09 February 2025

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने ऑनलाईन परीक्षा कंम्प्युटरबेस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असुन सदर परिक्षेचे आयोजन दि. 4-3-2025 ते दि. 19-3-2025 रोजी विविध सत्रांमध्ये करण्यात येणार आहे.

समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे १

प्रसिध्दीपत्रक

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने ऑनलाईन परीक्षा कंम्प्युटरबेस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असुन सदर परिक्षेचे आयोजन दि. 4-3-2025 ते दि. 19-3-2025 रोजी विविध सत्रांमध्ये करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.


सविस्तर वेळापत्रक बघण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला CLICK करा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


06 February 2025

♦️अंगणवाडी सेविका जाहिरात नाशिक.


सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या Image ला click करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाही बाबत (TAIT २०२२) पवित्र पोर्टल प्रसिद्धीपत्रक - दिनांक - ६ फेब्रुवारी २०२५

दि. ०६/०२/२०२५

प्रेस नोट

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील

जाहिरातीच्या कार्यवाही बाबत (TAIT २०२२)

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.

सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. त्यापैकी १,६३,०६१ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले आहेत.

"शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयता १ ली ते १२ वीकरिता शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील जानेवारी २०२४ मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार २१६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

आता टप्पा २ अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध (Publish) करण्यासाठी दिनांक २०/०१/२०२५ पासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे. याबाबत मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक ३१/०१/२०२५ रोजी पदभरतीबाबतचा आढावा घेतला असता, अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत.

राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की, आपल्या अधिनस्त शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी https://tait२०२२.mahateacherrecruitment.org.in संकेतस्थळावर भेट द्यावी. या

सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक २०/०२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.

सविस्तर परिपत्रक बघण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला क्लिक करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻



04 February 2025

शिक्षक भरतीसाठी 'टेट' परीक्षेचा प्रस्ताव...


लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यात शिक्षक भरतीच्या

दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता पुन्हा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतून सुमारे १८ हजार शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर पहिल्या टप्प्यात रिक्त राहिलेल्या पदांचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत केला जाणार आहे. त्यानुसार पवित्र

अंतिम निकाल लवकरच

परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश पालकर म्हणाले, शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे, अंतिम निकाल येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल. तसेच अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयामार्फत शासनाला सादर करण्यात आला आहे. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल.

संकेतस्थळावर जाहिराती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यांत पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षांत शाळांमध्ये नवे शिक्षक उपलब्ध करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. दुसऱ्या टप्प्यात किती जागा उपलब्ध होणार याकडे पात्रताधारकांचे लक्ष लागले आहे. पवित्र संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील

(टेट) पात्रता आवश्यक आहे. २०१७ च्या शासन निर्णयानुसार वर्षातून दोन वेळा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याची तरतूद होती. तर २०१९ च्या शासन निर्णयानुसार आवश्यकतेनुसार चाचणी घेण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.








अंगणवाड्यांमधील भरतीचा मार्ग मोकळा शंभर दिवसांत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश....


सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई, ता. ३ : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्यसेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील शंभर दिवसांत ही सर्व पदे भरली जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे. यान्वये महिला बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल, त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०२२ पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान दहावी उत्तीर्ण असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यात येणार आहे त्यांना मदतनीसमधून सेविका पदावर पदोन्नती देण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात

येणार आहे.

ग्रामीण भागात त्या त्या ग्रामपंचायतींमधील स्थानिक उमेदवार तर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून निवडले जात होते. आता मात्र महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रातून निवड केली जाणार असल्याने मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, उमेदवारांचे गुणांकनच निवडीसाठी महत्त्वाचे ठरेल.




Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular