17 October 2024

07 October 2024

Pre Primary School Council Bharti 2024 | 10वी पास ते पदव्युत्तर उमेदवारांना संधी; महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुका अंतर्गत रिक्त पदांच्या 1509 जागांसाठी पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत मध्ये नवीन भरती जाहीर!!



Pre Primary School Council Bharti 2024 : पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी रिक्त पदांच्या भरती साठी भरती जाहीर केली आहे, रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे विशेष कार्यकारी अधिकारी, नियुक्ती अधिकारी, जिल्हा विस्तार अधिकारी, महिला सल्लागार, तालुका उप विस्तार अधिकारी, नगर विस्तार अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी,

सामाजिक अधिकारी जिल्हा उपविस्तार अधिकारी असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार

वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात

काळजीपूर्वक वाचायची आहे. पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने

करायचे आहे. ऑनलाईन अर्ज हे 05 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे तसेच, अर्ज करण्याची शेवटची

तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे. 
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत भरती अर्ज शुल्क

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत भरती मध्ये अर्जाचे शुल्क 750/-रुपये लागणार आहे.

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत भरती वयोमर्यादा

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भरती मध्ये 18 ते 38 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत भरती शैक्षणिक पात्रता

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी रिक्त

पदांच्या एकूण 1509 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव

हे पदांचे नाव है विशेष कार्यकारी अधिकारी, नियुक्ती अधिकारी, जिल्हा विस्तार अधिकारी, महिला

सल्लागार, तालुका उप विस्तार अधिकारी, नगर विस्तार अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी,

सामाजिक अधिकारी जिल्हा उपविस्तार अधिकारी आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये

पदांनुसार दिलेली आहे.






पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत भरती अर्ज प्रक्रिया

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल.

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत मासिक वेतन

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत भरती मध्ये वेतन पदांनुसार वेगवेगळे आहे पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती नंतर 13,000/-रुपये ते 75,000/- रुपये पर्यंत मासिक व नियमाप्रमाणे अधिक महागार्ड भत्ता दिला जाईल.

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत भरती निवड प्रक्रिया

उमेदवारांची ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल आणि मुलाखत घेण्यात येईल. पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भरती निवड प्रक्रिया बघण्यासाठी खालील मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.


ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख: 05 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
       


06 October 2024

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत...

राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्याधर्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.

१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)

२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)

४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

  प्रस्तुत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पहिल्या टप्प्यात उपरोक्त गट क्र. १ ते ३ साठी जिल्हा स्तरावर व गट क्र. ४ व ५ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (विभाग) स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी whats app, वर्तमानपत्र यासारख्या प्रसार माध्यमांच्याद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी. यासाठी प्राचार्य, डाएट व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद यांनी एकमेकांशी समन्वय साधावा. आपल्या स्तरावरून स्पर्धेबाबत आणि सोबत दिलेले माहितीपत्रक अवलोकन करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी अधिनस्त कार्यालयातील सर्व गटातील स्पर्धकांना याबाबत अवगत करावे.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी CLICK करा...

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular