16 October 2025

पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*    
 लॉगिन प्रक्रिया

*लिंक वर जावे.*




 Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइल नंबर टाकावा-captcha टाकावा-confirmation दिसून proceed करावे otp टाकून login करावे

Elector Details भरावयाचे

District name-AC-Polling part/station no.-Serial no. -EPIC no.

*पुढील प्रक्रिया.*

आवश्यक माहिती भरून सेव्ह करावी नंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट करावे

*आवश्यक कागदपत्रे.*

1)Recent photo (JPG, 100kb)
2)Signature(JPG,100Kb)

3)Degree/Diploma Certificate (PDF,500 Kb),
 4)Adress proof (PDF, 500 kb)

*अर्ज भरताना.*

Proceed to Application वर क्लिक करावे -Graduate Constituency Select करावे, Nagpur Division Graduates प्रथम नाव टाकावे आडनाव टाकावे Relationship (Father/mother/Husband) पर्याय निवडावा लिंग (Gender)- जन्मतारीख (Date ऑफ Birth) टाकावी -वय आपोआप दाखवले जाईल पत्ता (Adress) भरावा.

*पत्त्यात भरावयाची माहिती.*

House address-Street-Town-Post office-Police Station-Pincode-State Name-District name-Taluka name.

इतर माहिती (other Details)

Qualification-occupation-Disability-(असल्यास नमूद करावे)-Landline No-Mobile No-Alternate Mobile No-Email Adress-Graduation Details-Graduation University-Graduation Completion date-Graduation constituency.

*अंतिम प्रक्रिया.*

Place-Date-Declaration-निवडावे Submit करावे सर्व माहिती भरल्यावर अॅप्लिकेशन चे Preview पाहून Edit करावे- अंतिमरीत्या सबमिट करावे.

*Upload Documents.*

Photo-Signature-Graduation Certificate-Adress Proof, Submit नंतर Acknowledgement Number मिळेल तो क्रमांक नोंद करून ठेवावा.

14 September 2025

जीवन संपण्याआधी जगा, कारण नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आजचा क्षण मनापासून जगणे जास्त महत्त्वाचे आहे.

जीवन संपण्याआधी जगून घ्या
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
जीवन ही देवाने दिलेली एक सुंदर देणगी आहे. प्रत्येकाची जीवनाची वाट वेगळी असते. कोणी सुखात तर कोणी दुःखात जगत असतो, पण हे लक्षात ठेवा की जीवन हे केवळ श्वास घेण्याचे नाव नाही, तर प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचे नाव आहे.
आपण नेहमी म्हणतो – “उद्या करू, वेळ आहेच.” पण खरं पाहिलं तर आपल्याकडे फक्त आजच असतं. उद्या काय होईल हे कुणालाच ठाऊक नाही. म्हणूनच जीवन संपण्याआधी जगून घेणे खूप गरजेचे आहे.
जगणे म्हणजे फक्त काम, जबाबदाऱ्या आणि तणाव नव्हे. जगणे म्हणजे –
आपल्या आवडी जोपासणे
मित्र-परिवारासोबत वेळ घालवणे,
निसर्गाचा आनंद घेणे,हसणे, गाणे, नाचणे,नवीन गोष्टी शिकणे,
आपण राग, मत्सर, द्वेष, दुःख यामध्ये इतके अडकून जातो की जगण्याचा खरा आनंद विसरतो. जीवन फार छोटे आहे, मग का वाया घालवायचे?
आजच ठरवा –

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा.
स्वतःसाठी वेळ काढा.
क्षमा करा, नाती जपा.
स्वप्न पाहा आणि त्यासाठी प्रयत्न करा.
जीवन एकदाच मिळते, म्हणून ते अर्थपूर्ण, आनंदी आणि समाधानकारक बनवा.

SOURCE :-----C.G.P.T.

20 August 2025

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२४ प्रसिध्दी पत्रक





महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे - ०४

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२४

प्रसिध्दी पत्रक

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ परीक्षेचे आयोजन दि. १०/११/२०२४ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्र. (इ. १ ली ते इ. ५ वी स्तर) व पेपर क्र. । (इ. ६ वी ते इ. ८ वी स्तर) चा अंतिम निकाल दि. १४/०२/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात आलेला आहे.

सदर परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या त्या जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद / शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचे कार्यालयाकडे हस्तपोहोच देण्यात येत आहे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचे कार्यालयात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप दिनांक ०१/०१/२०२५ ते ०८/०१/२०२५ या कालावधीत केले जाणार आहे. पात्रता धारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाईट वरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्हयात परीक्षा दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक मंबई (उ/द/प) यांचे कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.

ठिकाण : पुणे

दिनांक: २०/०८/२०२५

(अनुराधा ओक)

आयुक्त

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

पुणे - ०४

19 August 2025

BED व DED विध्यार्थ्यांचा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा राखीव निकाल 2025.

BED व DED विध्यार्थ्यां चा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा  निकाल राखीव ठेवलेले विध्यार्थी बघण्यासाठी ....*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
   

04 August 2025

🔸महाज्योती संस्थेमार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरीता समान धोरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग दिल्ली व महाराष्ट्र येथील प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा व संयुक्त गट ब व क परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज..



🔸महाज्योती संस्थेमार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरीता समान धोरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग दिल्ली व महाराष्ट्र येथील प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा व संयुक्त गट ब व क परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज...
.
----------------------------------------

परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

01 August 2025

महाराणा प्रताप विद्यालय, देऊळगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.


देऊळगाव (ता. जामनेर) – महाराणा प्रताप विद्यालय, देऊळगाव येथे १ ऑगस्ट रोजी थोर समाजसुधारक, लोककलावंत व लेखक अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि थोर राष्ट्रनेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महान व्यक्तींच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक व साहित्यिक योगदानाबाबत माहिती दिली. त्यांनी श्रमिक समाजासाठी निर्माण केलेले साहित्य आजही प्रेरणादायी आहे, असे सांगण्यात आले.
तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचा व स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर भाषणे, गीतं व नाट्य सादर केली.

प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना दोन्ही महान विभूतींच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक व सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने करण्यात आले.या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशा पद्धतीने आज महाराणा प्रताप विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

29 July 2025

बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती ...



Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑगस्ट 2025


सविस्तर जाहिराती साठी 


👉Apply online link :-



👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

11 July 2025

जाणून घ्या आपल्या नावाचा अर्थ एक सेकंदात...

आपल्याला जन्मल्यापासूनच एक नाव प्रदान केले
जाते. आता तर नवनवीन नाव उपलब्ध करुन देणा-या
वेबसाईट आहेत. पण आपल्याला प्राप्त झालेल्या
नावाचा अर्थ काय आहे. याचा आपण कधी विचार
केला नाही. शेवटी नावात काय आहे ? असा एक विचार
आपल्याकडे आहे. या विचाराचा विचार केला
तर.. शेवटी कशात काय आहे. हा प्रश्न उरतोच. मग
अधिक भानगडीत न पडता. एकदा आपल्या नावाचा
आपण अर्थ समजून घेण्यास काय हरकत आहे. आज
मी तुम्हाला अशा एका वेबसाईट वर घेउन जाणार आहे. तिथे तुम्हाला तुमच्या फ़ोटोसह तुमच्या नावाचा
अर्थ पहावयास मिळेल. याशिवाय या लिंकवर
बरेचकाही आहे. तुम्ही प्रथम या वेबसाईटवर
पोहोचल्यानंतर डाव्या बाजूस Name Poem वर
क्लिक करा. त्यानंतर एक बोक्स समोर येईल. तिथे
तुमच्या मोबाईल मधील किंवा संगणकातील फ़ोटो
अपलोड करा. नंतर तुमचे नाव टाईप करा.. आणि
फोटोचा बैकग्राउंड निवडा.. शेवटी सबमिट करा.. काही
सेकंदात तुमच्यासमोर तुमच्या नावासह तुमचा फ़ोटो
येईल. पहा आपल्या नावाचा अर्थ.. 
येथे क्लिक करा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻




21 May 2025

ब्रेकिंग न्यूज.....सेकंड फेज लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे .

📌 पवित्र पोर्टल टप्पा 2 याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत
सर्व याद्या डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या LINK ला CLICK करा...
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

20 May 2025

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी १६ जूनपर्यंत करता येणार अर्ज; वेळापत्रक जाहीर

मुंबई :
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार https://poly25.dtemaharashtra.gov.in/
 या अधिकृत संकेतस्थळावर २० मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली, असून विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर गुणवत्ता यादी २३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

तीन वर्ष कालावधीच्या, पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तुकला अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठीचे  वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २० मे पासून १६ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करता येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन व प्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. त्यानंतर निश्चित होणारे अर्ज हे संस्थास्तरावरील फेरीसाठी विचारात घेण्यात येणार आहे. १८ जून रोजी संकेतस्थळावर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये दर्शविलेल्या माहितीमध्ये विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास १९ ते २१ मे दरम्यान विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवता येणार आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी २३ जून रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.

पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे – २० मे ते १६ जून
प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे – २० मे ते १६ जून
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे – १८ जून
तात्पुरत्या गुणवत्ता यादीसंदर्भात हरकत सादर करणे –१९ ते २१ जून
गुणवत्ता यादी जाहीर करणे – २३ जून
अडचणी दूर करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक
प्रवेश अर्ज भरण्याबरोबरच प्रवेश प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास ती दूर करण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाकडून ७६६९१००२५७/ १८००३१३२१६४ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. हा हेल्पलाईन क्रमांक सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सुरु राहणार आहे.

प्रवेशासाठी शुल्क
राज्यातील खुल्या प्रवर्ग, राज्याबाहेरील आणि जम्मू काश्मिर व लडाख या संघराज्यातून विस्थापित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये, तसेच राज्यातील सर्व राखीव प्रवर्ग आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये शुल्क अर्ज भरताना ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

15 May 2025

महाराणा प्रताप विद्यालय, देऊळगाव गुजरी यंदाही १००% निकालासह उज्ज्वल यश! निकालाची यशस्वी परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयात सत्कार



















देऊळगाव गुजरी (ता जामनेर) येथील 

महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय यंदाही आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत इयत्ता १०वी चा १००% निकाल साधला आहे. यावर्षीच्या निकालात विद्यार्थिनींनी विशेष यश मिळवले असून विद्यालयाने गुणवत्तेची सर्वोच्च पातळी गाठली आहे.
या परीक्षेमध्ये *कु. वैष्णवी विनोद नाईक* हिने ८४.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्यामागोमाग *कु. पायल गणेश जाधव* हिने ८०.६०% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक *कु. गायत्री नरेंद्र मोरे* हिला ८०.४०% गुण मिळून प्राप्त झाला. *कु. प्राची प्रभाकर वाकोडे* हिने ७९.२०% गुणांसह चौथा क्रमांक, तर *कु. रुपाली गजानन चव्हाण* हिला ७७.४०% गुण मिळून पाचवा क्रमांक मिळाला.
शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी विद्यालयात एक छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळेचे संस्थाध्यक्ष *मा. श्री. निटू भाऊ ठाकूर* (मा. सरपंच, देऊळगाव), मुख्याध्यापक *श्री. जे.एच. परिहार* सर व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

03 May 2025

शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदीची संधी -उमेदवारांसाठी सोमवारनंतर तीन दिवस सुविधा खुली होणार



- पुणे, ता. ३ : शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पात्र उमेदवारांना आणखी काही जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत अद्याप सहभागी होऊ न शकलेल्या उमेदवारांना सोमवार (ता. ५) नंतर तीन दिवस प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा खुली होणार आहे.

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत 'शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२' नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या = रिक्त जागांसाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा दिली होती. शिक्षण विभागाने २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत उमेदवारांना

-

-

प्राधान्यक्रम भरण्याची आणि लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरतीत नियुक्ती न मिळालेल्या काही उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रम जनरेट करण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसून आले. अशा काही उमेदवारांनी शिक्षणाधिकाऱ्यांना

शिक्षक होण्याची संधी हुकणार ?

भरती प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींचा भावी शिक्षकांना फटका

याबाबत माहिती दिली.

दरम्यान, या उमेदवारांच्या लॉगिनमध्ये आढळणाऱ्या तांत्रिक त्रुटींबाबत शिक्षण विभागामार्फत कोणतीही दखल घेतली जात नव्हती. याबाबत 'सकाळ'ने 'शिक्षक होण्याची संधी हुकणार?' अशा शीर्षकाने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल घेत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी आवश्यक

शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्प्यातील 'टेट ● २०२२' साठी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती एन्ट्री लेव्हलवर आहेत,

त्या व्यवस्थापनांना त्रुटींची पूर्तता करून जाहिराती अपलोड करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सोमवारी (ता. ५) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली आहे. या प्रक्रियेत अपलोड झालेल्या जाहिरातींमधील पदांचे प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी या पदांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी उमेदवारांना सोमवारनंतर पुढील तीन दिवस मुदत दिली जाईल.

- सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शिक्षण आयुक्त

कागदपत्रांची पडताळणी केलेल्या काही उमेदवारांसाठी तत्काळ पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा खुली करून दिली. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत अधिकाधिक शाळा व्यवस्थापनांना सहभागी होत यावे, यासाठी पवित्र पोर्टलवर

जाहिरात अपलोड करण्यासाठीही मुदत दिली आहे. व्यवस्थापनांच्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर संबंधित जाहिरातीमधील पदांचे प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सिंह यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.









14 April 2025

Mahajyoti Pre TAIT Online Training - महाज्योती देणार शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT)- 2025-26 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण अर्ज लिंक माहिती


Mahajyoti Pre TAIT Online Training - महाज्योती देणार शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT)- 2025-26 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण अर्ज लिंक माहिती


महाज्योती मार्फत TAIT 2025-26 करिता पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजना.

"शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन- 2025-26 या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे."

Website : 

www.mahajyoti.org.in


13 March 2025

अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या भरतीची संपूर्ण माहिती👇🏻👇🏻👇🏻👇🏻


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🫡 *देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी!* भारतीय लष्करात भरती होण्याची संधी चालून आली आहे. इच्छुक उमेदवार *12 मार्च ते 10 एप्रिल 2025* दरम्यान अर्ज करू शकतात. http://www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.  

*🛡️ कोणत्या पदांसाठी भरती आहे?*  

✅ *अग्निवीर जनरल ड्युटी (GD)* 👮‍♂️  
✅ अग्निवीर टेक्निकल 🔬  
✅ अग्निवीर क्लर्क / स्टोअर कीपर टेक्निकल 📑  
✅ अग्निवीर ट्रेडसमॅन (8वी व 10वी पास) 🔧  
✅ अग्निवीर सैनिक फार्मा 💊  
✅ अग्निवीर सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट 🏥  
✅ महिला लष्करी पोलीस 👮‍♀️  
✅ हवालदार एज्युकेशन व सर्वेयर ऑटोमेटेड कार्टोग्राफर 📡  
✅ JCO कॅटरिंग व JCO रिलिजियस टीचर 🍽️📖  

📝 *अर्ज प्रक्रियेत मोठा बदल!*  
✌🏻 यंदा उमेदवारांना *एका अर्जामध्ये दोन पदांसाठी अर्ज करण्याची संधी* आहे. यामुळे निवड होण्याची शक्यता अधिक वाढेल!  

📌 *अर्ज शुल्क फक्त ₹250* असून, ते *ऑनलाइन जमा करावे लागेल*

📌 अर्ज करताना *खालील कागदपत्रे आवश्यक असतील –*
- 📜 10वी किंवा 12वी गुणपत्रिका  
- 🏠 मूळ रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाइल) 
- 🆔 ओळखपत्र (आधार / पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स)
- 📷 फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी लागेल

 *🏃‍♂️ धावण्याच्या नियमांमध्ये बदल – अधिक संधी!*
यंदा धावण्याचे *चार गट* करण्यात आले आहेत, त्यामुळे जास्त उमेदवारांना संधी मिळेल!  

💪 5 मिनिटे 30 सेकंदात धावणे पूर्ण केल्यास – 60 गुण
💪 5 मिनिटे 31 सेकंद ते 5 मिनिटे 45 सेकंद – 48 गुण  
💪 5 मिनिटे 46 सेकंद ते 6 मिनिटे – 36 गुण
💪 6 मिनिटे 1 सेकंद ते 6 मिनिटे 15 सेकंद – 24 गुण

*📏 शारीरिक पात्रता आणि उंची निकष* 
▪️ *अग्निवीर GD, टेक्निकल, ट्रेडसमॅन (8वी व 10वी पास) साठी –* 
👉 उंची – 170 सेमी
👉 छाती – 77 सेमी (82 सेमी फुगवून)

▪️ *अग्निवीर क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल साठी –*
👉  उंची – 162 सेमी 
👉  छाती – 77 सेमी (82 सेमी फुगवून) 

👮🏻‍♀️ *महिला लष्करी पोलीससाठी –*  
👉 🔹 उंची – 157 सेमी

 *🎓 शैक्षणिक पात्रता – पात्र ठरण्यासाठी आवश्यक गुण* 
📌 *अग्निवीर GD:*  
👉 📖 10वी उत्तीर्ण, किमान 45% गुण आणि प्रत्येक विषयात 33% गुण आवश्यक.

📌 *अग्निवीर टेक्निकल:*  
👉 📖 12वी उत्तीर्ण, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजीमध्ये 50% गुण आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण आवश्यक.

📌 *अग्निवीर क्लर्क / स्टोअर कीपर टेक्निकल:*
👉 📖 12वी उत्तीर्ण, एकूण 60% गुण, इंग्रजी आणि गणित/अकाउंट्समध्ये 50% गुण आवश्यक.

📌 *अग्निवीर ट्रेडसमॅन (10वी पास):*  
👉 📖 सर्व विषयांमध्ये किमान 33% गुण आवश्यक

📌 *अग्निवीर ट्रेडसमॅन (8वी पास):*  
👉 📖 सर्व विषयांमध्ये किमान 33% गुण आवश्यक.  

👮🏻‍♀️ *महिला लष्करी पोलीस:*  
👉📖 10वी उत्तीर्ण, 45% गुण आणि प्रत्येक विषयात 33% गुण आवश्यक. 

*📝 लेखी परीक्षा – कधी आणि कशी होणार?* 
🖊️ अग्निवीर भरतीसाठी लेखी परीक्षा जून 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. 
🧾 परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक http://www.joinindianarmy.nic.in वर लवकरच प्रकाशित होणार आहे.  

09 February 2025

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने ऑनलाईन परीक्षा कंम्प्युटरबेस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असुन सदर परिक्षेचे आयोजन दि. 4-3-2025 ते दि. 19-3-2025 रोजी विविध सत्रांमध्ये करण्यात येणार आहे.

समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे १

प्रसिध्दीपत्रक

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने ऑनलाईन परीक्षा कंम्प्युटरबेस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असुन सदर परिक्षेचे आयोजन दि. 4-3-2025 ते दि. 19-3-2025 रोजी विविध सत्रांमध्ये करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.


सविस्तर वेळापत्रक बघण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला CLICK करा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


06 February 2025

♦️अंगणवाडी सेविका जाहिरात नाशिक.


सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या Image ला click करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाही बाबत (TAIT २०२२) पवित्र पोर्टल प्रसिद्धीपत्रक - दिनांक - ६ फेब्रुवारी २०२५

दि. ०६/०२/२०२५

प्रेस नोट

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील

जाहिरातीच्या कार्यवाही बाबत (TAIT २०२२)

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.

सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. त्यापैकी १,६३,०६१ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले आहेत.

"शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयता १ ली ते १२ वीकरिता शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील जानेवारी २०२४ मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार २१६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

आता टप्पा २ अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध (Publish) करण्यासाठी दिनांक २०/०१/२०२५ पासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे. याबाबत मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक ३१/०१/२०२५ रोजी पदभरतीबाबतचा आढावा घेतला असता, अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत.

राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की, आपल्या अधिनस्त शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी https://tait२०२२.mahateacherrecruitment.org.in संकेतस्थळावर भेट द्यावी. या

सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक २०/०२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.

सविस्तर परिपत्रक बघण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला क्लिक करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻



04 February 2025

शिक्षक भरतीसाठी 'टेट' परीक्षेचा प्रस्ताव...


लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यात शिक्षक भरतीच्या

दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता पुन्हा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतून सुमारे १८ हजार शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर पहिल्या टप्प्यात रिक्त राहिलेल्या पदांचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत केला जाणार आहे. त्यानुसार पवित्र

अंतिम निकाल लवकरच

परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश पालकर म्हणाले, शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे, अंतिम निकाल येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल. तसेच अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयामार्फत शासनाला सादर करण्यात आला आहे. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल.

संकेतस्थळावर जाहिराती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यांत पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षांत शाळांमध्ये नवे शिक्षक उपलब्ध करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. दुसऱ्या टप्प्यात किती जागा उपलब्ध होणार याकडे पात्रताधारकांचे लक्ष लागले आहे. पवित्र संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील

(टेट) पात्रता आवश्यक आहे. २०१७ च्या शासन निर्णयानुसार वर्षातून दोन वेळा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याची तरतूद होती. तर २०१९ च्या शासन निर्णयानुसार आवश्यकतेनुसार चाचणी घेण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.








अंगणवाड्यांमधील भरतीचा मार्ग मोकळा शंभर दिवसांत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश....


सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई, ता. ३ : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्यसेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील शंभर दिवसांत ही सर्व पदे भरली जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे. यान्वये महिला बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल, त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०२२ पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान दहावी उत्तीर्ण असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यात येणार आहे त्यांना मदतनीसमधून सेविका पदावर पदोन्नती देण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात

येणार आहे.

ग्रामीण भागात त्या त्या ग्रामपंचायतींमधील स्थानिक उमेदवार तर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून निवडले जात होते. आता मात्र महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रातून निवड केली जाणार असल्याने मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, उमेदवारांचे गुणांकनच निवडीसाठी महत्त्वाचे ठरेल.




21 January 2025

व्यवस्थापनांसाठी सूचना स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना...

व्यवस्थापनांसाठी सूचना

स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना...
सविस्तर परिपत्रका साठी खाली दिलेल्या IMGAE ला CLICK करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻




18 January 2025

*शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात*.20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू.....

🏫 *बीएड धारक आणि शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची आणखी एक सुवर्णसंधी* चालून आली आहे. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता *दुसऱ्या टप्प्याला सुरुवात* होणार आहे.  

➡️ *उद्या म्हणजेच 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल पुन्हा सुरू* होत असून, पहिल्या टप्प्यात भरती होऊ न शकलेल्या उमेदवारांसाठी आता शिक्षक होण्याची आणखी एक संधी उपलब्ध आहे. 

🔢 जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले असून उद्यापासून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल. _म्हणजे लवकरच आपण या भरतीस अर्ज करू शकणार आहात._🤟🏻 

🛅 *पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया (Step-by-Step Guide):*  

*१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:*  


* पवित्र पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जा: →  
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻








*२. नवीन खाते तयार करा (Register):*🖊️
- होमपेजवर "नोंदणी करा" किंवा "Register" हा पर्याय निवडा.  
- तुमचे संपूर्ण नाव, मोबाइल नंबर, आणि वैध ईमेल आयडी भरा.  
- पासवर्ड तयार करा आणि तो सुरक्षित ठेवा.  
- तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी सत्यापित करण्यासाठी आलेला *ओटीपी (OTP)* भरा.  

*३. लॉगिन करा:*🌐  
- नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्या क्रेडेन्शियल्सचा (ईमेल/मोबाइल आणि पासवर्ड) वापर करून पोर्टलवर लॉगिन करा.  

*४. प्रोफाईल भरा:*✒️  
- "माझी प्रोफाईल" किंवा "My Profile" या विभागात जा.  
- आवश्यक माहिती भरा, जसे की..👇🏻  
  - शैक्षणिक पात्रता (उदा. बीएड, डीएड इत्यादी).  
  - अनुभव (जर असेल तर).  
  - वैयक्तिक माहिती (जन्मतारीख, पत्ता, इ.).  
  - आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, मार्कशीट, प्रमाणपत्रे) स्कॅन करून अपलोड करा.  

*५. शिक्षक भरतीसाठी अर्ज भरा:*📝  
- प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर, "शिक्षक भरती अर्ज" किंवा "Recruitment Application" या पर्यायावर क्लिक करा.  
- तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे, तो निवडा.  
- इतर आवश्यक तपशील भरा.  

*६. फी भरून अर्ज सबमिट करा:*👩🏻‍💻 
- अर्ज सबमिट करण्याआधी प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.  
- ऑनलाइन पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगचा वापर करा.  
- यशस्वी पेमेंट झाल्यावर तुमचा अर्ज सबमिट करा.  

*७. अर्जाची प्रिंटआउट घ्या:*🖨️
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या. भविष्यातील संदर्भासाठी हा अर्ज जपून ठेवा.  

📢 *महत्त्वाच्या सूचना:*  
- फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची खात्री करा.  
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत अर्ज सबमिट करा.  
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती स्पष्ट असतील याची काळजी घ्या.  

12 January 2025

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 – प्रवेशपत्र उपलब्ध!


शिष्यवृत्ती परीक्षा 2025 – प्रवेशपत्र उपलब्ध!

इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध झाले आहे. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना वितरित करावे.

📅 परीक्षा तारीख: 9 फेब्रुवारी 2025
🕒 प्रवेशपत्र उपलब्ध: 17 जानेवारी 2025 पासून

सविस्तर परिपत्रक साठी खाली दिलेल्या Image ला क्लिक करा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
CLICK HERE FOR OFFICIAL WEBSITE

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


04 January 2025

नियोजन शालेय शिक्षण विभागाने मागितली परवानगी,दुसऱ्या टप्प्यात राज्यात १५ हजारांवर शिक्षकांची भरती


प्रतिनिधी |
जळगाव

शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांपैकी ८० टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्यातील पदभरती ३० जूनपूर्वी केली जाणार आहे.

त्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने १४ ते १५ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून, तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ३० हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती, पण त्यातील २३ हजार शिक्षकांचीच भरती झाली. झेडपी शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून, आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग या शाळांत सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या. त्याची सुनावणी शिक्षण आयुक्तांकडे सुरू होत्या आणि

*खासगीतील भरतीवेळी 'शिक्षण'चा प्रतिनिधी*

खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहेत. त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला आहे. पण या मुलाखतीवेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थित ठेवण्यात येणार असल्याने वशिलेबाजीला लगाम बसेल.

जिल्ह्याला होणार फायदा: जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांत सुमारे

दहा टक्के जागा रिक्त आहेत. या जागांवर भरतीसाठी शिक्षक संघटना प्रयत्नशील आहेत. ही भरती झाल्यास जिल्ह्याला फायदा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आता त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे त्या जिल्हा परिषदांमधील एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्यात केली जाणार आहे. सध्या पवित्र

*कंत्राटी भरतीवर अद्याप प्रश्नचिन्ह आहे कायम*

राज्यातील जिल्हा परिषदांच्या १५ हजारांहून अधिक शाळांची पटसंख्या १ ते २० पर्यंत असून, त्यातील पाच हजार शाळांची पटसंख्या १० पेक्षाही कमी आहे. त्या शाळांत डीएड, बीएडधारक तरुण-तरुणांना कंत्राटी तत्त्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. पण प्रक्रिया अद्याप झाली नसल्याचे चित्र दिसते आहे.

पोर्टलच्या दुसऱ्या टप्याचे काम सुरू असून, त्यासाठीही निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्या मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे. या संदर्भातील निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.








Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular