तव :-

(नितिन दळवी) उप सचिव

प्रधान सचिव, मुख्यमंत्री सचिवालय (मुलाखत कक्ष) यांचे स्वीय सहायक.




30 January 2024

शिक्षण सेवक उमेदवारांसाठी आणखी एक परीक्षा | कामगिरी समाधानकारक नसल्यास सेवा समाप्त


पुणे : पुढारी वृत्तसेवा राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष शिक्षक भरतीकडे लागलेले असताना आता शिक्षक भरतीमधून शिक्षण सेवक होणाऱ्या उमेदवारांना आणखी एका परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची आता कौशल्य चाचणी घेतली जाणार असून, त्यात समाधानकारक कामगिरी नसलेल्या उमेदवारांची सेवा समाप्त केली जाणार असल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

पवित्र संकेतस्थळावरील भरती प्रक्रियेत सेमी इंग्रजी शाळांसाठी नोंदवण्यात येणाऱ्या मागणीला अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्यांमधून शिफारस करण्यात येणार आहे. परंतु, अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रादेशिक विद्या

इंग्रजी साधन व्यक्ती पदाच्या जागा राखून ठेवणार

इंग्रजी साधन व्यक्ती या पदासाठी इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा आरोप करून आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या साधन व्यक्तीच्या जागा तूर्तास राखून ठेवण्याबाबत परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे. या कौशल्य चाचणीत संबंधित शिक्षण सेवकाची

कामगिरी असमाधानकारक असल्यास त्याची सेवा समाप्त करावी, अशी अट नियुक्ती आदेशात नमूद करावी, असे परिपत्रकात स्पष्ट

करण्यात आले आहे.

सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये १९ जून २०२३च्या शासन निर्णयानुसार सेमी इंग्रजी साधन व्यक्ती आणि १३ ऑक्टोबर २०२३च्या शासन निर्णयानुसार इंग्रजी साधन व्यक्ती अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदांची मागणी नोंद करावी, तसेच, आज मंगळवार (दि. ३० जानेवारी) पर्यंत पवित्र संकेतस्थळावरील जाहिरातविषयक कार्यवाही पूर्ण करावी, असेही स्पष्ट केले आहे.




MSBCC Survey 2024 Update - मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षणास मुदतवाढ !

 

राज्य मागासवर्ग आयोगाने दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सर्वेक्षणास मुदतवाढ देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


महाराष्ट्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण दि.३१.१.२०२४ पर्यंत पूर्ण करण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले होते. तथापि काही ठिकाणी हे सर्वेक्षण ३१.१.२०२४ पर्यत पूर्ण होऊ शकत नसल्याने सर्वेक्षणास मुदतवाढ देण्याची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे निदर्शनास आले आहे. यास्तव सर्वेक्षणास दिनांक २.२.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी आपल्या जिल्हा / महानगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षणाचे काम दि.२.२.२०२४ पर्यंत १००% पूर्ण करावे व दि.३.२.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत आपल्या क्षेत्रातील सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगास पाठविण्यात यावे ही विनंती.


आपली,


(आ. उ.पाटील)


सदस्य सचिव


महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे.




29 January 2024

वर्ग 10वी. 2024 चे EXAM HALLTICKET उपलब्ध ..

प्रति,
जा. क्र.रा.मं./परीक्षा-७/371 दिनांक २९/०१/२०२४

१) मा. महामंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-४०००३२

२) मा. विभागीय प्रसिध्दी उपसंचालक, पुणे/नागपूर/छत्रपती संभाजीनगर/मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण

३) मा. संचालक, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई-४०००३०

४ ) मा, संचालक, आकाशवाणी, मुंबई केंद्र, नवीन प्रसारण भवन, बैंकले रेक्लेमेशन, आमदार निवासाजवळ, मुंबई-४०००२०

५) मा. संचालक, आकाशवाणी केंद्र

पुणे/नागपूर / छत्रपती संभाजीनगर /मुंबई/जळगांव रानागिरी/सांगली/कोल्हापूर/सातारा/सोलापूर/नाशिक

६) सर्व जिल्हा प्रसिध्दी अधिकारी

७ ) मा. संपादक, सर्व वृत्तपत्र / वृत्तवाहिन्या

विषयः- मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (३.१० वी) परीक्षेच्या अऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket)...

महोदय,

मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) अऑनलाईन (Online) पध्दतीने उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रकटर सोबत जोडले आहे.

सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील मृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रानी त्यांच्या वृत्तपत्रात / प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.

आपली विश्वासू,

(अनुराधा ओक)

प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी:-

सचिव, राज्य मंडळ, पुणे ०४

१ ) विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे/नागपूर / छत्रपती संभाजीनगर /मुंबई/कोल्हापूर/अमरावती /नाशिक/लातूर/कोकण विभागीय मंडळ,

पुणे/नागपूर / छत्रपती संभाजीनगर /मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण त्यांनी स्थानिक स्तरावर प्रकटन

प्रसिध्द करावे, व सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणावे. ) व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्य मंडळ, पुणे २

३) अस्वीस व सस्वीस राज्यमंडळ, पुणे ४) ग्रंथालय, राज्यमंडळ, पुणे ५) ऑनलाईन विभाग प्रत माहितीसाठी सविनय सादर-

१) मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२

२) मा. खाजगी सचिव, मा. मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२ ३) मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-४११००९
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.

प्रकटन

विषय :- मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या ऑनलाईन

प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket)....

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (

Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे

(Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार दि. ३१ जानेवारी, २०२४ पासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील, या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की,

१. मार्च २०२४ मधील इ. १० वी परीक्षेसाठीसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. १० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.

२. प्रवेशपत्र (Hall Ticket) उघडताना (Open) काही त्रुटी (Error) आल्यास सदर प्रवेशपत्र Google

Chrome मध्ये उघडावे.

३. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी ४

विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.

५. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.

६. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.

७. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने

व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.

तरी मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी,

दिनांक : २९/०१/२०२४


(अनुराधा ओक) सचिव,

राज्य मंडळ, पुणे ४.


परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी CLICK करा..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


28 January 2024

आजपासून 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षक भरती यंत्रणा लागली कामाला : पहिल्या टप्यात १५ हजार शिक्षकांना संधी.

आजपासून 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षक भरती

यंत्रणा लागली कामाला : पहिल्या टप्यात १५ हजार शिक्षकांना संधी

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : शालेय शिक्षणमंत्री दीपक

केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे शिक्षक भरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली असून सोमवारी (दि.२९) शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्यातील सुमारे १५ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा शिक्षक भरतीला अडथळा येऊ नये, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिकांच्या शाळांसह काही खासगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक जाहिराती पवित्र पोर्टल वर अपलोड झाल्या आहेत.

एप्रिलनंतर भरतीचा दुसरा टप्पा

सध्या सुरू असलेली शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी संपविली जाणार आहे. त्यानंतर भरतीचा दुसरा टप्पा एप्रिल-मे महिन्यात राबविला जाणार आहे. तत्पूर्वी, टीईटी होईल आणि त्यानंतर टेट होऊन दुसया टप्यातील शिक्षक भरतीला प्रारंभ होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

पवित्र पोर्टलवर ज्या 'टेट' उत्तीर्ण उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांच्याकडून आता प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. त्याची सुरुवात सोमवार, दि. २९ रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनुदानित माध्यमिक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी 22 जानेवारी पर्यंत देण्यात आली होती. आता ही मुदत संपुष्टात आली असून ज्या शाळांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतलेली नाही आणि २०२२- २३मधील संच मान्यता अपूर्ण आहे, त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करता येणार नाही. उर्वरित शाळांना आता शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात संधी दिली जाणार आहे.

25 January 2024

राज्यात शासन सरळसेवा पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत...

राज्यात शासन सरळसेवा पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत...
सविस्तर GR डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला CLICK करा.

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular