20 August 2025

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२४ प्रसिध्दी पत्रक





महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे - ०४

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२४

प्रसिध्दी पत्रक

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ परीक्षेचे आयोजन दि. १०/११/२०२४ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्र. (इ. १ ली ते इ. ५ वी स्तर) व पेपर क्र. । (इ. ६ वी ते इ. ८ वी स्तर) चा अंतिम निकाल दि. १४/०२/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात आलेला आहे.

सदर परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या त्या जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद / शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचे कार्यालयाकडे हस्तपोहोच देण्यात येत आहे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचे कार्यालयात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप दिनांक ०१/०१/२०२५ ते ०८/०१/२०२५ या कालावधीत केले जाणार आहे. पात्रता धारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाईट वरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्हयात परीक्षा दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक मंबई (उ/द/प) यांचे कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.

ठिकाण : पुणे

दिनांक: २०/०८/२०२५

(अनुराधा ओक)

आयुक्त

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

पुणे - ०४

19 August 2025

BED व DED विध्यार्थ्यांचा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा राखीव निकाल 2025.

BED व DED विध्यार्थ्यां चा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा  निकाल राखीव ठेवलेले विध्यार्थी बघण्यासाठी ....*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
   

04 August 2025

🔸महाज्योती संस्थेमार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरीता समान धोरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग दिल्ली व महाराष्ट्र येथील प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा व संयुक्त गट ब व क परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज..



🔸महाज्योती संस्थेमार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरीता समान धोरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग दिल्ली व महाराष्ट्र येथील प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा व संयुक्त गट ब व क परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज...
.
----------------------------------------

परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

01 August 2025

महाराणा प्रताप विद्यालय, देऊळगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.


देऊळगाव (ता. जामनेर) – महाराणा प्रताप विद्यालय, देऊळगाव येथे १ ऑगस्ट रोजी थोर समाजसुधारक, लोककलावंत व लेखक अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि थोर राष्ट्रनेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महान व्यक्तींच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक व साहित्यिक योगदानाबाबत माहिती दिली. त्यांनी श्रमिक समाजासाठी निर्माण केलेले साहित्य आजही प्रेरणादायी आहे, असे सांगण्यात आले.
तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचा व स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर भाषणे, गीतं व नाट्य सादर केली.

प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना दोन्ही महान विभूतींच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक व सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने करण्यात आले.या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशा पद्धतीने आज महाराणा प्रताप विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular