31 January 2024

अतितात्काळ बैठक लावणे बाबत

अतितात्काळ

मुख्यमंत्री सचिवालय / मुलाखत कक्ष

दिनांक :- ३१.०१.२०२४

प्रति, मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

विषय :-

१) सन २०२३-२४ या वर्षाची शेवटच्या वर्गाची पटसंस्खा गृहीत धरुन शाळांना अनुदान देणेबाबत बैठक.

२) २०२१ मध्ये ३० दिवसाची मदत देऊन त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा देणेबाबत.

३) पुणे स्तरावरील त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदान घोषित करणेबाबत.

४) दिनांक ०१.०१.२०२४ पासून टप्पा अनुदान प्राप्त शाळांना पुढील टप्पा देणेबाबत.

५) क्षेत्रीय स्तरावरील विना अनुदानीत शाळांना अनुदानावर आणण्यासाठी २०२३-२४ हे वर्ष सर्व निकषांसाठी गृहीत धरुन त्यांचे मुल्यांकन करुन त्यांना अनुदान देणेबाबत.

महोदय,

मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली श्री. अब्दुल सत्तार, मंत्री, पणन, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, श्री. श्रीकांत गोविंदराव देशपांडे, मा. विधान परिषद सदस्य व अॅड. तुकाराम शिंदे, सं. अध्यक्ष, महाराष्ट्र कुणबी मराठा संघटना यांच्या पत्रात नमुद केलेल्या वरील विषयाबाबत बैठक आयोजित करण्याची विनंती मा. मुख्यमंत्री सचिवालयाकडे प्राप्त झाली आहे.

त्याअनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदयांकडे तात्काळ आयोजित करावयाच्या बैठकांच्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार बैठकीबाबतची संक्षिप्त माहिती सोमवार, दि. ०५ फेब्रुवारी, २०२४ रोजी दुपारी ०२.०० वा. पर्यंत मुलाखत कक्षाकडे पाठविण्याची तसेच cmengsection@maharashtra.gov.in या ई-मेलवर कृपया पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी, ही विनंती.

प्रत माहितीस्तव :-

(नितिन दळवी) उप सचिव

प्रधान सचिव, मुख्यमंत्री सचिवालय (मुलाखत कक्ष) यांचे स्वीय सहायक.




30 January 2024

शिक्षण सेवक उमेदवारांसाठी आणखी एक परीक्षा | कामगिरी समाधानकारक नसल्यास सेवा समाप्त


पुणे : पुढारी वृत्तसेवा राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष शिक्षक भरतीकडे लागलेले असताना आता शिक्षक भरतीमधून शिक्षण सेवक होणाऱ्या उमेदवारांना आणखी एका परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची आता कौशल्य चाचणी घेतली जाणार असून, त्यात समाधानकारक कामगिरी नसलेल्या उमेदवारांची सेवा समाप्त केली जाणार असल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

पवित्र संकेतस्थळावरील भरती प्रक्रियेत सेमी इंग्रजी शाळांसाठी नोंदवण्यात येणाऱ्या मागणीला अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्यांमधून शिफारस करण्यात येणार आहे. परंतु, अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रादेशिक विद्या

इंग्रजी साधन व्यक्ती पदाच्या जागा राखून ठेवणार

इंग्रजी साधन व्यक्ती या पदासाठी इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा आरोप करून आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या साधन व्यक्तीच्या जागा तूर्तास राखून ठेवण्याबाबत परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे. या कौशल्य चाचणीत संबंधित शिक्षण सेवकाची

कामगिरी असमाधानकारक असल्यास त्याची सेवा समाप्त करावी, अशी अट नियुक्ती आदेशात नमूद करावी, असे परिपत्रकात स्पष्ट

करण्यात आले आहे.

सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये १९ जून २०२३च्या शासन निर्णयानुसार सेमी इंग्रजी साधन व्यक्ती आणि १३ ऑक्टोबर २०२३च्या शासन निर्णयानुसार इंग्रजी साधन व्यक्ती अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदांची मागणी नोंद करावी, तसेच, आज मंगळवार (दि. ३० जानेवारी) पर्यंत पवित्र संकेतस्थळावरील जाहिरातविषयक कार्यवाही पूर्ण करावी, असेही स्पष्ट केले आहे.




MSBCC Survey 2024 Update - मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षणास मुदतवाढ !

 

राज्य मागासवर्ग आयोगाने दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सर्वेक्षणास मुदतवाढ देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


महाराष्ट्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण दि.३१.१.२०२४ पर्यंत पूर्ण करण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले होते. तथापि काही ठिकाणी हे सर्वेक्षण ३१.१.२०२४ पर्यत पूर्ण होऊ शकत नसल्याने सर्वेक्षणास मुदतवाढ देण्याची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे निदर्शनास आले आहे. यास्तव सर्वेक्षणास दिनांक २.२.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी आपल्या जिल्हा / महानगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षणाचे काम दि.२.२.२०२४ पर्यंत १००% पूर्ण करावे व दि.३.२.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत आपल्या क्षेत्रातील सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगास पाठविण्यात यावे ही विनंती.


आपली,


(आ. उ.पाटील)


सदस्य सचिव


महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे.




29 January 2024

वर्ग 10वी. 2024 चे EXAM HALLTICKET उपलब्ध ..

प्रति,
जा. क्र.रा.मं./परीक्षा-७/371 दिनांक २९/०१/२०२४

१) मा. महामंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-४०००३२

२) मा. विभागीय प्रसिध्दी उपसंचालक, पुणे/नागपूर/छत्रपती संभाजीनगर/मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण

३) मा. संचालक, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई-४०००३०

४ ) मा, संचालक, आकाशवाणी, मुंबई केंद्र, नवीन प्रसारण भवन, बैंकले रेक्लेमेशन, आमदार निवासाजवळ, मुंबई-४०००२०

५) मा. संचालक, आकाशवाणी केंद्र

पुणे/नागपूर / छत्रपती संभाजीनगर /मुंबई/जळगांव रानागिरी/सांगली/कोल्हापूर/सातारा/सोलापूर/नाशिक

६) सर्व जिल्हा प्रसिध्दी अधिकारी

७ ) मा. संपादक, सर्व वृत्तपत्र / वृत्तवाहिन्या

विषयः- मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (३.१० वी) परीक्षेच्या अऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket)...

महोदय,

मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) अऑनलाईन (Online) पध्दतीने उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रकटर सोबत जोडले आहे.

सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील मृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रानी त्यांच्या वृत्तपत्रात / प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.

आपली विश्वासू,

(अनुराधा ओक)

प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी:-

सचिव, राज्य मंडळ, पुणे ०४

१ ) विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे/नागपूर / छत्रपती संभाजीनगर /मुंबई/कोल्हापूर/अमरावती /नाशिक/लातूर/कोकण विभागीय मंडळ,

पुणे/नागपूर / छत्रपती संभाजीनगर /मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण त्यांनी स्थानिक स्तरावर प्रकटन

प्रसिध्द करावे, व सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणावे. ) व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्य मंडळ, पुणे २

३) अस्वीस व सस्वीस राज्यमंडळ, पुणे ४) ग्रंथालय, राज्यमंडळ, पुणे ५) ऑनलाईन विभाग प्रत माहितीसाठी सविनय सादर-

१) मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२

२) मा. खाजगी सचिव, मा. मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२ ३) मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-४११००९
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.

प्रकटन

विषय :- मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या ऑनलाईन

प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket)....

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (

Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे

(Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार दि. ३१ जानेवारी, २०२४ पासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील, या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की,

१. मार्च २०२४ मधील इ. १० वी परीक्षेसाठीसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. १० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.

२. प्रवेशपत्र (Hall Ticket) उघडताना (Open) काही त्रुटी (Error) आल्यास सदर प्रवेशपत्र Google

Chrome मध्ये उघडावे.

३. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी ४

विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.

५. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.

६. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.

७. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने

व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.

तरी मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी,

दिनांक : २९/०१/२०२४


(अनुराधा ओक) सचिव,

राज्य मंडळ, पुणे ४.


परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी CLICK करा..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


28 January 2024

आजपासून 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षक भरती यंत्रणा लागली कामाला : पहिल्या टप्यात १५ हजार शिक्षकांना संधी.

आजपासून 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षक भरती

यंत्रणा लागली कामाला : पहिल्या टप्यात १५ हजार शिक्षकांना संधी

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : शालेय शिक्षणमंत्री दीपक

केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे शिक्षक भरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली असून सोमवारी (दि.२९) शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्यातील सुमारे १५ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा शिक्षक भरतीला अडथळा येऊ नये, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिकांच्या शाळांसह काही खासगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक जाहिराती पवित्र पोर्टल वर अपलोड झाल्या आहेत.

एप्रिलनंतर भरतीचा दुसरा टप्पा

सध्या सुरू असलेली शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी संपविली जाणार आहे. त्यानंतर भरतीचा दुसरा टप्पा एप्रिल-मे महिन्यात राबविला जाणार आहे. तत्पूर्वी, टीईटी होईल आणि त्यानंतर टेट होऊन दुसया टप्यातील शिक्षक भरतीला प्रारंभ होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

पवित्र पोर्टलवर ज्या 'टेट' उत्तीर्ण उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांच्याकडून आता प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. त्याची सुरुवात सोमवार, दि. २९ रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनुदानित माध्यमिक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी 22 जानेवारी पर्यंत देण्यात आली होती. आता ही मुदत संपुष्टात आली असून ज्या शाळांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतलेली नाही आणि २०२२- २३मधील संच मान्यता अपूर्ण आहे, त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करता येणार नाही. उर्वरित शाळांना आता शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात संधी दिली जाणार आहे.

25 January 2024

राज्यात शासन सरळसेवा पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत...

राज्यात शासन सरळसेवा पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत...
सविस्तर GR डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला CLICK करा.

22 January 2024

SET Examination 2024 Update - सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट २०२४) online Form Link Maharashtra SET Examination 2024 Update - सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट २०२४)








SET Examination 2024 Update - सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट २०२४) online Form Link Maharashtra
SET Examination 2024 Update - सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट २०२४) online Form Link Maharashtra
pradipjadhao January 05, 2024
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि यु.जी.सी., नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि यु.जी.सी., नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी
 आयोजित सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)




सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली एकोणचाळीसावी (३९ वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, दि. ०७ एप्रिल, २०२४ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदरहू परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी व पणजी (गोवा) या केंद्रांवर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (रू. ८००/- (प्रकिया शुल्कासह)) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे संकेतस्थळावर अर्ज दि. १२ जानेवारी, २०२४ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. ३१ जानेवारी, २०२४ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. ५०० रू. विलंब शुल्कासहीत अर्ज भरण्याचा कालावधी दि. ०१ फेब्रुवारी, २०२४ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. ०७ फेब्रुवारी, २०२४ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असेल.

विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पध्दतीने अचूक भरावा. अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी. तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचेकडे पाठवू नये.



परीक्षा शुल्क

१. खुला

रू. ८००/- (प्रकिया शुल्कासह)

२. इतर मागासवर्गीय/भटक्या व विमुक्त जाती जमाती/

रू. ६५०/- (प्रकिया शुल्कासह)

विशेष मागासवर्गीय (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी) (For Non-Creamy Layer)* / खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि विकलांग प्रवर्ग (PWD) / अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/तृतीयपंथी /अनाथ

Also Read:शालार्थ प्रणाली द्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडिया च्या सीएमपी ई कुबेर प्रणाली मार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार

टिप:- उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या आर्थिक मर्यादेसंबंधी

( महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अलीकडील निर्णय संदर्भासाठी पहावा तसेच यासंदर्भात गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय बंधनकारक असतील.)


विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त केडीट/डेबीट कार्ड द्वारे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावी. विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क केडिट/डेबीट कार्ड / इंटरनेट बँकिंग द्वारे अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा.


सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या "https://setexam.unipune.ac.in" या संकेतस्थळावर साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयात प्रसिध्द करण्यात येईल. परीक्षा शुल्क भरून सुध्दा ज्या विद्यार्थ्यांचे नाव सदर यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा set-support@pun.unipune.ac.in या ई-मेल आयडीवर पाठवावा. 

सेट परीक्षेचे माहितीपत्रक व अभ्यासकम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

"https://setexam.unipune.ac.in" या



टिप:- जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण (पात्र) असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही



सही/

प्रा. (डॉ.) विजय खरे प्रभारी कुलसचिव तथा सदस्य सचिव (सेट)

21 January 2024

शाळेची सर्व माहिती भरा एकाच ठिकाणी.



👉🏻शाळेची सर्व प्रकारची माहिती आपण येथे ॲानलाईन भरु शकता.
👉🏻 प्रत्येक वेबसाईटचा पासवर्ड सेव्ह म्हणा.

👉🏻 कोणत्याही क्षणी कोणतीही वेबसाईट आपण मोबाईल वर उघडू शकतो.
👉🏻कोणतीही वेबसाईट open करण्यासाठी दिलेल्या Image वर Click करावे.







20 January 2024

पवित्र पोर्टलवर अजून भरतीची जाहिरातच नाही!

पवित्र पोर्टलवर अजून भरतीची जाहिरातच नाही!

शेकडो शिक्षकांच्या जागा रिक्त, शाळा भरतीसाठी रसच दाखवेना!

■ १६ ऑक्टोबरपासून जाहिराती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून दि. २२ जानेवारीपर्यंत प्रत्येक खासगी अनुदानित शाळांनी जाहिरात अपलोड करावी, असे आवाहन जि.प. शिक्षण विभागाकडून केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रिक्त पदांमुळे शाळांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची ओरड होत होती. परंतु आता संबंधित पदे भरण्याची मागणी करणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळा भरती प्रक्रिया सुरू होऊनही पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यास दिरंगाई करीत असल्याचे समोर आले आहे. जिल्हयातील अनतानित शालांमधील

पदे रिक्त असतानाही आतापर्यंत शाळांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड केलेल्या नाहीत.

खासगी अनुदानित शाळांचे संस्थाचालक 'सोयी'च्या उमेदवाराला नोकरी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे अद्याप जाहिराती अपलोड झाली नसल्याचा आरोप होत आहे. वशिलेबाजी, डोनेशन या गोष्टींना लगाम बसावा, म्हणून शिक्षक भरती प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाने बदल केला गुणवत्ता यादीनुसार 

संबंधित शिक्षकांची नेमणूक होईल. पूर्वीप्रमाणे संस्थापक ठरवेल त्याच उमेदवाराला शिक्षक म्हणून मान्यता मिळणार नाही.

खासगी अनुदानित संस्थांमध्ये एका पदासाठी तीन उमेदवार पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच पाठविले जातील. त्या तिघांची मुलाखत घेऊन त्यातून एकाची निवड करण्याचा अधिकार संस्थेला असेल.

CTET EXAM केंद्र

CTET EXAM CENTER AVAILABLE PLEASE CHECK CLICK BELOW.


CTET ची परीक्षे बद्दल महत्वाची सूचना -

CTET ची परीक्षे बद्दल महत्वाची सूचना -


A. एकूण प्रश्न 150 आणि वेळ 150 मिनिटे असेल त्यामुळे प्रश्न पटापट सोडवावे शक्य असल्यास पेपर मध्ये प्रश्न पुढील क्रमाने प्रमाणे सोडवावे
PAPER-1
1. PADAGOGY
2.EVS
3. MATHS PADAGOGY
4. LANGUAGE- 1
5. LANGUAGE-2
6. Maths

PAPER-2
1. PADAGOGY
2.Social Science/ General Science 
3. LANGUAGE- 1
4. LANGUAGE-2
5. Maths( for science students)


B. पेपर संपण्यापूर्वी १५० प्रश्न सोडवूनच परीक्षा कक्षे च्या बाहेर पडा.

C. शेवट वेळ न राहिल्यास एक पर्याय पकडुन सर्व उत्तरे लिहावीत पण १५० प्रश्न सोडवणे गरजेचे.

D. मुख्य प्रश्नपत्रिका आणि सोबत भाषा सोडवण्यास घेतलेली प्रश्न पत्रिका ह्याच कोड समान आहे याची खात्री करावी. जसे की मुख्य प्रश्नपत्रिका जर A कोड ची आहे तर तर भाषा प्रश्नपत्रिका पण A कोड ची असावी.

परीक्षे साठी सर्व भावी शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा..

19 January 2024

सन २०२३ - २४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आधार व्हॅलीडेशन करून घेणेबाबत.

आधार व्हॅलीडेशन करणेबाबत..

                   


  

                       महाराष्ट्र शासन 

                शालेय शिक्षण व क्रिडा विभाग 

                          समग्र शिक्षा 

 

१. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद (सर्व). 

२. शिक्षणाधिकारी / प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, सर्व . 

३. शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम), मुंबई 

विषय: सन २०२३ - २४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आधार 

व्हॅलीडेशन करून घेणेबाबत. 

संदर्भ: १) स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय, भारत सरकार 

याचे पत्र क्र. D.O.No. २३-४/२०२३ Stats दि. २५/०८/२०२३. 

२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे पत्र क्र. संकीर्ण 

२०२३/प्र.क्र.२७०/एसडी-१ दि. ३०/०८/२०२३. 

३) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप / समग्र शिक्षा / संगणक/U-DISE/२०२३- 

२४/२५९१, दि.१३/०९/२०२३ 

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये या कार्यालयाकडून राज्यातील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणेबाबत व्हीसी व व्हाट्सअॅपव्दारे वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्हानिहाय व तालुकानिहाय Adhar Validation Report नियमितपणे पाठविण्यात येत आहे. तरी देखील Adhar Validation चे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. याबाबत केंद्र शासनाकडूनही वारंवार पाठपुरावा केला जात आहे. तरी आपल्या जिल्हयातील संबंधित सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांकडून उर्वरित शिक्षक व विद्यार्थी यांचे Adhar Validation चे काम दि.३१/०१/२०२४ पर्यंत त्वरीत पूर्ण करून घ्यावे. 

सोबत : Adhar Validation Report 

                             (सरोज जगताप) 

          सहा. संचालक (कार्यक्रम/प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई. 

प्रत माहिती व कार्यवाहीस्तव सविनय सादर: 

१. मा. आयुक्त, महानगरपालिका सर्व. 

२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व. 

३. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे. 

४. मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग. 



22जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी बद्दल अधिसूचना..


२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी.
             अधिसूचना 

     सामान्य प्रशासन विभाग 

मंत्रालय, मादाम कामा मारा 

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०००३२ दिनांक १९ जानेवारी, २० सार्वजनिक सुट्टी. २०२४ 

क्रमांक:- सार्वसु-१२२४/प्र.क्र.०२ /जक (कार्या २१) - परक्राम्य लेख अधिनियम, १८८१ (१८८१६०) या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/९६८ 

तीन दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेला दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करीत आहे 

(अ) सार्वजनिक सुट्ट्या 








महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. 

                           (सं.दि.कदम-पाटील) 

                            शासनाच्या उप सचिव 

क्रमांक: सासू- ११२४/प्र.क्र.०२ /जक (कार्या-२९) 

सामान्य प्रशासन विभाग 

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, 

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. 

दिनांक : १९ जानेवारी, २०२४. 

प्रति, 

मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, 

मा. राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक, 

मा.सभापती/मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद/विधानसभा यांचे सचिव 

मा.उप सभापती/मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद/विधानसभा यांचे खाजगी सचिव मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई 

मा. उपमंत्री यास मंत्रालय, मुंबई 

सर्व मा. मंत्री/मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक. 

मा. विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधान परिषद / विधानसभा यांचे स्वीय सहाय्यक, 

मुख्य सविय सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई. 

सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई 

महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई. 

नोटरी सिनियर मास्टर मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई 

प्रबंधक, अप्रैल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई 

सथिय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई 

प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई / नागपूर, 

प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई 

मुख्य आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई 

मुख्य आयुक्त सेवा हक्क कायदा, मुंबई 

सर्व विभागीय आयुक्त, 

सर्व जिल्हाधिकारी, 

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, 

मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख, 
 महाराष्ट्र- १. मंबई.

16 January 2024

देऊळगाव येथील सर्व नवीन मतदारांसाठी आवाहन.

Form No.6(नविन मतदारांसाठी)भरणे सुरु झालेले असून 

देऊळगाव येथील सर्व नवीन मतदारांना आवाहन करण्यात येते की,
ज्यांचे नाव अजूनही मतदान यादीत आलेले नाही त्यांनी खालील प्रमाणे कागदपत्रे जमा करावीत.
1)पासपोर्ट फोटो.
2)आधार कार्ड झेरॉक्स /शाळा सोडल्याचा दाखला.
3)घरातील एका व्यक्तीचे मतदान कार्ड झेरॉक्स. ही सर्व कागदपत्रे जमा करावीत.

कागदपत्रे जमा करण्यासाठी भेटावे.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

1)महेंद्र गोलंदास इंगळे
(शिक्षक, महाराणा प्रताप विद्यालय, देऊळगाव )
2)सत्तार नबाब तडवी.
(शिक्षक, महाराणा प्रताप विद्यालय, देऊळगाव )
3)शिवदास बोदडे.
(ग्रामपंचायत कर्मचारी, देऊळगाव )
यांच्याशी संपर्क साधावा...

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular