12 February 2020

मराठी कविता रस ग्रहण वर्ग 10वी

वर्ग 10वी विषय इंग्रजी appreciation of all poem

सोपे इंग्रजी वाचन

विज्ञान कोडे

विज्ञान प्रयोग

येथे क्लिक करा

मराठी व्याकरण

🌷 स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल अक्षरावर जो शीर्षबिंदू दिला जातो त्यास अनुस्वार असे म्हणतात.

🌷 संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात.

🌷 नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रुपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार देतात.

🌷 अनुच्चारित अनुस्वार लिहू नये हा विचार प्रथम रा. भिं. गुंजीकर यांनी मांडला.

🌷 शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर उपांत्य इ - कार व उ - कार -हस्व असतो.

🌷 सरकारमान्य असलेले लेखनविषयक नियम मराठी साहित्य महामंडळाने तयार केले.

🌷 शब्दांची संक्षिप्तरूपे पूर्णविराम चिन्हे देऊन पूर्ण करतात.

🌷 साम्यभेद असणा-या बोली वापरणारे लोक परस्परामध्ये व्यवहार करताना ज्या भाषिक रूपाचा आश्रय घेतात त्याला प्रमाणभाषा / प्रमाणबोली असे म्हणतात.

🌷 शब्दांच्या पुढे जे अक्षर किंवा जी अक्षरे लागतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.

 🌷प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटित असे म्हणतात.

🌷 धातूस प्रत्यय लागून जे साधित शब्द बनतात त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.

🌷 धातूशिवाय इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना शब्दसाधिते असे म्हणतात. उदा. कविता, नवीनता या शब्दामध्ये धातू व्यतिरिक्त शब्दांना [ ता ] हा प्रत्यय लागतो.

🌷 टाकाऊ, टिकाऊ, लढाऊ, चढाऊ या शब्दामध्ये धातूला [ ऊ ] हा प्रत्यय लागल्यामुळे त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.

🌷 समास झाल्यावरच्या जोडशब्दांना समासघटित शब्द असे म्हणतात.

🌷 शब्दांच्या पुनरुक्तीतून जे जोडशब्द तयार होतात त्यांना अभ्यस्त असे म्हणतात.

🌷 मराठीचे इंग्रजी राजवटीमधील पहिले व्याकरणाचे पुस्तक श्रीरामपूर [ कलकत्ता ] येथे तयार झाले.


🌷 महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका हे मराठीचे संस्कृतमध्ये रचलेले व्याकरणाचे पुस्तक आहे.

🌷शब्दसमूहाबद्दल एक शब्द🌷
   
 🌷फार कमी बोलणारा - अबोल

🌷 आधी जन्म घेतलेला - अग्रज

🌷 देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा -   अनुष्ठान

🌷 सीमा नाही असे - असीम

🌷 घरी पाहुणा म्हणून आलेला - अतिथी

🌷 धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण - अन्नछत्र

🌷 ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे - अनुपम

🌷थोडक्यात समाधान मानणारा - अल्पसंतुष्ट

🌷 विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य - अतिक्रमण

 🌷पायात काहीही न घालणारा - अनवाणी

🌷 कधीही नाश न पावणारे - अविनाशी

🌷 देवाने घेतलेला मनुष्याचा जन्म - अवतार

🌷 जाणून घेण्यास अशक्य असे - अज्ञेय

🌷 वर्तमानपत्रातील संपादकीय मुख्य लेख - अग्रलेख

 🌷अनेक चांगल्या गुणांनी युक्त - अष्टपैलू

इंग्रजी शब्द जोडा

शैक्षणिक साहित्य बनवा

11 February 2020

साहित्यिकांची टोपणनावे

🔸 *! साहित्यिकांची टोपणनावे !*🔸
___________________%&%___________
🌀 *टोपणनाव--------------लेखक*🌀
🌿🌿🌿🌿 *K.*Ⓜ ®🌿🌿🌿🌿
अनंत फंदी-------शाहीर अनंत घोलप
अनंततनय-------दत्तात्रय अनंत आपटे
अनिरुध्द पुनर्वसू-------नारायण गजानन आठवले
अनिल-------आत्माराम रावजी देशपांडे
अमरशेख-------मेहबूब पठाण
अज्ञातवासी-------दिनकर गंगाधर केळकर
आनंद-------वि.ल.बर्वे
आरती प्रभु-------चिंतामण त्र्यंबक खानोलकर
काव्यविहारी-------धोंडो वासुदेव गद्रे
कुंजविहारी-------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
कुमुद-------स.अ.शुक्ल
कुसुमाग्रज-------वि.वा.शिरवाडकर
कृष्णकुमार-------सेतू माधव पगडी
केशवकुमार-------प्र.के. अत्रे
करिश्मा-------न.रा.फाटक
केशवसुत-------कृष्णाजी केशव दामले
गदिमा-------ग.दि.माडगुळकर
गिरीश-------शंकर केशव कानेटकर
ग्रेस-------माणिक शंकर गोडघाटे
गोल्या घुबड-------विष्णुशास्त्री चिपळूणकर
गोविंद-------गोविंद त्र्यंबक दरेकर
गोविंदाग्रज-------राम गणेश गडकरी
चंद्रिका /चंद्रशेखर-------शिवराम महादेव गो-हे
चारुता सागर-------दिनकर दत्तात्रय भोसले
छोटा गंधर्व-------सौदागर नागनाथ गोरे
बालगंधर्व-------नारायणराव राजहंस
जीवन-------संजीवनी मराठे
ठणठणपाल/अलाणे-फलाणे-------जयवंत दळवी
तुकडोजी महाराज-------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट
संत तुकाराम-------तुकाराम बोल्होबा अंबिले
तुकाराम शेंगदाणे-------ज्ञानेश्वर नाडकर्णी
दत्त (कवी)-------दत्तत्रय कोंडदेव घाटे
द्या पवार (कवी)-------दगडू मारुती पवार
जागल्या (कथालेखक)-------दगडू मारुती पवार
दक्षकर्ण-------अशोक रानडे
दादुमिया-------दा.वि.नेने
दासोपंत-------दासोपंत दिगंबर देशपांडे
दिवाकर-------शंकर काशिनाथ गर्गे
दिवाकर कृष्ण-------दिवाकर कृष्ण केळकर
धनुर्धारी-------रा.वि.टिकेकर
धुंडिराज-------मो.ग.रांगणेकर
नागेश-------नागेश गणेश नवरे
नाथमाधव-------व्दारकानाथ माधवराव पितके
निशिगंध-------रा.श्री.जोग
नृसिंहाग्रज-------ल.गो.जोशी
पद्मा-------पद्मा विष्णू गोळे
पराशंर-------लक्ष्मणराव सरदेसाई
पी.सावळाराम-------निवृत्ती रावजी पाटील
पुष्पदंत-------प्र.न.जोशी
प्रफुल्लदत्त-------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर
प्रभाकर (शाहीर)-------प्रभाकर जनार्दन दातार
फडकरी-------पुरूषोत्तम धाक्रस
फरिश्ता-------न. रा. फाटक
बाकीबा-------बाळकृष्ण भगवंत बोरकर
बाबा कदम-------वीरसेन आनंद कदम
बाबुराव अर्नाळकर-------चंद्रकांत सखाराम चव्हाण
बाबुलनाथ-------वि.शा.काळे
बालकवी-------त्र्यंबक बापूजी ठोंबरे
बाळकराम (विनोदासाठी)-------राम गणेश गडकरी
बी-------नारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथ-------भगवान रघुनाथ कुलकर्णी
बंधुमाधव-------बंधु माधव मोडक (कांबळे)
भटक्या-------प्रमोद नवलकर
भाऊ पाध्ये-------प्रभाकर नारायण पाध्ये
भानुदास-------कृष्णाजी विनायक पोटे
भानुदास रोहेकर-------लीला भागवत
भालचंद्र नेमाडे-------भागवत वना नेमाडे
मकरंद-------बा.सी.मर्ढेकर
मंगलमूर्ती-------मो.ग.रांगणेकर
मनमोहन-------गोपाळ नरहर नातू
लोककवी श्री मनमोहन-------मीनाक्षी दादरकर
माधव ज्युलियन-------माधव त्र्यंबक पटवर्धन
माधवानुज-------डॉ. काशिनाथ हरि मोडक
मामा वरेरकर-------भार्गव विट्ठल वरेरकर
मधू दारूवाला-------म.पा.भावे
मिलिंद माधव-------कॅ. मा कृ. शिंदे
मुक्ताबाई (संत)-------मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी
मोरोपंत-------मोरेश्वर रामचंद्र पराडकर
मंडणमित्र-------द.पा.खंबिरे
यशवंत-------यशवंत दिनकर पेंढारकर
यशवंत दत्त-------यशवंत दत्ताजी महाडिक
रघुनाथ पंडित-------रघुनाथ चंदावरकर
रमाकांत नागावकर(गंधर्व)-------बळवंत जनार्दन करंदीकर
रसगंगाधर-------गंगाधर कुलकर्णी
राजा ठकार-------नारायण गजानन आठवले
राजा मंगळवेढेकर-------वसंत नारायण मंगळवेढेकर
राधारमण-------कृष्ण पांडुरंग लिमये
रा. म. शास्त्री-------वि.ग कानिटकर
रूप-------प्रल्हाद वडेर
रे. टिळक-------नारायण वामन टिळक
लता जिंतूरकर-------लक्ष्मीकांत तांबोळी
लक्ष्मीनंदन-------देवदत्त टिळक
लोकहितवादी-------गोपाळ हरि देशमुख
वनमाळी-------वा.गो.मायदेव
वसंत बापट-------विश्वनाथ वामन बापट
वसंत सबनीस-------रघुनाथ दामोदर सबनीस
वामन पंडित-------वामन नरहर शेखे
विजय मराठे-------ना.वि.काकतकर
विंदा करंदीकर-------गोविंद विनायक करंदीकर
विनायक-------विनायक जनार्दन करंदीकर
विनोबा-------विनायक नरहर भावे
विभावरी शिरुरकर-------मालतीबाई विश्राम बेडेकर
विष्णुदास-------नरहर सदाशिव जोशी
वशा-------वसंत हजरनीस
विष्णुबुवा ब्रम्हचारी-------विष्णु भिकाजी गोखले.
📚 📚📒📔📕

इंग्रजी तोंडी प्रश्नपत्रिका वर्ग 10वी

इयत्ता 10 वी अंतर्गत मूल्यमापन विषय इंग्रजी

10 February 2020

गणितीय सूत्रे

पालेभाजी आणि औषधी उपयोग

काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.*

१.]   *कोथिंबीर* :-  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.

२.]   *कढीलिंब* ;-  पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. 

३.]   *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे. 

४.]  *माठ*  :-  हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते. 

५.]  *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे. 

६.]   *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो.  

७.]   *अळू*  :-  याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते. 

८.]  *अंबाडी* :-  मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो. 

९.]  *घोळ* :-  मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते. 

१०.]  *टाकळा* :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे. 

११.] *मायाळू* :-  अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात. 

१२.]  *तांदुळजा* :-  बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते. 

१३.]  *मेथी* :-  सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो. 

१४.]    *शेपू* ;-  वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे. 

१५.]    *शेवगा* ;-  ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात. 

१६.]     *सॅलड* :-  या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्‍यांनी नियमित सॅलड खावे
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

इंग्रजी पत्रलेखन वर्ग 10वी नमुना

शुद्धलेखन तुमच्या हातात

सचित्र इंग्रजी शब्द

इंग्रजी व्याकरण

महाराष्ट्र इतिहास

07 February 2020

प्रकल्प यादी

व्यक्ती व टोपणनावे

महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे

व्यक्तीचे नाव – प्रचलित नाव

ज्ञानेश्वर – माऊली

ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी – ज्ञानेश्वर

माणिक बंडोजी ठाकूर (ब्राम्हभट्ट) – तुकडोजी महाराज

तुकाराम बोल्होबा आंबिले – तुकाराम

नामदेव दामाजी शिंपी – संत नामदेव

नारायण सूर्याजी ठोसर – समर्थ रामदास स्वामी

डेबुजी झिंगरोजी जाणोरकर – गाडगेबाबा

महात्मा गांधी – बापू, राष्ट्रपिता, महात्मा

पंडित जवाहरलाल नेहरू – चाचा

रविंद्रनाथ टागोर – गुरुदेव

सुभाषचंद्र बोस – नेताजी

इंदिरा गांधी – प्रियदर्शनी, आर्यन लेडी

टिपू सुलतान – म्हैसूरचा वाघ

भाऊराव पायगोंडा पाटील – कर्मवीर

धोंडो केशव कर्वे – महर्षि

विठ्ठल रामाजी शिंदे – महर्षि

देवेन्द्रनाथ टागोर – महर्षि

पांडुरंग महादेव बापट – सेनापती बापट

शिवराम महादेव परांजपे – काळकर्ते

नरेंद्र दत्त – स्वामी विवेकानंद

चक्रवर्ती राजगोपालाचारी – सी.आर., आधुनिक चाणक्य

मुरलीधर देविदास आमटे – बाबा आमटे

अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर – ठक्करबाप्पा

राम मोहन – राजा/रॉय

शेख मुजीबूर रेहमान – वंग बंधु

बापूसाहेब अणे – लोकनायक

विनायक हरहर भावे – लोकनायक

धुंडीराज गोविंद फाळके – दादासाहेब फाळके

मुळशंकर दयाळजी – दयानंद सरस्वती

गदाधर चट्टोपाध्याय – रामकृष्ण परमहंस

पंडित मदन मोहन मालवीय – महामान्य

सरोजिनी नायडू – भारत कोकिळा

लाला लजपतराय – पंजाबचा सिंह

बाळ गंगाधर टिळक – लोकमान्य

लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल – लाल, बाल, पाल

ज्योतिबा फुले – महात्मा

दादा धर्माधिकारी – आचार्य

बाळशास्त्री जांभेकर – आचार्य

प्र.के. अत्रे – आचार्य

वल्लभभाई पटेल – सरदार

नाना पाटील – क्रांतिसिंह

वि.दा. सावरकर – स्वातंत्र्यवीर

डॉ. भिमराव रामजी आंबेडकर – बाबासाहेब

गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी

दादाभाई नौरोजी – भारताचे पितामह

शांताराम राजाराम वणकुद्रे – व्ही. शांताराम

मंसूर अलीखान पतौडी – टायगर

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – मिसाईल मॅन

सी.आर. दास – देशबंधू

लालबहादूर शास्त्री – मॅन ऑफ पीस

सरदार पटेल – पोलादी पुरुष

दिलीप वेंगसकर – कर्नल

सुनील गावस्कर – सनी, लिट्ल मास्टर

पी.टी. उषा – भारताची सुवर्णकन्या, स्प्रीटक्चीन

नारायण श्रीपाद राजहंस – बालगंधर्व

नरसिंह चिंतामण केळकर – साहित्यसम्राट

लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी – तर्क तीर्थ

आचार्य रजनीश – ओशो

लता मंगेशकर – स्वरसम्राज्ञी

06 February 2020

समाजसुधारक

मराठी इंग्रजी बाराखडी

वर्ग 8वी नोंदी

वर्ग 7वी नोंदी

वर्ग 6वी नोंदी

वर्ग 5वी नोंदी

वर्ग 4थी नोंदी

वर्ग 3री नोंदी

वर्ग 2री नोंदी

वर्ग 1ली नोंदी

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular