आधार व्हॅलीडेशन करणेबाबत..
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग
समग्र शिक्षा
१. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद (सर्व).
२. शिक्षणाधिकारी / प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, सर्व .
३. शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम), मुंबई
विषय: सन २०२३ - २४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आधार
व्हॅलीडेशन करून घेणेबाबत.
संदर्भ: १) स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय, भारत सरकार
याचे पत्र क्र. D.O.No. २३-४/२०२३ Stats दि. २५/०८/२०२३.
२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे पत्र क्र. संकीर्ण
२०२३/प्र.क्र.२७०/एसडी-१ दि. ३०/०८/२०२३.
३) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप / समग्र शिक्षा / संगणक/U-DISE/२०२३-
२४/२५९१, दि.१३/०९/२०२३
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये या कार्यालयाकडून राज्यातील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणेबाबत व्हीसी व व्हाट्सअॅपव्दारे वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्हानिहाय व तालुकानिहाय Adhar Validation Report नियमितपणे पाठविण्यात येत आहे. तरी देखील Adhar Validation चे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. याबाबत केंद्र शासनाकडूनही वारंवार पाठपुरावा केला जात आहे. तरी आपल्या जिल्हयातील संबंधित सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांकडून उर्वरित शिक्षक व विद्यार्थी यांचे Adhar Validation चे काम दि.३१/०१/२०२४ पर्यंत त्वरीत पूर्ण करून घ्यावे.
सोबत : Adhar Validation Report
(सरोज जगताप)
सहा. संचालक (कार्यक्रम/प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रत माहिती व कार्यवाहीस्तव सविनय सादर:
१. मा. आयुक्त, महानगरपालिका सर्व.
२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
३. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.








