21 May 2025

ब्रेकिंग न्यूज.....सेकंड फेज लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे .

📌 पवित्र पोर्टल टप्पा 2 याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत
सर्व याद्या डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या LINK ला CLICK करा...
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

20 May 2025

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी १६ जूनपर्यंत करता येणार अर्ज; वेळापत्रक जाहीर

मुंबई :
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार https://poly25.dtemaharashtra.gov.in/
 या अधिकृत संकेतस्थळावर २० मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली, असून विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर गुणवत्ता यादी २३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

तीन वर्ष कालावधीच्या, पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तुकला अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठीचे  वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २० मे पासून १६ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करता येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन व प्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. त्यानंतर निश्चित होणारे अर्ज हे संस्थास्तरावरील फेरीसाठी विचारात घेण्यात येणार आहे. १८ जून रोजी संकेतस्थळावर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये दर्शविलेल्या माहितीमध्ये विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास १९ ते २१ मे दरम्यान विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवता येणार आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी २३ जून रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.

पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे – २० मे ते १६ जून
प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे – २० मे ते १६ जून
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे – १८ जून
तात्पुरत्या गुणवत्ता यादीसंदर्भात हरकत सादर करणे –१९ ते २१ जून
गुणवत्ता यादी जाहीर करणे – २३ जून
अडचणी दूर करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक
प्रवेश अर्ज भरण्याबरोबरच प्रवेश प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास ती दूर करण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाकडून ७६६९१००२५७/ १८००३१३२१६४ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. हा हेल्पलाईन क्रमांक सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सुरु राहणार आहे.

प्रवेशासाठी शुल्क
राज्यातील खुल्या प्रवर्ग, राज्याबाहेरील आणि जम्मू काश्मिर व लडाख या संघराज्यातून विस्थापित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये, तसेच राज्यातील सर्व राखीव प्रवर्ग आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये शुल्क अर्ज भरताना ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

15 May 2025

महाराणा प्रताप विद्यालय, देऊळगाव गुजरी यंदाही १००% निकालासह उज्ज्वल यश! निकालाची यशस्वी परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयात सत्कार



















देऊळगाव गुजरी (ता जामनेर) येथील 

महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय यंदाही आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत इयत्ता १०वी चा १००% निकाल साधला आहे. यावर्षीच्या निकालात विद्यार्थिनींनी विशेष यश मिळवले असून विद्यालयाने गुणवत्तेची सर्वोच्च पातळी गाठली आहे.
या परीक्षेमध्ये *कु. वैष्णवी विनोद नाईक* हिने ८४.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्यामागोमाग *कु. पायल गणेश जाधव* हिने ८०.६०% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक *कु. गायत्री नरेंद्र मोरे* हिला ८०.४०% गुण मिळून प्राप्त झाला. *कु. प्राची प्रभाकर वाकोडे* हिने ७९.२०% गुणांसह चौथा क्रमांक, तर *कु. रुपाली गजानन चव्हाण* हिला ७७.४०% गुण मिळून पाचवा क्रमांक मिळाला.
शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी विद्यालयात एक छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळेचे संस्थाध्यक्ष *मा. श्री. निटू भाऊ ठाकूर* (मा. सरपंच, देऊळगाव), मुख्याध्यापक *श्री. जे.एच. परिहार* सर व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

03 May 2025

शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदीची संधी -उमेदवारांसाठी सोमवारनंतर तीन दिवस सुविधा खुली होणार



- पुणे, ता. ३ : शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पात्र उमेदवारांना आणखी काही जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत अद्याप सहभागी होऊ न शकलेल्या उमेदवारांना सोमवार (ता. ५) नंतर तीन दिवस प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा खुली होणार आहे.

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत 'शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२' नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या = रिक्त जागांसाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा दिली होती. शिक्षण विभागाने २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत उमेदवारांना

-

-

प्राधान्यक्रम भरण्याची आणि लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरतीत नियुक्ती न मिळालेल्या काही उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रम जनरेट करण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसून आले. अशा काही उमेदवारांनी शिक्षणाधिकाऱ्यांना

शिक्षक होण्याची संधी हुकणार ?

भरती प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींचा भावी शिक्षकांना फटका

याबाबत माहिती दिली.

दरम्यान, या उमेदवारांच्या लॉगिनमध्ये आढळणाऱ्या तांत्रिक त्रुटींबाबत शिक्षण विभागामार्फत कोणतीही दखल घेतली जात नव्हती. याबाबत 'सकाळ'ने 'शिक्षक होण्याची संधी हुकणार?' अशा शीर्षकाने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल घेत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी आवश्यक

शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्प्यातील 'टेट ● २०२२' साठी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती एन्ट्री लेव्हलवर आहेत,

त्या व्यवस्थापनांना त्रुटींची पूर्तता करून जाहिराती अपलोड करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सोमवारी (ता. ५) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली आहे. या प्रक्रियेत अपलोड झालेल्या जाहिरातींमधील पदांचे प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी या पदांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी उमेदवारांना सोमवारनंतर पुढील तीन दिवस मुदत दिली जाईल.

- सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शिक्षण आयुक्त

कागदपत्रांची पडताळणी केलेल्या काही उमेदवारांसाठी तत्काळ पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा खुली करून दिली. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत अधिकाधिक शाळा व्यवस्थापनांना सहभागी होत यावे, यासाठी पवित्र पोर्टलवर

जाहिरात अपलोड करण्यासाठीही मुदत दिली आहे. व्यवस्थापनांच्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर संबंधित जाहिरातीमधील पदांचे प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सिंह यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.









Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular